गीतरत्न ७:१-१३

  • राजा (१-९क)

    • प्रिये, तू किती सुंदर आहेस ()

  • तरुणी (९ख-१३)

    • “मी माझ्या सख्याची आहे, त्याला माझीच ओढ लागली आहे” (१०)

 “हे चारित्र्यवान मुली,जोड्यांमध्ये तुझे पाय किती सुंदर दिसतात! तुझ्या सुडौल मांड्या दागिन्यांसारख्या;कारागिराने घडवलेल्या अलंकारांसारख्या सुरेख आहेत.  २  तुझी नाभी गोल प्याल्यासारखी आहे,ती नेहमी द्राक्षारसाने भरलेली राहो. तुझं पोट म्हणजे गव्हाची रास,त्याच्या सभोवती भुईकमळं आहेत.  ३  तुझे स्तन, पाडसांसारखे,*हरिणीच्या जुळ्यांसारखे आहेत.+  ४  तुझी मान+ हस्तिदंताच्या बुरुजासारखी आहे.+ तुझे डोळे+ बाथ-रब्बीमच्या फाटकाजवळ असलेल्या हेशबोनमधल्या+ तळ्यांसारखे आहेत. तुझं नाक दिमिष्कसमोर असलेल्या लबानोनच्या बुरुजासारखं आहे.  ५  तुझं मस्तक कर्मेलच्या+ शिखरासारखं आहे. तुझे केस*+ जांभळ्या लोकरीसारखे+ आहेत. तुझ्या लांब केसांनी राजाला भुरळ पाडली* आहे.  ६  प्रिये, तू किती सुंदर, किती रूपवान आहेस;मनाला सुख देणाऱ्‍या सगळ्या गोष्टींपेक्षा तू श्रेष्ठ आहेस!  ७  तुझा बांधा खजुराच्या झाडासारखा आहे आणि तुझे स्तन खजुरांच्या गुच्छांसारखे आहेत.+  ८  मी म्हणालो, ‘मी फळं तोडायला खजुराच्या झाडावर चढीन.’ तुझे स्तन द्राक्षांच्या गुच्छांसारखे राहोत,तुझ्या श्‍वासातून सफरचंदांचा सुगंध दरवळत राहो.  ९  तुझ्या ओठांतून* उत्तम द्राक्षारस पाझरत राहो.” “हा द्राक्षारस माझ्या सख्याच्या ओठांतून अलगद उतरो,त्यामुळे गोड झोप लागते. १०  मी माझ्या सख्याची आहे,+त्याला माझीच ओढ लागली आहे. ११  माझ्या सख्या, चल आपण रानात जाऊ;मेंदीच्या झाडांमध्ये विसावा घेऊ.+ १२  पहाटेच उठून आपण द्राक्षमळ्यांत जाऊन द्राक्षवेलींना कळ्या आल्या* की नाही,त्या फुलल्या की नाही,+डाळिंबांना बहर आला की नाही, हे पाहू.+ तिथे मी तुझ्यावर आपल्या प्रेमाचा वर्षाव करीन.+ १३  दूदाफळांचा*+ सुगंध दरवळतोय;दारांजवळ सगळ्या प्रकारची उत्तम फळं;+जुनी आणि नवी फळं आहेत. माझ्या सख्या, मी ती तुझ्यासाठी ठेवली आहेत.

तळटीपा

किंवा “हरिणीच्या पाडसांसारखे.”
किंवा “कैद केलं.”
शब्दशः “तुझं डोकं.”
शब्दशः “टाळू.”
किंवा “अंकुर फुटले.”
बटाट्याच्या जातीचं, फळ देणारं एक झाड.