जखऱ्‍या ४:१-१४

  • पाचवा दृष्टान्त: दिपवृक्ष आणि जैतुनाची दोन झाडं (१-१४)

    • ‘माणसाच्या ताकदीने नाही, तर माझ्या पवित्र शक्‍तीने’ ()

    • लहान गोष्टींच्या दिवसाला तुच्छ लेखू नका (१०)

 मग जो स्वर्गदूत माझ्याशी बोलत होता तो परत आला, आणि एखाद्याला झोपेतून उठवावं तसं त्याने मला उठवलं. २  तो मला म्हणाला: “तुला काय दिसतंय?” तेव्हा मी म्हणालो: “मला सोन्याचा एक दीपवृक्ष* दिसतोय.+ त्याच्या टोकावर एक वाटी आहे, आणि दीपवृक्षावर सात दिवे+ आहेत. हो, सात दिवे! आणि दीपवृक्षावरच्या या दिव्यांना सात नळ्या आहेत. ३  आणि दीपवृक्षाच्या शेजारी जैतुनाची दोन झाडं+ आहेत; एक झाड वाटीच्या उजवीकडे, तर दुसरं वाटीच्या डावीकडे आहे.” ४  मग माझ्याशी बोलणाऱ्‍या स्वर्गदूताला मी विचारलं: “माझ्या प्रभू, या गोष्टींचा काय अर्थ होतो?” ५  तेव्हा माझ्याशी बोलणारा तो स्वर्गदूत मला म्हणाला: “या गोष्टींचा काय अर्थ होतो हे तुला माहीत नाही का?” मी म्हणालो: “नाही माझ्या प्रभू, मला माहीत नाही.” ६  त्यावर तो मला म्हणाला: “जरूब्बाबेलसाठी यहोवाचा असा संदेश आहे: ‘“सैन्याच्या बळाने नाही किंवा माणसाच्या ताकदीने नाही,+ तर माझ्या पवित्र शक्‍तीने* हे सगळं घडून येईल,”+ असं सैन्यांचा देव यहोवा म्हणतो. ७  हे मोठ्या पर्वता! तू कोण आहेस? जरूब्बाबेलसमोर+ तू सपाट मैदान होशील!+ आणि “खूप छान! खूप छान” असा जयजयकार होत असताना, तो मंदिराचा वरचा दगड घेऊन येईल.’” ८  नंतर पुन्हा एकदा मला यहोवाकडून असा संदेश मिळाला: ९  “जरूब्बाबेलच्या हातांनी या मंदिराचा पाया घातलाय+ आणि मंदिराचं बांधकामही त्याचेच हात पूर्ण करतील.+ मग तुम्हाला कळेल, की सैन्यांचा देव यहोवा यानेच मला तुमच्याकडे पाठवलंय. १०  लहान गोष्टींच्या दिवसाला* कोणीही तुच्छ लेखू नये!+ कारण जरूब्बाबेलच्या हातात ओळंबा* पाहून त्यांना खूप आनंद होईल. हे सात डोळे म्हणजे संपूर्ण पृथ्वीवर नजर असलेले यहोवाचे डोळे आहेत.”+ ११  मग मी त्याला विचारलं: “दीपवृक्षाच्या उजवीकडे आणि डावीकडे असलेल्या दोन जैतुनाच्या झाडांचा काय अर्थ होतो?”+ १२  मी दुसऱ्‍यांदा त्याला विचारलं: “सोन्याच्या दोन नळ्यांतून सोनेरी तेल ओतणाऱ्‍या जैतुनाच्या झाडांच्या त्या दोन फांद्यांचा* काय अर्थ होतो?” १३  तेव्हा त्याने मला विचारलं: “या गोष्टींचा काय अर्थ होतो हे तुला माहीत नाही का?” मी म्हणालो: “नाही माझ्या प्रभू, मला माहीत नाही.” १४  तो म्हणाला: “संपूर्ण पृथ्वीच्या प्रभूजवळ उभे राहणारे हे दोन अभिषिक्‍त आहेत.”+

तळटीपा

किंवा “समई.”
किंवा “ज्या दिवशी लहान सुरुवात झाली त्या दिवसाला.”
भिंत सरळ रेषेत बांधली जात आहे की नाही हे पाहण्याचं साधन. यात एका दोरीला खाली वजन बांधलेलं असतं.
म्हणजे, भरपूर फळं लागलेल्या फांद्या.