गीतरत्न ३:१-११

  • तरुणी (१-५)

    • रात्री मला माझ्या प्राणसख्याची आठवण आली ()

  • सीयोनच्या मुली (६-११)

    • शलमोनच्या मिरवणुकीचं वर्णन

 रात्री अंथरुणावर पडलेले असताना,मला माझ्या प्राणसख्याची आठवण आली.+ त्याला पाहायला मी व्याकूळ झाले, पण तो नव्हता.+  २  मी उठून शहरात जाईन,गल्लीबोळांत आणि चौकांत त्याला शोधीन. मला माझ्या प्राणसख्याला शोधायचंय. मी त्याला खूप शोधलं, पण तो दिसला नाही.  ३  शहरात गस्त घालणारे पहारेकरी मला भेटले.+ मी त्यांना विचारलं, ‘माझा सखा तुम्हाला दिसला का?’  ४  त्यांना सोडून पुढे जाताच,मला माझा प्राणसखा भेटला. मी त्याला बिलगले. मी त्याला जाऊ दिलं नाही. शेवटी, मी त्याला माझ्या आईच्या घरी आणलं;+जिने मला जन्म दिला, तिच्या आतल्या खोलीत मी त्याला आणलं.  ५  यरुशलेमच्या मुलींनो, तुम्हाला शपथ आहे;रानातल्या हरणांची आणि हरिणींची तुम्हाला शपथ आहे: माझी इच्छा होत नाही, तोपर्यंत माझ्या मनात प्रेम जागं करू नका.”+  ६  “रानातून धुराच्या खांबांसारखं दिसणारं हे काय येतंय? त्यातून उदाचा,* गंधरसाचा* आणि व्यापाऱ्‍यांजवळच्या सगळ्या अत्तरांचा सुगंध दरवळतोय.”+  ७  “ही तर शलमोनची पालखी आहे. तिच्यासोबत इस्राएलच्या शूरवीरांपैकी साठ वीर पुरुष चालत आहेत.+  ८  त्या सगळ्यांच्या म्यानात तलवार आहे,ते युद्धकलेत निपुण आहेत. रात्रीच्या धोक्यांपासून संरक्षणासाठी,प्रत्येकाच्या कमरेला तलवार आहे.”  ९  “शलमोन राजाने स्वतःसाठी लबानोनच्या वृक्षांपासून तयार करून घेतलेली,+ही शाही पालखी आहे. १०  तिचे दांडे चांदीचे,पाठ सोन्याची,आणि बैठक जांभळ्या लोकरीची आहे. यरुशलेमच्या मुलींनी तिला आतून मोठ्या हौसेने सजवलंय.” ११  “सीयोनच्या मुलींनो, जा,शलमोन राजाला पाहा. त्याच्या लग्नाच्या दिवशी;त्याला मनापासून आनंद झाला त्या दिवशी,जो लग्नाचा मुकुट त्याच्या आईने+ त्याच्यासाठी बनवला होता, तो त्याने घातलाय.”