नहूम १:१-१५

  • देव शत्रूंवर सूड उगवतो (१-७)

    • आपलीच उपासना केली जावी अशी देवाची अपेक्षा ()

    • यहोवामध्ये शरण घेणाऱ्‍यांची तो काळजी घेतो ()

  • निनवेचा सर्वनाश (८-१४)

    • संकट दुसऱ्‍यांदा येणार नाही ()

  • यहूदासाठी आनंदाच्या संदेशाची घोषणा (१५)

 हे एल्कोश इथल्या नहूम* याला झालेल्या दृष्टान्ताचं पुस्तक आहे. निनवेविरुद्ध न्यायदंडाची घोषणा:+  २  फक्‍त आपलीच उपासना केली जावी अशी यहोवा* अपेक्षा करतो;+यहोवा आपल्या शत्रूंना शिक्षा देतो. तो त्यांची वाईट कृत्यं विसरत नाही आणि त्यांच्यावर आपला क्रोध ओततो.+ यहोवा आपल्या वैऱ्‍यांवर सूड उगवतो.  ३  यहोवा लगेच रागवत नाही.+ त्याच्याकडे अफाट शक्‍ती आहे,+पण यहोवा अपराध्यांना योग्य शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही.+ तो विनाश करणाऱ्‍या वाऱ्‍यात आणि वादळात चालतो. आणि ढग त्याच्या पायाची धूळ आहेत.+  ४  तो समुद्राला दम देतो+ आणि त्याला सुकवतो;तो सगळ्या नद्या कोरड्या करतो.+ बाशान आणि कर्मेल सुकून जातात.+ आणि लबानोनची फुलं कोमेजतात.  ५  त्याच्यामुळे पर्वत थरथरतात,आणि टेकड्या विरघळतात.+ त्याच्या चेहऱ्‍यामुळे पृथ्वीचा थरकाप होईल,जग आणि त्यात राहणाऱ्‍या सर्वांचा थरकाप उडेल.+  ६  त्याच्या संतापासमोर कोण उभा राहू शकतो?+ आणि त्याच्या भयानक क्रोधापुढे कोण टिकू शकतो?+ त्याचा राग आगीसारखा ओतला जाईल,आणि त्याच्यामुळे खडकांचे तुकडे होतील.  ७  यहोवा चांगला आहे,+ संकटाच्या दिवशी तो आश्रयाचं ठिकाण होतो.+ त्याच्यात शरण घेणाऱ्‍यांची तो काळजी घेतो.*+  ८  वाहून नेणाऱ्‍या पुराने तो तिच्या* ठिकाणाचा सर्वनाश करेल,आणि काळोख त्याच्या शत्रूंचा पाठलाग करेल.  ९  यहोवाविरुद्ध तू काय कट रचणार? तो तुझा असा सर्वनाश करेल,की त्याला दुसऱ्‍यांदा संकट आणावं लागणार नाही.+ १०  ते काट्यांसारखे गुंतलेले आहेत;ते मद्याच्या नशेत असलेल्यांसारखे आहेत. पण ते सुक्या गवतासारखे भस्म होतील. ११  यहोवाविरुद्ध दुष्ट योजना करणारा,आणि बिनकामाचा सल्ला देणारा तुझ्यातून येईल. १२  यहोवा म्हणतो: “ते खूप ताकदवान आणि असंख्य असले,तरी त्यांना कापून टाकलं जाईल आणि ते नाहीसे होतील. * मी तुला* शिक्षा केली आहे, पण यापुढे मी तुला शिक्षा करणार नाही. १३  आता मी तुझ्यावर असलेलं त्याचं जू* तोडून टाकीन,+आणि तुझ्या बेड्यांचे दोन तुकडे करीन. १४  यहोवाने तुझ्याबद्दल* अशी आज्ञा दिली आहे,‘कोणीही तुझं नाव पुढे चालवणार नाही. तुझ्या देवांच्या मंदिरातल्या* कोरीव आणि धातूच्या मूर्तींचा* मी नाश करीन. तू घृणास्पद आहेस, म्हणून मी तुझ्यासाठी एक कबर बनवीन.’ १५  पाहा, आनंदाचा संदेश सांगणारा,शांतीची घोषणा करणारा+ डोंगरांवरून येत आहे,हे यहूदा, आपले सण साजरे कर,+ आपले नवस फेड,कारण दुष्ट लोक पुन्हा तुझ्यावर हल्ला करणार नाहीत. त्यांचा पूर्णपणे नाश केला जाईल.”

तळटीपा

म्हणजे, “सांत्वन देणारा.”
किंवा “लक्षात ठेवतो.” शब्दशः “ओळखतो.”
म्हणजे, निनवे.
किंवा कदाचित, “तो त्यांच्या मधून जाईल.”
म्हणजे, यहूदा.
म्हणजे, अश्‍शूर.
किंवा “घरातल्या.”
किंवा “ओतीव मूर्तींचा.”