गीतरत्न ६:१-१३

  • यरुशलेमच्या मुली ()

  • तरुणी (२, ३)

    • “मी माझ्या सख्याची आणि तो माझा आहे” ()

  • राजा (४-१०)

    • तू तिरसा नगरीसारखी सुंदर आहेस ()

    • स्त्रियांचे शब्द (१०)

  • तरुणी (११, १२)

  • राजा (आणि इतर जण) (१३क)

  • तरुणी (१३ख)

  • राजा (आणि इतर जण) (१३ग)

 “हे सर्वात सुंदर मुली,कुठे आहे तुझा सखा? तो कोणत्या वाटेने गेला? आम्हीही तुझ्यासोबत त्याला शोधतो.”  २  “माझा सखा त्याच्या बागेत;त्याच्या सुगंधी वनस्पतींच्या ताटव्यांजवळ गेलाय. तो बागांमध्ये मेंढरं चारायला आणि भुईकमळं तोडायला गेलाय.+  ३  मी माझ्या सख्याची आणि तो माझा आहे.+ तो भुईकमळांमध्ये कळप चारतोय.”+  ४  “माझ्या सखे, तू तिरसा*+ नगरीसारखी सुंदर;+यरुशलेमसारखी रूपवान आहेस.+ आपल्या झेंड्यांभोवती उभ्या असलेल्या सैन्यांसारखी तू विस्मयकारक आहेस.+  ५  माझ्याकडे अशी पाहू नकोस,कारण तुझी नजर+ मला कैद करते. तुझे केस गिलादच्या उतारांवरून खाली येणाऱ्‍या बकऱ्‍यांच्या कळपासारखे आहेत.+  ६  तुझे दात धुतलेल्या मेंढ्यांच्या कळपासारखे आहेत. सगळ्यांना जुळी आहेत,एकीनेही आपलं मेंढरू गमावलेलं नाही.  ७  तुझ्या ओढणीमागे तुझे गाल,डाळिंबाच्या फोडीसारखे आहेत.  ८  मला ६० राण्या,८० उपपत्नी आहेत. इतरही अगणित स्त्रिया आहेत.+  ९  पण, कबुतरासारखी असलेली माझी परमसुंदर सखी एकच आहे.+ तिच्या आईची एकुलती एक. तिला जन्म देणाऱ्‍या तिच्या आईची ती लाडकी आहे. मुली तिला पाहून, तिचं कौतुक करतात;राण्या आणि उपपत्नी तिची प्रशंसा करतात. १०  ‘पहाटेसारखी उजळ,चंद्रासारखी सुंदर आणि सूर्यप्रकाशासारखी निर्मळ अशी ही कोण आहे? आपल्या झेंड्यांभोवती उभ्या असलेल्या सैन्यांसारखी विस्मयकारक, अशी ही कोण आहे?’ ”+ ११  “खोऱ्‍यातली हिरवीगार झाडंझुडपं पाहायला,मी अक्रोडच्या बागेत गेले.+ द्राक्षवेलींना कळ्या आल्या* की नाही,डाळिंबांच्या झाडांना मोहर आला की नाही, हे पाहायला मी गेले. १२  पण माझ्या या उत्सुकतेमुळे मी नकळत राजाच्या लोकांच्या रथांजवळ आले.” १३  “हे शुलेमच्या मुली, ये ना, परत ये ना,ये ना! आम्हाला पुन्हा तुझं रूप पाहू दे!” “शुलेमच्या मुलीकडे तुम्ही का पाहता?”+ “ती महनाइमच्या नृत्यासारखी* आहे!”

तळटीपा

किंवा “रम्य.”
किंवा “अंकुर फुटले.”
किंवा “दोन समूहांच्या नृत्यासारखी.”