गीतरत्न ४:१-१६

  • मेंढपाळ (१-५)

    • “माझ्या प्रिये, तू सुंदर आहेस!” ()

  • तरुणी ()

  • मेंढपाळ (७-१६क)

    • “माझ्या वधू, तू माझं मन जिंकलं आहेस” ()

  • तरुणी (१६ख)

 “माझ्या प्रिये, तू सुंदर आहेस! खरंच, तू सुंदर आहेस! तुझ्या ओढणीमागे, तुझे डोळे कबुतरांच्या डोळ्यांसारखे आहेत. तुझे केस गिलादच्या पर्वतांवरून खाली येणाऱ्‍या,बकऱ्‍यांच्या कळपासारखे आहेत.+  २  तुझे दात, नुकतीच लोकर कातरून धुतलेल्या मेंढ्यांच्या कळपासारखे आहेत. सगळ्यांना जुळी आहेत,एकीनेही आपलं मेंढरू गमावलेलं नाही.  ३  तुझे ओठ गडद लाल रंगाच्या धाग्यासारखे आहेत,तुझं बोलणं किती गोड आहे! तुझ्या ओढणीमागे तुझे गाल,डाळिंबाच्या फोडीसारखे आहेत.  ४  तुझी मान,+ रांगेने दगड रचून बांधलेल्या दावीदच्या बुरुजासारखी आहे.+ त्यावर हजार ढाली;शूरवीरांच्या गोलाकार ढाली+ लटकवलेल्या आहेत.  ५  तुझे स्तन, हरिणीच्या पाडसांसारखे;भुईकमळांमध्ये चरणाऱ्‍या,हरिणीच्या जुळ्यांसारखे आहेत.”+  ६  “वारा वाहण्याची वेळ होण्याआधी;* सावल्या नाहीशा होण्याआधी,मी गंधरसाच्या* पर्वतावर;उदाच्या* टेकडीवर जाईन.”+  ७  “माझ्या सखे, तुझं सौंदर्य परिपूर्ण आहे,+तुझ्यात काहीच दोष नाही.  ८  माझ्या वधू, लबानोनहून माझ्यासोबत चल,आपण लबानोनहून निघून जाऊ.+ अमानाच्या शिखरावरून, सनीरच्या शिखरावरून,हर्मोनच्या शिखरावरून आपण खाली उतरू.+ सिंहांच्या गुहा असलेल्या पर्वतांवरून; चित्ते राहतात त्या पर्वतांवरून आपण खाली उतरू.  ९  माझ्या बहिणी, माझ्या वधू, तू माझं मन जिंकलं आहेस.+ एकाच नजरेने; तुझ्या हारातल्या एकाच मण्याने,तू माझं मन जिंकलं आहेस. १०  माझ्या बहिणी, माझ्या वधू, तुझं प्रेम किती मोहक आहे.+ तुझं प्रेम द्राक्षारसाहून गोड आहे.+ तुझ्या सुवासिक तेलांचा सुगंध सगळ्या अत्तरांपेक्षा उत्तम आहे.+ ११  माझ्या वधू, तुझ्या ओठांतून मध पाझरतो.+ दूध आणि मध तुझ्या जिभेखाली आहे.+ तुझ्या वस्त्रांचा सुगंध लबानोनच्या सुगंधासारखा आहे. १२  माझी बहीण, माझी वधू बंदिस्त बागेसारखी आहे. बंदिस्त बाग, जणू झाकलेला झरा. १३  तू* डाळिंबांनी डवरलेल्या झाडांच्या बागेसारखी आहेस. रसरशीत फळांच्या झाडांसोबत, तिथे मेंदीची आणि जटामांसीची* झाडंही आहेत. १४  जटामांसी+ आणि केशर, वेखंड* आणि दालचिनी,+सर्व प्रकारचा ऊद,* गंधरस* आणि अगरू*+ यांची झाडं आणि सर्व प्रकारच्या सुगंधी वनस्पती+ तिथे आहेत. १५  तू बागेतला झरा आणि गोड्या पाण्याची विहीर आहेस;तू लबानोनहून वाहणाऱ्‍या ओढ्यांसारखी आहेस.+ १६  हे उत्तरेच्या वाऱ्‍या, जागा हो! हे दक्षिणेच्या वाऱ्‍या, तूही ये! माझ्या बागेवर फुंकर घाल. * तिचा सुगंध दरवळू दे.” “माझ्या सख्याने त्याच्या बागेत यावं आणि तिची रसरशीत फळं चाखावीत.”

तळटीपा

शब्दशः “दिवस श्‍वास घेण्याआधी.”
किंवा कदाचित, “तुझी त्वचा.”
एक सुगंधी वनस्पती.
गण २४:६ इथली तळटीप पाहा.
किंवा “हळूवार वाहा.”