जखऱ्‍या १२:१-१४

  • यहोवा यहूदाचं आणि यरुशलेमचं रक्षण करेल (१-९)

    • यरुशलेम ‘एक जड दगड’ ()

  • ज्याला भोसकण्यात आलं त्याच्यासाठी शोक (१०-१४)

१२  देवाकडून असलेला संदेश: ज्या यहोवा देवाने आकाश पसरवलं,+पृथ्वीचा पाया घातला,+आणि माणसात जीवनाचा श्‍वास फुंकला,तो म्हणतो, “इस्राएलबद्दल यहोवाचा असा संदेश आहे: २  मी यरुशलेमला असा प्याला* बनवीन, जो पिऊन आजूबाजूची राष्ट्रं लटपटतील. यहूदाला आणि यरुशलेमला वेढा घातला जाईल.+ ३  त्या दिवशी मी यरुशलेमला सगळ्या राष्ट्रांसाठी एखाद्या जड दगडासारखं करीन. जो कोणी तो उचलेल, तो जबर जखमी होईल.+ पृथ्वीवरची सगळी राष्ट्रं यरुशलेमविरुद्ध गोळा होतील.”+ ४  यहोवा म्हणतो, “त्या दिवशी मी प्रत्येक घोड्याला गोंधळून सोडीन आणि त्याच्यावर स्वारी करणाऱ्‍याला वेडं करीन. माझी नजर यहूदाच्या घराण्यावर राहील. पण, राष्ट्रांच्या सगळ्या घोड्यांना मी आंधळं करीन. ५  आणि यहूदाचे शेख* आपल्या मनात म्हणतील, ‘यरुशलेमचे राहणारे आपल्यासाठी पाठबळ आहेत. कारण सैन्यांचा यहोवा त्यांचा देव आहे.’+ ६  त्या दिवशी मी यहूदाच्या शेखांना लाकडांमध्ये पेटलेल्या आगीसारखं करीन; नुकत्याच कापलेल्या धान्याच्या पेंढ्यांमधल्या एखाद्या जळत्या मशालीसारखं मी त्यांना करीन.+ ते आपल्या उजवीकडच्या व डावीकडच्या सगळ्या राष्ट्रांना भस्म करतील.+ आणि यरुशलेमचे रहिवासी परत आपल्या जागी, यरुशलेममध्ये राहतील.+ ७  यहोवा आधी यहूदाचे तंबू वाचवेल, आणि त्यामुळे दावीदच्या घराण्याचं वैभव आणि यरुशलेममध्ये राहणाऱ्‍या लोकांचं वैभव यहूदापेक्षा जास्त होणार नाही. ८  त्या दिवशी यहोवा एखाद्या ढालीसारखं यरुशलेमच्या लोकांचं रक्षण करेल.+ त्या दिवशी त्यांच्यापैकी जो सगळ्यात दुर्बळ असेल,* तो दावीदसारखा बलवान होईल. आणि दावीदचं घराणं देवासारखं, लोकांच्या पुढे चालणाऱ्‍या यहोवाच्या स्वर्गदूतासारखं होईल.+ ९  त्या दिवशी यरुशलेमवर हल्ला करायला येणाऱ्‍या सगळ्या राष्ट्रांचा मी नक्कीच सर्वनाश करीन.+ १०  मी दावीदच्या घराण्यावर आणि यरुशलेममध्ये राहणाऱ्‍यांवर माझ्या पवित्र शक्‍तीचा* वर्षाव करीन; ते मला याचना करतील आणि मी त्यांच्यावर कृपा करीन. ज्याला त्यांनी भोसकलं,+ त्याच्याकडे ते पाहतील आणि एकुलत्या एका मुलासाठी कोणी आक्रोश करावा, तसा आक्रोश ते त्याच्यासाठी करतील. पहिला जन्मलेला मुलगा मेल्यावर मोठ्याने रडून शोक करावा, तसा शोक ते त्याच्यासाठी करतील. ११  त्या दिवशी यरुशलेममध्ये मोठा शोक होईल. मगिद्दोच्या+ मैदानातल्या हदद-रिम्मोन इथे जसा मोठा शोक झाला होता, तसा मोठा शोक यरुशलेममध्ये होईल. १२  संपूर्ण देश शोक करेल. प्रत्येक जण आपल्या कुटुंबात शोक करेल. दावीदचं घराणं शोक करेल; त्यातले पुरुष एका बाजूला, तर स्त्रिया दुसऱ्‍या बाजूला शोक करतील. नाथानचं+ घराणं शोक करेल; त्यातले पुरुष एका बाजूला, तर स्त्रिया दुसऱ्‍या बाजूला शोक करतील. १३  लेवीचं+ घराणं शोक करेल; त्यातले पुरुष एका बाजूला, तर स्त्रिया दुसऱ्‍या बाजूला शोक करतील. शिमीचं+ घराणं शोक करेल; त्यातले पुरुष एका बाजूला, तर स्त्रिया दुसऱ्‍या बाजूला शोक करतील. १४  आणि उरलेली सगळी घराणीसुद्धा शोक करतील; त्यांतले पुरुष एका बाजूला, तर स्त्रिया दुसऱ्‍या बाजूला शोक करतील.

तळटीपा

किंवा “वाटी.”
शेख म्हणजे कुळाचा प्रमुख. उत्प ३६:१५ ची तळटीप पाहा.
किंवा “जो अडखळेल.”