गीतरत्न ५:१-१६

  • मेंढपाळ (१क)

  • यरुशलेमच्या स्त्रिया (१ख)

    • “प्रेमरस पिऊन धुंद व्हा!”

  • तरुणी (२-८)

    • आपलं स्वप्न सांगते

  • यरुशलेमच्या मुली ()

    • “तुझ्या सख्यात असं काय आहे, जे इतरांमध्ये नाही?”

  • तरुणी (१०-१६)

    • “तो दहा हजारांमध्ये उठून दिसतो” (१०)

 “माझ्या बहिणी, माझ्या वधू,मी आपल्या बागेत आलोय.+ माझा गंधरस आणि माझ्या सुगंधी वनस्पती मी घेतल्या आहेत.+ माझ्या मधाच्या पोळ्यातून मी मध खाल्ला आहे.”+ “प्रेमिकांनो, खा-प्या! प्रेमरस पिऊन धुंद व्हा!”+  २  “मी झोपलेले आहे, पण माझं मन जागं आहे.+ ऐका! माझा सखा दार ठोठावतोय! ‘माझ्या बहिणी, माझ्या प्राणसखे,माझ्या कबुतरा, माझ्या परमसुंदर सखे, माझ्यासाठी दार उघड. माझं डोकं दवाने ओलं झालंय,माझे केस रात्रीच्या दवबिंदूंनी भिजले आहेत.’+  ३  मी आपली वस्त्रं बदलली आहेत,ती पुन्हा कशी घालू? मी पाय धुतले आहेत,ते पुन्हा कसे मळवू?  ४  माझ्या सख्याने दारातल्या झरोक्यातून हात काढून घेतला;तेव्हा माझं मन त्याच्यासाठी आतुर झालं.  ५  माझ्या सख्यासाठी दार उघडायला मी उठले;माझे हात गंधरसाने ओले झाले होते,माझ्या बोटांवरून गंधरसाचं तेल,दाराच्या अडसरावर ओघळलं.  ६  मी माझ्या सख्यासाठी दार उघडलं,पण तो तिथे नव्हता, तो निघून गेला होता. तो गेला हे पाहून माझं मन दुःखाने सैरभैर झालं. * मी त्याला खूप शोधलं, पण तो सापडला नाही.+ मी हाक मारत राहिले, पण त्याने उत्तर दिलं नाही.  ७  शहरात गस्त घालणाऱ्‍या पहारेकऱ्‍यांना मी दिसले. त्यांनी मला मारलं, मला जखमी केलं. भिंतीवरच्या पहारेकऱ्‍यांनी माझी ओढणी* ओढून घेतली.  ८  यरुशलेमच्या मुलींनो, तुम्हाला शपथ आहे: जर तुम्हाला माझा सखा दिसला,तर त्याला सांगा, मी त्याच्या प्रेमासाठी तळमळत आहे.”  ९  “हे सर्वात सुंदर मुली, आम्हाला सांग,तुझा सख्यात असं काय आहे, जे इतरांमध्ये नाही? तुझ्या सख्यात असं काय आहे, की तू आम्हाला अशी शपथ घालतेस?” १०  “माझा सखा तेजस्वी आणि देखणा* आहे;तो दहा हजारांमध्ये उठून दिसतो. ११  त्याचं डोकं सगळ्यात उत्तम सोन्यासारखं आहे,त्याचे केस डोमकावळ्यासारखे काळेभोर आहेत;त्याचे कुरळे केस हवेत तरंगणाऱ्‍या खजुराच्या फांद्यांसारखे* आहेत. १२  त्याचे डोळे झऱ्‍याकाठी बसलेल्या कबुतरांसारखे आहेत;तुडुंब भरलेल्या तळ्यांजवळ* जणू दुधात डुबक्या मारणाऱ्‍या कबुतरांसारखे ते आहेत. १३  त्याचे गाल सुगंधी फुलझाडांच्या ताटव्यांसारखे;+सुवासिक वनस्पती लावलेल्या उंचवट्यांसारखे आहेत. त्याचे ओठ भुईकमळांसारखे आहेत, त्यांतून गंधरस पाझरतो.+ १४  त्याच्या हातांची बोटं चंद्रकांत रत्नं जडवलेल्या, सोन्याच्या नळ्यांसारखी आहेत. त्याचं शरीर नीलमण्यांनी सजवलेल्या, लखलखत्या हस्तिदंतासारखं आहे. १५  त्याचे पाय, शुद्ध सोन्याच्या बैठकांवर बसवलेल्या संगमरवरी स्तंभांसारखे आहेत. त्याचं रूप लबानोनसारखं आहे; तो देवदार वृक्षांसारखा उंचापुरा आहे.+ १६  त्याच्या ओठांच्या* गोडव्याचं मी काय वर्णन करू! त्याची प्रत्येक गोष्ट मोहक आहे.+ यरुशलेमच्या मुलींनो, असा आहे माझा सखा, माझा प्राणसखा!”

तळटीपा

किंवा कदाचित, “तो बोलत होता तेव्हा माझा जीव ठिकाणावर नव्हता.”
किंवा “शाल.”
शब्दशः “लालबुंद.”
किंवा कदाचित, “खजुरांच्या गुच्छांसारखे.”
किंवा कदाचित, “कारंज्याच्या काठांवर.”
शब्दशः “टाळू.”