गीतरत्न २:१-१७

  • तरुणी ()

    • “मी तर साधं रानफूल”

  • मेंढपाळ ()

    • माझी सखी, जणू भुईकमळ

  • तरुणी (३-१४)

    • “माझी इच्छा होत नाही, तोपर्यंत माझ्या मनात प्रेम जागं करू नका” ()

    • मेंढपाळाचे शब्द (१०ख-१४)

      • “माझ्या सुंदर सखे, माझ्यासोबत चल” (१०ख, १३)

  • तरुणीचे भाऊ (१५)

    • “कोल्ह्यांना पकडा”

  • तरुणी (१६, १७)

    • “मी माझ्या सख्याची आणि तो माझा आहे” (१६)

 मी तर साधं रानफूल,*खोऱ्‍यातलं भुईकमळ.”+  २  “सगळ्या मुलींमध्ये माझी सखी,जणू काट्यांतलं भुईकमळ.”  ३  “रानातल्या झाडांमध्ये जसं सफरचंदाचं झाड,तसा तरुणांमध्ये माझा सखा आहे. त्याच्या सावलीत बसायला माझं मन आतुर झालंय;त्याचं फळ मला गोड लागतं.  ४  त्याने मला मेजवानीच्या घरात* आणलं,त्याचं माझ्यावरचं प्रेम सर्वांना दिसलं.  ५  मला मनुके+ आणि सफरचंद द्या,म्हणजे माझ्या जिवात जीव येईल,कारण मला प्रेमरोग झालाय.  ६  त्याचा डावा हात माझ्या डोक्याखाली आहे,आणि उजव्या हाताने त्याने मला मिठी मारली आहे.+  ७  यरुशलेमच्या मुलींनो, तुम्हाला शपथ आहे;रानातल्या हरणांची+ आणि हरिणींची तुम्हाला शपथ आहे: माझी इच्छा होत नाही, तोपर्यंत माझ्या मनात प्रेम जागं करू नका.+  ८  माझ्या सख्याची चाहूल ऐका! पाहा, तो येतोय! डोंगर चढून, टेकड्यांवरून धावत येतोय.  ९  माझा सखा हरणासारखा; हरिणीच्या पाडसासारखा आहे.+ पाहा, तो भिंतीमागे उभा आहे,खिडक्यांमधून डोकावतोय,जाळीतून पाहतोय. १०  माझा सखा मला म्हणतो: ‘प्रिये ऊठ! माझ्या सुंदर सखे, माझ्यासोबत चल. ११  बघ! हिवाळा* सरलाय,पावसाचे दिवस निघून गेले आहेत. १२  रानात फुलं उमलली आहेत,+द्राक्षवेलींच्या छाटणीची वेळ झाली आहे,+ऐक! पारव्याचं गाणं ऐकू येतंय.+ १३  अंजिराच्या झाडाची पहिली फळं पिकली आहेत;+द्राक्षवेलींना बहर आलाय, त्यांचा सुगंध दरवळतोय. प्रिये ऊठ! माझ्यासोबत चल. माझ्या सुंदर सखे, माझ्यासोबत चल. १४  माझ्या सखे, तू कबुतरासारखी आहेस. खडकांमागून,+ कडेकपारींतून बाहेर ये,मला तुझं रूप पाहू दे, तुझा आवाज ऐकू दे.+ कारण तुझा आवाज सुखावणारा; तुझं रूप मोहवणारं आहे.’ ”+ १५  “कोल्ह्यांना पकडा,कारण द्राक्षवेलींना बहर आलाय,आणि त्यांची पिल्लं द्राक्षमळ्यांची नासधूस करत आहेत.” १६  “मी माझ्या सख्याची आणि तो माझा आहे.+ तो भुईकमळांमध्ये+ कळप चारतोय.+ १७  माझ्या सख्या, लवकर परत ये. वारा वाहण्याची वेळ होण्याआधी;* सावल्या नाहीशा होण्याआधी;आपल्याला वेगळं करणाऱ्‍या या पर्वतांवरच्या* हरणासारखा;+ हरिणीच्या पाडसासारखा+ परत ये.

तळटीपा

शब्दशः “केशराचं फूल.”
शब्दशः “द्राक्षारसाच्या घरात.”
किंवा “पावसाळा.”
शब्दशः “दिवस श्‍वास घेण्याआधी.”
किंवा कदाचित, “भेगांच्या पर्वतांवरच्या.” किंवा “बेथेरच्या पर्वतांवरच्या.”