नहेम्या १२:१-४७

  • याजक आणि लेवी (१-२६)

  • भिंतीचं उद्‌घाटन (२७-४३)

  • मंदिरातल्या सेवेसाठी मदत (४४-४७)

१२  शल्तीएलचा मुलगा+ जरूब्बाबेल+ आणि येशूवा+ यांच्यासोबत परत आलेल्या याजकांची आणि लेव्यांची नावं पुढीलप्रमाणे होती: सराया, यिर्मया, एज्रा, २  अमऱ्‍या, मल्लूख, हत्तूश, ३  शखन्याह, रहूम, मरेमोथ, ४  इद्दो, गिन्‍नथोई, अबीया, ५  मियामीन, मादियाह, बिल्गा, ६  शमाया, योयोरीब, यदाया, ७  सल्लू, आमोक, हिल्कीया आणि यदाया. येशूवाच्या दिवसांत हे याजकांचे आणि त्यांच्या भावांचे प्रमुख होते. ८  लेव्यांची नावं पुढीलप्रमाणे होती: येशूवा, बिन्‍नुई, कदमीएल,+ शेरेब्याह, यहूदा आणि मत्तन्याह.+ मत्तन्याह आपल्या भावांसोबत स्तुतिगीतं गाण्यात पुढाकार घ्यायचा. ९  आणि त्यांचे भाऊ बकबुक्याह आणि उन्‍नी त्यांच्यासमोर उभे राहून पहारा द्यायचे.* १०  येशूवाला योयाकीम झाला, योयाकीमला एल्याशीब+ झाला आणि एल्याशीबला योयादा+ झाला. ११  योयादाला योनाथान झाला आणि योनाथानला यद्दवा झाला. १२  योयाकीमच्या दिवसांत आपापल्या कुळांचे प्रमुख असलेल्या याजकांची नावं पुढीलप्रमाणे होती: सरायाच्या+ कुळातून मरायाह; यिर्मयाच्या कुळातून हनन्या; १३  एज्राच्या+ कुळातून मशुल्लाम; अमऱ्‍याच्या कुळातून यहोहानान; १४  मल्लूखीच्या कुळातून योनाथान; शबन्याहच्या कुळातून योसेफ; १५  हारीमच्या+ कुळातून अदना; मरायोथच्या कुळातून हेलकइ; १६  इद्दोच्या कुळातून जखऱ्‍या; गिन्‍नथोनच्या कुळातून मशुल्लाम; १७  अबीयाच्या+ कुळातून जिख्री; मिन्यामीनच्या कुळातून . . . ;* मोवद्याच्या कुळातून पिल्तय; १८  बिल्गाच्या+ कुळातून शम्मुवा; शमायाच्या कुळातून यहोनाथान; १९  योयोरीबच्या कुळातून मत्तनई; यदायाच्या+ कुळातून उज्जी; २०  सल्लाईच्या कुळातून कल्लय; आमोकच्या कुळातून एबेर; २१  हिल्कीयाच्या कुळातून हशब्याह आणि यदायाच्या कुळातून नथनेल. २२  लेव्यांच्या कुळांच्या प्रमुखांची आणि याजकांची नावं, ही एल्याशीब, योयादा, योहानान आणि यद्दवा+ यांच्या दिवसांत, म्हणजे पर्शियाचा राजा दारयावेश याच्या शासनकाळापर्यंत लिहून ठेवण्यात आली. २३  कुळांचे प्रमुख असलेल्या लेव्यांची नावं, एल्याशीबचा मुलगा योहानान याच्या काळापर्यंत, इतिहासाच्या पुस्तकात लिहून ठेवण्यात आली. २४  हशब्याह, शेरेब्याह आणि कदमीएलचा मुलगा+ येशूवा+ हे लेव्यांचे प्रमुख होते. आणि खऱ्‍या देवाचा सेवक दावीद याच्या सूचनांप्रमाणे, त्यांचे भाऊ स्तुती आणि धन्यवाद करण्यासाठी त्यांच्यासमोर उभे राहायचे,+ म्हणजे पहारेकऱ्‍यांचा एक गट दुसऱ्‍या गटासमोर उभा राहायचा. २५  मत्तन्याह,+ बकबुक्याह, ओबद्या, मशुल्लाम, तल्मोन आणि अक्कूब+ हे द्वारपाल+ होते. ते फाटकांजवळ असलेल्या कोठारांवर पहारा द्यायचे. २६  हे सर्व, येशूवाचा+ मुलगा म्हणजे योसादाकचा नातू योयाकीम याच्या दिवसांत, तसंच राज्यपाल असलेला नहेम्या आणि याजक व शास्त्री* असलेला एज्रा+ यांच्या दिवसांत सेवा करायचे. २७  यरुशलेमच्या भिंतींच्या उद्‌घाटनाच्या सोहळ्यासाठी लेव्यांना, ते राहत असलेल्या ठिकाणांहून शोधून यरुशलेमला आणण्यात आलं. धन्यवादाची गीतं गाऊन+ तसंच झांजा, तंतुवाद्यं आणि वीणा* वाजवून हा सोहळा आनंदाने साजरा करण्यासाठी त्यांना आणण्यात आलं. २८  शिवाय, गायकांची मुलं* यार्देनच्या प्रदेशातून एकत्र आली. ती यरुशलेमच्या आसपासच्या सर्व भागांतून, नटोफाच्या लोकांच्या+ वस्त्यांमधून, २९  बेथ-गिलगालमधून+ आणि गेबाच्या+ व अजमावेथच्या+ आसपासच्या परिसरातून आली. कारण गायकांनी यरुशलेमच्या चारही बाजूला स्वतःसाठी वस्त्या बांधल्या होत्या. ३०  मग याजकांनी आणि लेव्यांनी स्वतःला शुद्ध केलं. तसंच लोकांना, फाटकांना आणि भिंतीलाही त्यांनी शुद्ध केलं.+ ३१  त्यानंतर, मी यहूदाच्या अधिकाऱ्‍यांना भिंतीवर आणलं. मग धन्यवादाची गीतं गाण्यासाठी मी दोन मोठे गट तयार केले आणि इतर लोकांना त्यांच्यामागे चालायला सांगितलं. एक गट भिंतीवरून उजवीकडे राखेच्या ढिगाऱ्‍यांच्या फाटकाच्या+ दिशेने निघाला. ३२  होशाया आणि त्याच्यासोबत यहूदाच्या अधिकाऱ्‍यांपैकी अर्धे जण गायकांमागे चालू लागले. ३३  अजऱ्‍या, एज्रा, मशुल्लाम, ३४  यहूदा, बन्यामीन, शमाया आणि यिर्मया हेही त्यांच्यासोबत होते. ३५  त्यांच्यासोबत कर्णे+ घेतलेली याजकांची ही मुलंसुद्धा होती: जखऱ्‍या. जखऱ्‍या योनाथानचा, योनाथान शमायाचा, शमाया मत्तन्याहचा, मत्तन्याह मीखायाचा, मीखाया जक्कूरचा आणि जक्कूर आसाफचा मुलगा+ होता. ३६  आणि त्याचे भाऊ शमाया, अजरेल, मिललई, गिललई, माई, नथनेल, यहूदा आणि हनानी. या सर्वांनी खऱ्‍या देवाचा सेवक दावीद याची वाद्यं+ घेतली होती. आणि शास्त्री* एज्रा+ त्यांच्यापुढे चालत होता. ३७  ते कारंजे फाटकापासून+ दावीदपुराच्या+ जिन्यावरून+ सरळ पुढे गेले आणि दावीदच्या घरावर असलेल्या भिंतीच्या चढावावरून, पूर्वेकडे असलेल्या पाणी फाटकाकडे+ गेले. ३८  धन्यवादाची गीतं गाणारा दुसरा गट उलट दिशेने* चालू लागला. मग मी अर्ध्या लोकांसोबत त्याच्यामागे चालू लागलो. आम्ही भट्ट्यांच्या बुरुजाकडून+ रुंद भिंतीच्या+ दिशेने गेलो. ३९  मग एफ्राईमच्या फाटकावरून+ आणि जुन्या शहराच्या फाटकावरून+ आम्ही मासे फाटक,+ हनानेलचा बुरूज,+ हमयाचा बुरूज आणि मेंढरं फाटक+ असं करत पहारेकऱ्‍याच्या फाटकापर्यंत आलो. ४०  शेवटी, धन्यवादाची गीतं गाणारे दोन्ही गट खऱ्‍या देवाच्या मंदिरासमोर उभे राहिले. मी आणि माझ्यासोबत असलेले अर्धे उपअधिकारीही उभे राहिले. ४१  तसंच, कर्णे घेतलेले याजक एल्याकीम, मासेया, मिन्यामीन, मीखाया, एल्योवेनय, जखऱ्‍या आणि हनन्या, ४२  शिवाय मासेया, शमाया, एलाजार, उज्जी, यहोहानान, मल्कीया, एलाम आणि एजेर हेही तिथे होते. मग इज्रह्‍या याच्या मार्गदर्शनाखाली गायक मोठ्याने गाऊ लागले. ४३  त्या दिवशी त्यांनी पुष्कळ बलिदानं दिली आणि खूप आनंद साजरा केला.+ कारण खऱ्‍या देवाने त्यांना आशीर्वाद दिला होता. स्त्रिया आणि मुलंही आनंदात होती.+ म्हणून यरुशलेममधल्या लोकांच्या आनंदाचा जल्लोष दूरपर्यंत ऐकू येत होता.+ ४४  त्या दिवशी, लोकांनी दिलेली दानं,+ पहिली पिकं+ आणि दहावे भाग*+ साठवण्याच्या कोठारांवर+ काही माणसांना नेमण्यात आलं. नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे,+ शहरांच्या शेतांतून याजकांसाठी आणि लेव्यांसाठी+ असलेला पिकाचा भाग त्यांनी या कोठारांमध्ये साठवायचा होता. यहूदाच्या लोकांनी ही दानं दिली, कारण याजक आणि लेवी मंदिरात सेवा करू लागल्यामुळे त्यांना खूप आनंद झाला होता. ४५  आणि याजकांनी व लेव्यांनी देवाच्या उपासनेशी संबंधित आपापली कामं आणि नेमून दिलेले शुद्धीकरणाचे विधी करायला सुरुवात केली. तसंच, दावीद आणि त्याचा मुलगा शलमोन यांच्या सूचनांप्रमाणे, गायकांनी आणि द्वारपालांनीही आपापली कामं करायला सुरुवात केली. ४६  कारण फार पूर्वी दावीद आणि आसाफ यांच्या काळात, गायकांना मार्गदर्शन करण्यासाठी संचालक होते, तसंच देवाची स्तुती व धन्यवाद करण्यासाठी गीतंही होती.+ ४७  जरूब्बाबेलच्या+ आणि नहेम्याच्या काळात, सर्व इस्राएली लोक गायकांना+ आणि द्वारपालांना+ त्यांच्या दररोजच्या गरजेप्रमाणे दान द्यायचे. तसंच, ते लेव्यांसाठीही दान द्यायचे+ आणि लेवी त्यांतून अहरोनच्या वंशजांचा भाग वेगळा काढायचे.

तळटीपा

किंवा कदाचित, “उपासनेदरम्यान उभे राहायचे.”
हिब्रू शास्त्रात या ठिकाणी एक नाव गाळण्यात आलं आहे.
किंवा “प्रती तयार करणारा.”
किंवा “प्रशिक्षित गायक.”
किंवा “प्रती तयार करणारा.”
किंवा “समोर.”
किंवा “दशांश.”