नहेम्या ११:१-३६

  • यरुशलेममध्ये लोक पुन्हा राहू लागतात (१-३६)

११  त्या वेळी, लोकांचे अधिकारी यरुशलेममध्ये राहत होते;+ पण लोकांमधून प्रत्येक दहा जणांपैकी एकाने पवित्र शहरात, म्हणजे यरुशलेममध्ये राहायला यावं, म्हणून लोकांनी चिठ्ठ्या टाकल्या.+ बाकीचे नऊ जण इतर शहरांतच राहणार होते. २  जी माणसं यरुशलेमला येऊन राहायला स्वेच्छेने तयार झाली, त्यांची लोकांनी प्रशंसा केली. ३  यरुशलेममध्ये राहणाऱ्‍या यहूदा प्रांतातल्या प्रमुखांची नावं पुढीलप्रमाणे होती: (उरलेले इस्राएली लोक, याजक, लेवी, मंदिरातले सेवक*+ आणि शलमोनच्या सेवकांची मुलं+ यहूदाच्या इतर शहरांत राहत होती. हे सर्व आपल्या शहरात आपापल्या वारशाच्या जागेत राहत होते.+ ४  यहूदा आणि बन्यामीनच्या वंशजांपैकीही काही जण यरुशलेममध्ये राहत होते.) यहूदाच्या वंशजांमधून अथाया हा होता. अथाया उज्जीयाचा, उज्जीया जखऱ्‍याचा, जखऱ्‍या अमऱ्‍याचा, अमऱ्‍या शपत्याहचा, शपत्याह महललेलचा मुलगा होता आणि महललेल हा पेरेसच्या घराण्यातला होता.+ ५  तसंच, मासेया. मासेया हा बारूखचा, बारूख कोलहोजेचा, कोलहोजे हजायाचा, हजाया अदायाचा, अदाया योयोरीबचा, आणि योयोरीब हा जखऱ्‍याचा मुलगा होता. जखऱ्‍या हा शेलहच्या घराण्यातला होता. ६  पेरेसच्या वंशजांपैकी यरुशलेममध्ये एकूण ४६८ शूर पुरुष राहत होते. ७  बन्यामीनच्या वंशजांतल्या लोकांची नावं पुढीलप्रमाणे होती: सल्लू.+ सल्लू मशुल्लामचा, मशुल्लाम योएदचा, योएद पदायाहचा, पदायाह कोलायाचा, कोलाया मासेयाचा, मासेया ईथीएलचा आणि ईथीएल यशायाचा मुलगा होता. ८  त्याच्यासोबतच गब्बई आणि सल्लाई हेही होते. असे एकूण ९२८ पुरुष होते. ९  जिख्रीचा मुलगा योएल त्यांच्यावर देखरेख करणारा होता आणि त्याच्या खालोखाल हस्सनुवाचा मुलगा यहूदा हा शहराची देखरेख करायचा. १०  याजकांची नावं पुढीलप्रमाणे होती: योयोरीबचा मुलगा यदाया, याखीन,+ ११  आणि सराया. सराया हिल्कीयाचा, हिल्कीया मशुल्लामचा, मशुल्लाम सादोकचा, सादोक मरायोथचा आणि मरायोथ अहीटूबचा मुलगा होता.+ अहीटूब खऱ्‍या देवाच्या मंदिरातला एक महत्त्वाचा अधिकारी होता. १२  आणि मंदिरात काम करणारे त्यांचे भाऊ, असे एकूण ८२२ पुरुष होते. तसंच अदाया. अदाया यरोहामचा, यरोहाम पलल्याहचा, पलल्याह अमसीचा, अमसी जखऱ्‍याचा, जखऱ्‍या पशहूरचा+ आणि पशहूर मल्कीयाचा मुलगा होता. १३  त्याच्यासोबत कुळांचे प्रमुख असलेले त्याचे भाऊ, असे एकूण २४२ पुरुष होते; तसंच अमशसइ. अमशसइ अजरेलचा, अजरेल अहजईचा, अहजई मशिल्लेमोथचा आणि मशिल्लेमोथ इम्मेरचा मुलगा होता. १४  शिवाय, शूर आणि धैर्यवान असलेले त्यांचे भाऊ, असे एकूण १२८ पुरुष होते. जब्दीएल हा त्यांच्यावर देखरेख करणारा होता आणि तो एका प्रतिष्ठित घराण्यातला होता. १५  लेव्यांची नावं पुढीलप्रमाणे होती: शमाया.+ शमाया हश्‍शूबचा, हश्‍शूब अज्रीकामचा, अज्रीकाम हशब्याहचा आणि हशब्याह बुन्‍नीचा मुलगा होता. १६  तसंच लेव्यांच्या प्रमुखांपैकी शब्बथई+ आणि योजाबाद+ हे होते. ते दोघं खऱ्‍या देवाच्या मंदिराचा बाहेरचा कारभार पाहायचे. १७  तसंच मत्तन्याह.+ मत्तन्याह मीखाचा, मीखा जब्दीचा आणि जब्दी आसाफचा मुलगा+ होता. मत्तन्याह स्तुतिगीतं गाणाऱ्‍यांचा संचालक होता. तो प्रार्थनेच्या वेळी स्तुतिगीतं गाण्यात पुढाकार घ्यायचा.+ त्याच्यासोबत उपसंचालक असलेला त्याचा भाऊ बकबुक्याह होता. बकबुक्याह अब्दाचा, अब्दा शम्मुवाचा, शम्मुवा गालालचा आणि गालाल यदूथूनचा मुलगा होता.+ १८  पवित्र शहरात एकूण २८४ लेवी राहत होते. १९  द्वारपालांमध्ये अक्कूब, तल्मोन+ आणि त्यांचे भाऊ, असे एकूण १७२ पुरुष फाटकांवर पहारा द्यायचे. २०  उरलेले इस्राएली, याजक आणि लेवी हे यहूदाच्या इतर शहरांमध्ये आपापल्या वारशाच्या जागेत राहत होते. २१  मंदिरातले सेवक*+ ओफेल+ इथे राहत होते. सीहा आणि गिश्‍पा हे मंदिरातल्या सेवकांवर* अधिकारी होते. २२  उज्जी हा यरुशलेममध्ये लेव्यांवर देखरेख करायचा. उज्जी बानीचा, बानी हशब्याहचा, हशब्याह मत्तन्याहचा+ आणि मत्तन्याह मीखाचा मुलगा होता. मीखा हा आसाफच्या घराण्यातला, म्हणजे गायकांपैकी होता. तो खऱ्‍या देवाच्या मंदिराच्या कामावर अधिकारी होता. २३  गायकांबद्दल राजाची एक खास आज्ञा होती+ आणि त्याप्रमाणे त्यांच्या दररोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एक ठरलेली व्यवस्था होती. २४  तसंच पथायाह. पथायाह हा मशेजबेलचा मुलगा होता. मशेजबेल जेरहच्या घराण्यातला होता आणि जेरह हा यहूदाचा मुलगा होता. पथायाह हा लोकांशी संबंधित असलेल्या सर्व बाबतींत राजाचा सल्लागार होता. * २५  वस्त्या आणि त्यांच्या आसपासची शेतं पुढीलप्रमाणे होती: यहूदा वंशाचे काही लोक किर्याथ-अर्बामध्ये+ आणि त्याच्या आसपासच्या नगरांमध्ये, दीबोनमध्ये आणि त्याच्या आसपासच्या नगरांमध्ये, यकबसेलमध्ये+ आणि त्याच्या आसपासच्या वस्त्यांमध्ये, २६  येशूवामध्ये, मोलादामध्ये,+ बेथ-पलेतमध्ये,+ २७  हसर-शुवालमध्ये,+ बैर-शेबामध्ये आणि त्याच्या आसपासच्या नगरांमध्ये, २८  सिक्लागमध्ये,+ मकोनामध्ये आणि त्याच्या आसपासच्या नगरांमध्ये, २९  एन-रिम्मोनमध्ये,+ सारयामध्ये+ आणि यर्मूथमध्ये, ३०  जानोहमध्ये,+ अदुल्लममध्ये आणि त्याच्या वस्त्यांमध्ये, लाखीशमध्ये+ आणि त्याच्या शेतांमध्ये, अजेकामध्ये+ आणि त्याच्या आसपासच्या नगरांमध्ये राहत होते. ते बैर-शेबापासून थेट हिन्‍नोमच्या खोऱ्‍यापर्यंतच्या प्रदेशात राहू लागले.*+ ३१  बन्यामीन वंशाचे लोक गेबामध्ये,+ मिखमाशमध्ये, अयामध्ये, बेथेलमध्ये+ आणि त्याच्या आसपासच्या नगरांमध्ये, ३२  अनाथोथमध्ये,+ नोबमध्ये,+ अनन्यामध्ये, ३३  हासोरमध्ये, रामामध्ये,+ गित्तइममध्ये, ३४  हादीदमध्ये, सबोइममध्ये, नबल्लाटमध्ये, ३५  लोदमध्ये आणि ओनोमध्ये,+ म्हणजेच कारागिरांच्या खोऱ्‍यामध्ये राहत होते. ३६  आणि यहूदात राहणारे लेव्यांचे काही गट बन्यामीनच्या प्रदेशात राहू लागले.

तळटीपा

किंवा “नथीनीम.” शब्दशः “दिलेले लोक.”
किंवा “नथीनीमांवर.” शब्दशः “दिलेले लोक.”
किंवा “नथीनीम.” शब्दशः “दिलेले लोक.”
शब्दशः “राजाच्या हाताशी होता.”
किंवा “छावणी केली.”