जखऱ्‍या ७:१-१४

  • ढोंगीपणे केलेल्या उपासाची यहोवा निंदा करतो (१-१४)

    • ‘तुम्ही उपास खरोखर माझ्यासाठीच केला का?’ ()

    • न्यायाने, प्रेमाने आणि दयेने वागा ()

 दारयावेश राजाच्या शासनकाळाच्या चौथ्या वर्षी, किसलेव* महिन्याच्या म्हणजे नवव्या महिन्याच्या चौथ्या दिवशी, जखऱ्‍याला+ यहोवाकडून संदेश मिळाला. २  यहोवाकडून दयेची भीक मिळावी, म्हणून बेथेलच्या लोकांनी शरेसरला आणि रगेम्मेलेक व त्याच्या माणसांना पाठवलं. ३  त्यांनी त्यांना सैन्यांचा देव यहोवा याच्या संदेष्ट्यांकडे आणि मंदिरातल्या याजकांकडे असं विचारायला पाठवलं: “मी वर्षानुवर्षं शोक आणि उपास करत आलोय, तसा पाचव्या महिन्यात करावा का?”+ ४  मग सैन्यांचा देव यहोवा याच्याकडून मला पुन्हा असा संदेश मिळाला: ५  “देशातल्या सगळ्या लोकांना आणि याजकांना असं विचार, की ‘तुम्ही ७० वर्षं,+ पाचव्या आणि सातव्या महिन्यात+ जो उपास आणि शोक केला, तो खरोखर माझ्यासाठीच केला का? ६  तुम्ही खातपीत होता तेव्हा ते स्वतःसाठीच करत नव्हता का? ७  यरुशलेममध्ये आणि तिच्या आसपासच्या नगरांमध्ये जेव्हा लोकवस्ती होती, आणि तिथे शांती होती; तसंच, नेगेबमध्ये आणि शेफीलामध्येही लोकवस्ती होती, तेव्हा यहोवाने त्याच्या पूर्वीच्या संदेष्ट्यांद्वारे ज्या आज्ञा दिल्या होत्या, त्या तुम्ही पाळायला नकोत का?’”+ ८  मग जखऱ्‍याला यहोवाकडून पुन्हा असा संदेश मिळाला: ९  “सैन्यांचा देव यहोवा असं म्हणतो: ‘खरेपणाने न्याय करा,+ एकमेकांशी प्रेमाने*+ आणि दयेने वागा. १०  विधवांना किंवा अनाथांना,*+ गरिबांना किंवा विदेशी लोकांना फसवू नका;+ आपल्या मनात एकमेकांचं वाईट करण्याचं कटकारस्थान रचू नका.’+ ११  पण त्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही.+ त्यांनी त्याच्याकडे पाठ फिरवली आणि आपली अडेल वृत्ती सोडली नाही.+ ऐकू येऊ नये म्हणून त्यांनी आपले कान बंद केले.+ १२  त्यांनी आपलं मन दगडासारखं* कठीण केलं.+ आणि सैन्यांचा देव यहोवा याने पूर्वीच्या संदेष्ट्यांकडून आपल्या पवित्र शक्‍तीद्वारे जे नियम* आणि ज्या गोष्टी त्यांना सांगितल्या होत्या त्या त्यांनी पाळल्या नाहीत.+ म्हणून सैन्यांचा देव यहोवा याचा क्रोध त्यांच्यावर भडकला.”+ १३  “‘मी हाक मारली तेव्हा त्यांनी जसं माझं ऐकलं नाही,+ तसंच त्यांनी हाक मारली तेव्हा मीही त्यांचं ऐकलं नाही,’+ असं सैन्यांचा देव यहोवा म्हणतो. १४  ‘आणि मी वादळी वाऱ्‍याने त्यांची अशा राष्ट्रांमध्ये पांगापांग केली जी त्यांना माहीत नव्हती.+ आणि त्यांच्यामागे त्यांचा देश ओसाड पडला; त्यातून कोणीही आलं-गेलं नाही.+ कारण ‘सुंदर देशाची’ अशी दशा झाली, की बघणाऱ्‍यांच्या मनात दहशत बसली.’”

तळटीपा

किंवा “एकनिष्ठ प्रेमाने.”
किंवा “वडील नसलेल्यांना.”
इथे वापरलेला हिब्रू शब्द हिऱ्‍याला किंवा त्याच्यासारख्या दुसऱ्‍या एखाद्या कठीण दगडाला सूचित करतो.
किंवा “सूचना.”