जखऱ्‍या ८:१-२३

  • यहोवा सीयोनमध्ये खरेपणा आणि शांती आणतो (१-२३)

    • यरुशलेम “खरेपणाचं शहर” ()

    • “एकमेकांसोबत खरं बोला” (१६)

    • उपासाचे दिवस सणाचे दिवस होतील (१८, १९)

    • ‘चला आपण यहोवाची सेवा करू’ (२१)

    • दहा माणसं एका यहुदी माणसाच्या झग्याचा काठ घट्ट धरतील (२३)

 सैन्यांचा देव यहोवा याच्याकडून मला पुन्हा एकदा असा संदेश मिळाला: २  “सैन्यांचा देव यहोवा असं म्हणतो, ‘मी मोठ्या आवेशाने सीयोनचा बचाव करीन,+ आणि क्रोधित होऊन मी तिचं रक्षण करीन.’” ३  “यहोवा म्हणतो: ‘मी सीयोनकडे परत येईन+ आणि यरुशलेममध्ये राहीन.+ यरुशलेम खरेपणाचं* शहर म्हणून ओळखलं जाईल,+ आणि सैन्यांचा देव यहोवा याच्या पर्वताला पवित्र पर्वत म्हटलं जाईल.’”+ ४  “सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, ‘यरुशलेमच्या चौकाचौकांत वृद्ध स्त्री-पुरुष पुन्हा बसतील. आपल्या आयुष्याची बरीच वर्षं जगल्यामुळे, ते हातात काठी घेऊन बसतील.+ ५  आणि शहरातले चौक तिथे खेळणाऱ्‍या मुला-मुलींनी गजबजून जातील.’”+ ६  “सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, ‘त्या दिवसांत, या लोकांपैकी उरलेल्यांना जरी ही गोष्ट अशक्य वाटली, तरी ती माझ्यासाठी अशक्य असेल का?’ असं सैन्यांचा देव यहोवा म्हणतो.” ७  “सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, ‘मी माझ्या लोकांना पूर्वेकडच्या आणि पश्‍चिमेकडच्या राष्ट्रांतून सोडवून आणीन.+ ८  मी त्यांना यरुशलेममध्ये आणीन आणि ते तिथे वस्ती करतील.+ ते माझे लोक होतील आणि खरेपणाने* व नीतीने वागणारा मी त्यांचा देव होईन.’”+ ९  “सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, ‘संदेष्टे+ सांगत आहेत त्या गोष्टी ऐकणाऱ्‍या लोकांनो! तुम्ही हिंमत धरा!*+ या गोष्टी, सैन्यांचा देव यहोवा याच्या मंदिराचा पाया घालण्यात आला, त्या दिवशीही सांगण्यात आल्या होत्या. १०  याआधी माणसांना किंवा जनावरांना त्यांच्या कामाची मजुरी दिली जात नव्हती.+ आणि शत्रूंमुळे प्रवास करणं धोकादायक झालं होतं. कारण मी सगळ्या माणसांना एकमेकांच्या विरुद्ध केलं होतं.’ ११  ‘पण आता, मी पूर्वी जसा वागलो तसा या उरलेल्या लोकांसोबत वागणार नाही,’+ असं सैन्यांचा देव यहोवा म्हणतो. १२  ‘कारण शांतीचं बी पेरलं जाईल आणि द्राक्षवेल आपलं फळ देईल; पृथ्वी आपलं उत्पन्‍न देईल+ आणि आकाशातून दव पडेल. या सगळ्या गोष्टी मी उरलेल्या लोकांना वारसा म्हणून देईन.+ १३  हे यहूदाच्या आणि इस्राएलच्या घराण्या! राष्ट्रं तुमची नावं शाप देताना वापरायची.+ पण मी तुम्हाला वाचवीन आणि यापुढे ती राष्ट्रं तुमची नावं आशीर्वाद देताना वापरतील.+ तुम्ही घाबरू नका!+ हिंमत धरा!’*+ १४  कारण सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, ‘“तुमच्या वाडवडिलांनी मला क्रोध आणल्यामुळे मी तुमच्यावर संकट आणण्याचा पक्का निश्‍चय केला होता, आणि त्या बाबतीत मी माझा विचारही बदलला नव्हता,”* असं सैन्यांचा देव यहोवा म्हणतो.+ १५  “तसंच, आता मी यरुशलेमसाठी आणि यहूदाच्या घराण्यासाठी चांगलं करण्याचा पक्का निश्‍चय केलाय.+ म्हणून तुम्ही घाबरू नका!”’+ १६  ‘तुम्ही या गोष्टी करा: एकमेकांसोबत खरं बोला+ आणि आपल्या शहराच्या दरवाजांत खरेपणाने न्याय करा; असा न्याय करा ज्यामुळे शांती निर्माण होईल.+ १७  आपल्या मनात एखाद्याचं वाईट करण्याचं कटकारस्थान रचू नका+ आणि खोट्या शपथेची आवड धरू नका.+ कारण या सगळ्या गोष्टींचा मला तिरस्कार आहे,’+ असं यहोवा म्हणतो.” १८  सैन्यांचा देव यहोवा याच्याकडून मला पुन्हा असा संदेश मिळाला: १९  “सैन्यांचा देव यहोवा असं म्हणतो, ‘चौथ्या, पाचव्या, सातव्या आणि दहाव्या महिन्यांतले उपासांचे दिवस,+ यहूदाच्या घराण्यासाठी आनंदाचे आणि हर्षाचे दिवस होतील; ते आनंदोत्सवाने सण साजरा करण्याचे दिवस होतील.+ म्हणून खरेपणाची आणि शांतीची आवड धरा.’ २०  सैन्यांचा देव यहोवा असं म्हणतो, ‘पुढे असं होईल, की राष्ट्रा-राष्ट्रांतले आणि पुष्कळ शहरांतले लोक येतील; २१  आणि एका शहरातले लोक दुसऱ्‍या शहरातल्या लोकांकडे जाऊन त्यांना म्हणतील: “चला, आपण लवकर जाऊ! आणि यहोवाकडून दयेची भीक मागू आणि सैन्यांचा देव यहोवा याची सेवा करू. आम्हीसुद्धा चाललोय.”+ २२  तेव्हा, मोठमोठी राष्ट्रं आणि राष्ट्रा-राष्ट्रांतले लोक यरुशलेममध्ये सैन्यांचा देव यहोवा याची सेवा करायला आणि यहोवाकडे दयेची भीक मागायला येतील.’+ २३  सैन्यांचा देव यहोवा असं म्हणतो, ‘त्या दिवसांत, वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्‍या सर्व राष्ट्रांमधून+ दहा माणसं एका यहुदी माणसाच्या झग्याचा काठ घट्ट धरतील आणि म्हणतील: “आम्हालाही तुमच्याबरोबर यायचंय.+ कारण आम्ही ऐकलंय, की देव तुमच्यासोबत आहे.”’”+

तळटीपा

किंवा “विश्‍वासूपणाचं.”
किंवा “विश्‍वासाने.”
किंवा “आपले हात बळकट करा.”
किंवा “आपले हात बळकट करा.”
किंवा “त्याचा मला पस्तावा झाला नव्हता.”