दानीएल १२:१-१३

  • ‘अंताचा समय’ आणि त्यानंतर (१-१३)

    • मीखाएल उभा राहील ()

    • सखोल समज असलेले झळकतील ()

    • खरं ज्ञान खूप वाढेल ()

    • दानीएल आपला हिस्सा मिळवण्यासाठी उठेल (१३)

१२  त्या वेळी तुझ्या लोकांच्या वतीने उभा राहणारा महान अधिकारी,+ म्हणजे मीखाएल*+ उभा राहील. आणि राष्ट्र निर्माण झालं तेव्हापासून कधीही आला नाही असा संकटाचा काळ त्या वेळी येईल. पण त्या वेळी तुझे लोक वाचतील;+ ज्यांची नावं पुस्तकात+ लिहिण्यात आली आहेत ते सगळे वाचतील. २  आणि पृथ्वीच्या मातीत झोपलेले अनेक जण उठतील; काही सर्वकाळाच्या जीवनासाठी, तर काही बदनामी आणि सर्वकाळाचा अपमान सहन करण्यासाठी उठतील. ३  ज्यांच्याकडे सखोल समज आहे ते आकाशाच्या प्रकाशासारखे झळकतील. आणि जे अनेकांना नीतिमत्त्वाच्या मार्गावर आणतात, ते सदासर्वकाळ ताऱ्‍यांसारखे चमकतील. ४  पण हे दानीएल, तू अंताच्या समयापर्यंत+ हे शब्द गुप्त ठेव आणि पुस्तक मोहर लावून बंद कर. अनेक जण शोधत फिरतील* आणि खरं ज्ञान खूप वाढेल.”+ ५  मग मला, दानीएलला आणखी दोन जण तिथे उभे असलेले दिसले. एक जण नदीच्या या किनाऱ्‍यावर, तर दुसरा नदीच्या त्या किनाऱ्‍यावर उभा होता.+ ६  त्यातल्या एकाने, नदीच्या पाण्यावर उभ्या असलेल्या आणि मलमलीचे* कपडे घातलेल्या माणसाला+ विचारलं: “या अद्‌भुत गोष्टी पूर्ण व्हायला आणखी किती काळ बाकी आहे?” ७  तेव्हा नदीच्या पाण्यावर उभ्या असलेल्या आणि मलमलीचे कपडे घातलेल्या माणसाला मी बोलताना ऐकलं. त्याने आपले दोन्ही हात आकाशाकडे वर केले, आणि जो सदासर्वकाळ जिवंत आहे+ त्याच्या नावाने शपथ घेऊन तो म्हणाला: “यासाठी एक काळ, दोन काळ आणि अर्धा काळ ठरवण्यात आला आहे.* पवित्र लोकांच्या ताकदीचा चुराडा व्हायचं संपेल,+ तेव्हा या गोष्टी पूर्ण होतील.” ८  मी या गोष्टी ऐकल्या, पण मला त्या समजल्या नाहीत.+ म्हणून मी म्हणालो: “माझ्या प्रभू, या सगळ्या गोष्टींचा काय परिणाम होईल?” ९  त्यावर तो मला म्हणाला: “हे दानीएल, आता जा. कारण या गोष्टी अंताच्या समयापर्यंत गुप्त ठेवून त्यांवर मोहर लावण्यात आली आहे.+ १०  अनेक जण स्वतःला शुद्ध व शुभ्र करतील आणि ते पारखले जातील.+ पण दुष्ट लोक दुष्टपणे वागत राहतील, आणि त्यांच्यापैकी एकालाही या गोष्टी समजणार नाहीत. सखोल समज असलेल्यांना मात्र या गोष्टी समजतील.+ ११  नियमितपणे दिलं जाणारं बलिदान+ काढून टाकलं जाईल आणि उद्ध्‌वस्त करणारी घृणास्पद गोष्ट उभी केली जाईल,+ तेव्हापासून १,२९० दिवस लोटतील. १२  जो १,३३५ दिवस संपेपर्यंत आतुरतेने* वाट पाहतो तो सुखी आहे! १३  तू मात्र शेवटपर्यंत खंबीर राहा. तू विसावा घेशील, पण नेमलेली वेळ येईल तेव्हा तू तुझा हिस्सा* मिळवण्यासाठी पुन्हा उठशील.”+

तळटीपा

म्हणजे, “देवासारखा कोण आहे?”
किंवा “त्याचं [म्हणजे, पुस्तकाचं] सखोल परीक्षण करतील.”
म्हणजे, साडेतीन काळ ठरवण्यात आले आहेत.
किंवा “धीराने.”
किंवा “प्रतिफळ.”