गणना ७:१-८९
-
उपासना मंडपाच्या समर्पणाची अर्पणं (१-८९)
७ मोशेने उपासना मंडप उभा करण्याचं काम पूर्ण केलं त्या दिवशी+ त्याने उपासना मंडपाचा, तसंच त्याच्या सर्व सामानाचा, वेदीचा आणि सर्व भांड्यांचा अभिषेक करून त्यांना पवित्र केलं.+ त्याने या गोष्टींचा अभिषेक करून त्यांना पवित्र केल्यानंतर,+
२ इस्राएलच्या प्रधानांनी,+ म्हणजे त्यांच्या कुळांच्या प्रमुखांनी अर्पणं आणली. वेगवेगळ्या वंशांच्या ज्या प्रधानांनी नोंदणीच्या कामावर देखरेख केली होती,
३ त्यांनी सहा झाकलेल्या गाड्या आणि १२ बैल, म्हणजे दोन प्रधानांनी मिळून एक गाडी आणि प्रत्येकाने एक बैल यहोवासमोर अर्पण म्हणून आणला; त्यांनी ते उपासना मंडपासमोर अर्पण करण्यासाठी आणलं.
४ यहोवा मोशेला म्हणाला:
५ “त्यांच्याकडून या गोष्टी घेऊन लेव्यांना, प्रत्येकाच्या कामासाठी ज्या लागतील त्याप्रमाणे दे, म्हणजे भेटमंडपाच्या कामांसाठी त्या उपयोगी पडतील.”
६ तेव्हा मोशेने त्यांच्याकडून त्या गाड्या आणि बैल घेतले आणि ते लेव्यांना दिले.
७ त्याने गेर्षोनच्या मुलांना दोन गाड्या आणि चार बैल दिले. त्यांच्या कामांसाठी ज्याची गरज होती त्याप्रमाणे त्याने त्यांना दिलं.+
८ त्याने मरारीच्या मुलांना चार गाड्या आणि आठ बैल दिले. अहरोन याजकाचा मुलगा इथामार याच्या देखरेखीखाली, त्यांच्या कामांसाठी ज्याची गरज होती त्याप्रमाणे त्याने त्यांना दिलं.+
९ पण कहाथच्या मुलांना त्याने यांपैकी काही दिलं नाही, कारण त्यांच्यावर पवित्र ठिकाणाची कामं करण्याची जबाबदारी होती+ आणि ते पवित्र गोष्टी आपल्या खांद्यांवर उचलून न्यायचे.+
१० वेदीच्या समर्पणाच्या* दिवशी, म्हणजे तिचा अभिषेक झाला त्या दिवशी प्रधानांनी आपापली अर्पणं आणली.+ त्यांनी ही अर्पणं वेदीसमोर आणली, तेव्हा
११ यहोवा मोशेला म्हणाला: “वेदीच्या समर्पणासाठी दररोज एकेक प्रधान आपलं अर्पण आणेल.”
१२ त्याप्रमाणे, पहिल्या दिवशी यहूदा वंशातल्या अम्मीनादाबचा मुलगा नहशोन,+ याने आपलं अर्पण आणलं.
१३ त्याने पवित्र ठिकाणाच्या ठरलेल्या शेकेलप्रमाणे,*+ १३० शेकेल* वजनाचं एक चांदीचं ताट आणि ७० शेकेल वजनाची एक चांदीची वाटी आणली. ती दोन्ही भांडी, अन्नार्पणासाठी तेलात मिसळलेल्या चांगल्या पिठाने भरलेली होती;+
१४ तसंच, धूपाने भरलेला दहा शेकेल वजनाचा एक सोन्याचा प्याला;*
१५ होमार्पणासाठी+ एक गोऱ्हा,* एक मेंढा आणि एक वर्षाचं कोकरू;
१६ पापार्पणासाठी+ एक बकरा;
१७ आणि शांती-अर्पण+ म्हणून दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एकेका वर्षाची पाच कोकरंही त्याने आणली. हे अम्मीनादाबचा मुलगा नहशोन+ याचं अर्पण होतं.
१८ दुसऱ्या दिवशी, इस्साखार वंशाचा प्रधान, म्हणजे सूवारचा मुलगा नथनेल+ याने आपलं अर्पण आणलं.
१९ त्याने पवित्र ठिकाणाच्या ठरलेल्या शेकेलप्रमाणे,+ १३० शेकेल वजनाचं एक चांदीचं ताट आणि ७० शेकेल वजनाची एक चांदीची वाटी आणली. ती दोन्ही भांडी, अन्नार्पणासाठी तेलात मिसळलेल्या चांगल्या पिठाने भरलेली होती;+
२० तसंच, धूपाने भरलेला दहा शेकेल वजनाचा एक सोन्याचा प्याला;
२१ होमार्पणासाठी+ एक गोऱ्हा, एक मेंढा आणि एक वर्षाचं कोकरू;
२२ पापार्पणासाठी+ एक बकरा;
२३ आणि शांती-अर्पण+ म्हणून दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एकेका वर्षाची पाच कोकरंही त्याने आणली. हे सूवारचा मुलगा नथनेल याचं अर्पण होतं.
२४ तिसऱ्या दिवशी, जबुलूनच्या मुलांचा प्रधान, म्हणजे हेलोनचा मुलगा अलीयाब,+
२५ याने आपलं अर्पण आणलं. त्याने पवित्र ठिकाणाच्या ठरलेल्या शेकेलप्रमाणे,+ १३० शेकेल वजनाचं एक चांदीचं ताट आणि ७० शेकेल वजनाची एक चांदीची वाटी आणली. ती दोन्ही भांडी, अन्नार्पणासाठी तेलात मिसळलेल्या चांगल्या पिठाने भरलेली होती;+
२६ तसंच, धूपाने भरलेला दहा शेकेल वजनाचा एक सोन्याचा प्याला;
२७ होमार्पणासाठी+ एक गोऱ्हा, एक मेंढा आणि एक वर्षाचं कोकरू;
२८ पापार्पणासाठी+ एक बकरा;
२९ आणि शांती-अर्पण+ म्हणून दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एकेका वर्षाची पाच कोकरंही त्याने आणली. हे हेलोनचा मुलगा अलीयाब+ याचं अर्पण होतं.
३० चौथ्या दिवशी, रऊबेनच्या मुलांचा प्रधान, म्हणजे शदेयुरचा मुलगा अलीसूर,+
३१ याने आपलं अर्पण आणलं. त्याने पवित्र ठिकाणाच्या ठरलेल्या शेकेलप्रमाणे,+ १३० शेकेल वजनाचं एक चांदीचं ताट आणि ७० शेकेल वजनाची एक चांदीची वाटी आणली. ती दोन्ही भांडी, अन्नार्पणासाठी तेलात मिसळलेल्या चांगल्या पिठाने भरलेली होती;+
३२ तसंच, धूपाने भरलेला दहा शेकेल वजनाचा एक सोन्याचा प्याला;
३३ होमार्पणासाठी+ एक गोऱ्हा, एक मेंढा आणि एक वर्षाचं कोकरू;
३४ पापार्पणासाठी+ एक बकरा;
३५ आणि शांती-अर्पण+ म्हणून दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एकेका वर्षाची पाच कोकरंही त्याने आणली. हे शदेयुरचा मुलगा अलीसूर+ याचं अर्पण होतं.
३६ पाचव्या दिवशी, शिमोनच्या मुलांचा प्रधान, सुरीशादैचा मुलगा शलूमियेल,+
३७ याने आपलं अर्पण आणलं. त्याने पवित्र ठिकाणाच्या ठरलेल्या शेकेलप्रमाणे,+ १३० शेकेल वजनाचं एक चांदीचं ताट आणि ७० शेकेल वजनाची एक चांदीची वाटी आणली. ती दोन्ही भांडी, अन्नार्पणासाठी तेलात मिसळलेल्या चांगल्या पिठाने भरलेली होती;+
३८ तसंच, धूपाने भरलेला दहा शेकेल वजनाचा एक सोन्याचा प्याला;
३९ होमार्पणासाठी+ एक गोऱ्हा, एक मेंढा आणि एक वर्षाचं कोकरू;
४० पापार्पणासाठी+ एक बकरा;
४१ आणि शांती-अर्पण+ म्हणून दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एकेका वर्षाची पाच कोकरंही त्याने आणली. हे सुरीशादैचा मुलगा शलूमियेल+ याचं अर्पण होतं.
४२ सहाव्या दिवशी, गादच्या मुलांचा प्रधान, म्हणजे दगुवेलचा मुलगा एल्यासाप,+
४३ याने आपलं अर्पण आणलं. त्याने पवित्र ठिकाणाच्या ठरलेल्या शेकेलप्रमाणे,+ १३० शेकेल वजनाचं एक चांदीचं ताट आणि ७० शेकेल वजनाची एक चांदीची वाटी आणली. ती दोन्ही भांडी, अन्नार्पणासाठी तेलात मिसळलेल्या चांगल्या पिठाने भरलेली होती;+
४४ तसंच, धूपाने भरलेला दहा शेकेल वजनाचा एक सोन्याचा प्याला;
४५ होमार्पणासाठी+ एक गोऱ्हा, एक मेंढा आणि एक वर्षाचं कोकरू;
४६ पापार्पणासाठी+ एक बकरा;
४७ आणि शांती-अर्पण+ म्हणून दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एकेका वर्षाची पाच कोकरंही त्याने आणली. हे दगुवेलचा मुलगा एल्यासाप+ याचं अर्पण होतं.
४८ सातव्या दिवशी, एफ्राईमच्या मुलांचा प्रधान, म्हणजे अम्मीहूदचा मुलगा अलीशामा,+
४९ याने आपलं अर्पण आणलं. त्याने पवित्र ठिकाणाच्या ठरलेल्या शेकेलप्रमाणे,+ १३० शेकेल वजनाचं एक चांदीचं ताट आणि ७० शेकेल वजनाची एक चांदीची वाटी आणली. ती दोन्ही भांडी, अन्नार्पणासाठी तेलात मिसळलेल्या चांगल्या पिठाने भरलेली होती;+
५० तसंच, धूपाने भरलेला दहा शेकेल वजनाचा एक सोन्याचा प्याला;
५१ होमार्पणासाठी+ एक गोऱ्हा, एक मेंढा आणि एक वर्षाचं कोकरू;
५२ पापार्पणासाठी+ एक बकरा;
५३ आणि शांती-अर्पण+ म्हणून दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एकेका वर्षाची पाच कोकरंही त्याने आणली. हे अम्मीहूदचा मुलगा अलीशामा+ याचं अर्पण होतं.
५४ आठव्या दिवशी, मनश्शेच्या मुलांचा प्रधान, म्हणजे पदाहसुरचा मुलगा गमलियेल,+
५५ याने आपलं अर्पण आणलं. त्याने पवित्र ठिकाणाच्या ठरलेल्या शेकेलप्रमाणे,+ १३० शेकेल वजनाचं एक चांदीचं ताट आणि ७० शेकेल वजनाची एक चांदीची वाटी आणली. ती दोन्ही भांडी, अन्नार्पणासाठी तेलात मिसळलेल्या चांगल्या पिठाने भरलेली होती;+
५६ तसंच, धूपाने भरलेला दहा शेकेल वजनाचा एक सोन्याचा प्याला;
५७ होमार्पणासाठी+ एक गोऱ्हा, एक मेंढा आणि एक वर्षाचं कोकरू;
५८ पापार्पणासाठी+ एक बकरा;
५९ आणि शांती-अर्पण+ म्हणून दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एकेका वर्षाची पाच कोकरंही त्याने आणली. हे पदाहसुरचा मुलगा गमलियेल+ याचं अर्पण होतं.
६० नवव्या दिवशी, बन्यामीनच्या मुलांचा प्रधान,+ म्हणजे गिदोनीचा मुलगा अबीदान+
६१ याने आपलं अर्पण आणलं. त्याने पवित्र ठिकाणाच्या ठरलेल्या शेकेलप्रमाणे,+ १३० शेकेल वजनाचं एक चांदीचं ताट आणि ७० शेकेल वजनाची एक चांदीची वाटी आणली. ती दोन्ही भांडी, अन्नार्पणासाठी तेलात मिसळलेल्या चांगल्या पिठाने भरलेली होती;+
६२ तसंच, धूपाने भरलेला दहा शेकेल वजनाचा एक सोन्याचा प्याला;
६३ होमार्पणासाठी+ एक गोऱ्हा, एक मेंढा आणि एक वर्षाचं कोकरू;
६४ पापार्पणासाठी+ एक बकरा;
६५ आणि शांती-अर्पण+ म्हणून दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एकेका वर्षाची पाच कोकरंही त्याने आणली. हे गिदोनीचा मुलगा अबीदान+ याचं अर्पण होतं.
६६ दहाव्या दिवशी, दानच्या मुलांचा प्रधान, अम्मीशदैचा मुलगा अहीएजर,+
६७ याने आपलं अर्पण आणलं. त्याने पवित्र ठिकाणाच्या ठरलेल्या शेकेलप्रमाणे,+ १३० शेकेल वजनाचं एक चांदीचं ताट आणि ७० शेकेल वजनाची एक चांदीची वाटी आणली. ती दोन्ही भांडी, अन्नार्पणासाठी तेलात मिसळलेल्या चांगल्या पिठाने भरलेली होती;+
६८ तसंच, धूपाने भरलेला दहा शेकेल वजनाचा एक सोन्याचा प्याला;
६९ होमार्पणासाठी+ एक गोऱ्हा, एक मेंढा आणि एक वर्षाचं कोकरू;
७० पापार्पणासाठी+ एक बकरा;
७१ आणि शांती-अर्पण+ म्हणून दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एकेका वर्षाची पाच कोकरंही त्याने आणली. हे अम्मीशदैचा मुलगा अहीएजर+ याचं अर्पण होतं.
७२ अकराव्या दिवशी, आशेरच्या मुलांचा प्रधान, म्हणजे आक्रानचा मुलगा पगीयेल,+
७३ याने आपलं अर्पण आणलं. त्याने पवित्र ठिकाणाच्या ठरलेल्या शेकेलप्रमाणे,+ १३० शेकेल वजनाचं एक चांदीचं ताट आणि ७० शेकेल वजनाची एक चांदीची वाटी आणली. ती दोन्ही भांडी, अन्नार्पणासाठी तेलात मिसळलेल्या चांगल्या पिठाने भरलेली होती;+
७४ तसंच, धूपाने भरलेला दहा शेकेल वजनाचा एक सोन्याचा प्याला;
७५ होमार्पणासाठी+ एक गोऱ्हा, एक मेंढा आणि एक वर्षाचं कोकरू;
७६ पापार्पणासाठी+ एक बकरा;
७७ आणि शांती-अर्पण+ म्हणून दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एकेका वर्षाची पाच कोकरंही त्याने आणली. हे आक्रानचा मुलगा पगीयेल+ याचं अर्पण होतं.
७८ बाराव्या दिवशी, नफतालीच्या मुलांचा प्रधान, एनानचा मुलगा अहीरा,+
७९ याने आपलं अर्पण आणलं. त्याने पवित्र ठिकाणाच्या ठरलेल्या शेकेलप्रमाणे,+ १३० शेकेल वजनाचं एक चांदीचं ताट आणि ७० शेकेल वजनाची एक चांदीची वाटी आणली. ती दोन्ही भांडी, अन्नार्पणासाठी तेलात मिसळलेल्या चांगल्या पिठाने भरलेली होती;+
८० तसंच, धूपाने भरलेला दहा शेकेल वजनाचा एक सोन्याचा प्याला;
८१ होमार्पणासाठी+ एक गोऱ्हा, एक मेंढा आणि एक वर्षाचं कोकरू;
८२ पापार्पणासाठी+ एक बकरा;
८३ आणि शांती-अर्पण+ म्हणून दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एकेका वर्षाची पाच कोकरंही त्याने आणली. हे एनानचा मुलगा अहीरा+ याचं अर्पण होतं.
८४ वेदीचा अभिषेक झाला, तेव्हा इस्राएलच्या प्रधानांनी समर्पणाचं अर्पण+ म्हणून पुढील गोष्टी आणल्या: १२ चांदीची ताटं, १२ चांदीच्या वाट्या आणि १२ सोन्याचे प्याले;+
८५ प्रत्येक चांदीच्या ताटाचं वजन १३० शेकेल, आणि प्रत्येक वाटीचं वजन ७० शेकेल इतकं होतं; पवित्र ठिकाणाच्या ठरलेल्या शेकेलप्रमाणे+ चांदीच्या सर्व भांड्यांचं एकूण वजन २,४०० शेकेल होतं.
८६ धूपाने भरलेल्या १२ सोन्याच्या प्याल्यांपैकी प्रत्येकाचं वजन, पवित्र ठिकाणाच्या ठरलेल्या शेकेलप्रमाणे १० शेकेल इतकं होतं. सोन्याच्या सर्व प्याल्यांचं एकूण वजन १२० शेकेल होतं.
८७ होमार्पणासाठी त्यांनी १२ बैल, १२ मेंढे, एकेका वर्षाची १२ कोकरं व त्यांची अन्नार्पणं, तसंच, पापार्पणासाठी १२ बकरे आणले होते.
८८ शांती-अर्पणासाठी त्यांनी एकूण २४ बैल, ६० मेंढे, ६० बकरे आणि एकेका वर्षाची ६० कोकरं आणली. वेदीचा अभिषेक झाल्यानंतर,+ समर्पणाचं अर्पण+ म्हणून त्यांनी या सर्व गोष्टी दिल्या.
८९ जेव्हा जेव्हा मोशे देवाशी* बोलायला भेटमंडपात जायचा,+ तेव्हा तेव्हा साक्षपेटीच्या झाकणावर+ असलेल्या दोन करुबांच्या मधून,+ त्याला देवाचा आवाज आपल्याशी बोलताना ऐकू यायचा आणि देव त्याच्याशी बोलायचा.
तळटीपा
^ किंवा “उद्घाटनाच्या.”
^ किंवा “पवित्र शेकेलप्रमाणे.”
^ किंवा “छोटी वाटी.”
^ किंवा “तरणा बैल.”
^ शब्दशः “त्याच्याशी.”