नहेम्या १०:१-३९

  • लोक नियमशास्त्राप्रमाणे वागण्याचं कबूल करतात (१-३९)

    • “आम्ही आमच्या देवाच्या मंदिराकडे दुर्लक्ष करणार नाही” (३९)

१०  ज्यांनी त्या करारावर आपली मोहर लावली+ त्यांची नावं पुढीलप्रमाणे होती: हखल्याहचा मुलगा, म्हणजे राज्यपाल* असलेला नहेम्या, तसंच, सिद्‌कीया, २  सराया, अजऱ्‍या, यिर्मया, ३  पशहूर, अमऱ्‍या, मल्कीया, ४  हत्तूश, शबन्याह, मल्लूख, ५  हारीम,+ मरेमोथ, ओबद्या, ६  दानीएल,+ गिन्‍नथोन, बारूख, ७  मशुल्लाम, अबीया, मियामीन, ८  माज्या, बिल्गइ आणि शमाया; हे याजक आहेत. ९  तसंच, लेव्यांची नावं पुढीलप्रमाणे होती: अजन्याचा मुलगा येशूवा, हेनादादच्या मुलांपैकी बिन्‍नुई, कदमीएल,+ १०  आणि त्यांचे भाऊ शबन्याह, होदीया, कलीता, पलायाह, हानान, ११  मीखा, रहोब, हशब्याह, १२  जक्कूर, शेरेब्याह,+ शबन्याह, १३  होदीया, बानी आणि बनीनू. १४  लोकांच्या प्रमुखांची नावं पुढीलप्रमाणे होती: परोश, पहथ-मवाब,+ एलाम, जत्तू, बानी, १५  बुन्‍नी, अजगाद, बेबाई, १६  अदोनीया, बिग्वई, आदीन, १७  आटेर, हिज्कीया, अज्जूर, १८  होदीया, हाशूम, बेजाइ, १९  हारीफ, अनाथोथ, नोबाई, २०  मग्पीयाश, मशुल्लाम, हेजीर, २१  मशेजबेल, सादोक, यद्दवा, २२  पलत्याह, हानान, अनाया, २३  होशे, हनन्या, हश्‍शूब, २४  हल्लोहेश, पिल्हा, शोबेक, २५  रहूम, हशबना, मासेया, २६  अहीया, हानान, अनान, २७  मल्लूख, हारीम आणि बानाह. २८  तसंच इतर लोकांनी, म्हणजे याजक, लेवी, द्वारपाल, गायक, मंदिरातले सेवक* आणि खऱ्‍या देवाच्या नियमशास्त्राचं पालन करण्यासाठी, ज्यांनी स्वतःला इतर राष्ट्रांच्या लोकांपासून वेगळं केलं होतं,+ त्यांनी, तसंच त्यांच्या बायका, मुलं-मुली आणि या कराराबद्दल समजण्याइतकं वय असलेल्या सर्वांनी, २९  आपल्या भावांसोबत, म्हणजेच त्यांच्यातल्या मुख्य माणसांसोबत मिळून, खऱ्‍या देवाचा सेवक मोशे याच्याद्वारे देण्यात आलेल्या खऱ्‍या देवाच्या नियमशास्त्राप्रमाणे चालण्याची; आणि आपला प्रभू यहोवा याच्या सर्व आज्ञा, न्याय-निर्णय आणि कायदे काळजीपूर्वक पाळण्याची शपथ घेतली. ही शपथ पूर्ण केली नाही, तर आपल्यावर शाप यावा असं त्यांनी म्हटलं. ३०  त्यांनी अशी शपथ घेतली: “आम्ही आमच्या मुली इतर राष्ट्रांतल्या लोकांना देणार नाही आणि आमच्या मुलांसाठी त्यांच्या मुली करणार नाही.+ ३१  जर इतर राष्ट्रांतल्या लोकांनी शब्बाथाच्या दिवशी+ किंवा दुसऱ्‍या एखाद्या पवित्र दिवशी+ कोणतंही धान्य किंवा इतर काही सामान विकायला आणलं, तर आम्ही त्यांच्याकडून काहीही विकत घेणार नाही. तसंच, सातव्या वर्षी आम्ही जमिनीचं पीक घेणार नाही+ आणि सर्व कर्ज माफ करू.+ ३२  शिवाय, आम्ही स्वतःसाठी असा नियम बनवतो, की आमच्यापैकी प्रत्येक जण आपल्या देवाच्या मंदिराच्या सेवेसाठी दर वर्षी शेकेलचा* तिसरा भाग देईल.+ ३३  हे दान शब्बाथाच्या+ आणि नवचंद्राच्या दिवशी*+ दिल्या जाणाऱ्‍या भाकरींच्या थप्प्या,*+ नियमित दिलं जाणारं अन्‍नार्पण+ व होमार्पण, तसंच, ठरलेले सण,+ पवित्र गोष्टी, इस्राएली लोकांकरता प्रायश्‍चित्त म्हणून दिली जाणारी पापार्पणं+ यांसाठी आणि देवाच्या मंदिराच्या सर्व कामांसाठी वापरलं जाईल. ३४  तसंच, नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे, आमचा देव यहोवा याच्या वेदीवर आग जळत राहावी, म्हणून दरवर्षी, ठरलेल्या वेळी याजक, लेवी आणि इतर लोक यांनी आपापल्या कुळांप्रमाणे देवाच्या मंदिरात लाकडं आणावी, यासाठी आम्ही चिठ्ठ्या टाकू.+ ३५  शिवाय, आमच्या जमिनीचं पहिलं पीक आणि सर्व प्रकारच्या फळझाडांची पहिली फळं, आम्ही दरवर्षी यहोवाच्या मंदिरात आणू.+ ३६  त्याच प्रकारे, नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे आमचे प्रथमपुत्र, तसंच, आमच्या जनावरांचे,+ गुराढोरांचे आणि बकऱ्‍या किंवा मेंढरांचे कळप यांतले पहिले जन्मलेले आम्ही मंदिरात आणू. आम्ही त्यांना आमच्या देवाच्या मंदिरात सेवा करणाऱ्‍या याजकांकडे आणू.+ ३७  तसंच, पहिल्या पिकातलं भरडलेलं धान्य,+ आमची दानं, सर्व प्रकारच्या झाडांची फळं,+ नवीन द्राक्षारस आणि तेल,+ हे सर्व आम्ही आमच्या देवाच्या मंदिराच्या कोठारांत* याजकांकडे आणू.+ त्यासोबत आमच्या जमिनीच्या पिकाचा दहावा भाग* आम्ही लेव्यांना देऊ.+ कारण लेवीच, शेती केल्या जाणाऱ्‍या आमच्या सर्व शहरांतून पिकांचा दहावा भाग गोळा करतात. ३८  जेव्हा लेवी दहावा भाग गोळा करतील, तेव्हा याजक, म्हणजे अहरोनचा वंशज लेव्यांसोबत असावा. तसंच, लेव्यांनी त्यांना मिळणाऱ्‍या दहाव्या भागातून दहावा भाग,+ आपल्या देवाच्या मंदिराच्या कोठारांतल्या खोल्यांमध्ये* आणावा. ३९  इस्राएली लोकांनी आणि लेव्यांच्या मुलांनी धान्य, नवीन द्राक्षारस आणि तेल+ यांचं दान कोठारांमध्ये* आणावं.+ कारण तिथेच मंदिरातली भांडी ठेवली जातात. तसंच, सेवा करणारे याजक, द्वारपाल आणि गायकही तिथे राहतात. आम्ही आमच्या देवाच्या मंदिराकडे दुर्लक्ष करणार नाही.”+

तळटीपा

किंवा “तिर्शाथा.” ही पर्शियात, प्रांताच्या राज्यपालासाठी वापरली जाणारी पदवी होती.
किंवा “नथीनीम.” शब्दशः “दिलेले लोक.”
एक शेकेल म्हणजे ११.४ ग्रॅम. अति. ख१४ पाहा.
म्हणजे, अर्पणाच्या भाकरी.
चंद्राची पहिली कोर दिसते तो दिवस.
किंवा “दशांश.”
किंवा “जेवणाच्या खोल्यांत.”
किंवा “जेवणाच्या खोल्यांमध्ये.”
किंवा “जेवणाच्या खोल्यांमध्ये.”