नीतिवचनं १४:१-३५
१४ जी स्त्री खरंच बुद्धिमान असते, ती आपलं घर बांधते,+पण मूर्ख स्त्री आपल्याच हातांनी ते पाडून टाकते.
२ जो सरळपणे चालतो, तो यहोवाला भिऊन वागतो,पण ज्याचे मार्ग कपटीपणाचे* असतात, तो देवाला तुच्छ लेखतो.
३ मूर्खांचं गर्विष्ठ बोलणं काठीसारखं असतं,पण बुद्धिमानांचे ओठ त्यांचं संरक्षण करतील.
४ गाय-बैल नसले, तर गोठा स्वच्छ राहतो,पण बैलाच्या ताकदीमुळे भरपूर पीक मिळतं.
५ विश्वासू साक्षीदार खोटं बोलणार नाही,पण खोटा साक्षीदार क्षणाक्षणाला लबाड बोलतो.+
६ थट्टा करणारा बुद्धीचा शोध घेतो, तरी त्याला ती सापडत नाही,पण ज्याच्याजवळ समजशक्ती असते, त्याच्यासाठी ज्ञान घेणं सोपी गोष्ट असते.+
७ मूर्ख माणसापासून दूर राहा,कारण त्याच्या ओठांवर तुला ज्ञान सापडणार नाही.+
८ शहाण्या माणसाला बुद्धीमुळे आपला मार्ग कळतो,पण मूर्ख आपल्याच मूर्खपणामुळे फसतात.*+
९ मूर्ख आपला दोष* थट्टेत उडवतात,+पण सरळ लोक समेट करायला तयार असतात.
१० मनाला आपलं दुःख* माहीत असतं,त्याच्या आनंदात दुसरा कोणी सामील होऊ शकत नाही.
११ दुष्टाचं घर नष्ट होईल,+पण सरळ माणसाचा तंबू समृद्ध होईल.
१२ माणसाला एक मार्ग योग्य वाटतो,+पण तो मार्ग शेवटी मृत्यूकडे नेतो.+
१३ हसतानाही मन दुःखी असू शकतंआणि आनंदाचा शेवट शोकाने होऊ शकतो.
१४ देवाचा अनादर करणारा आपल्या कामांचं फळ भोगेल,+आणि चांगल्या माणसाला त्याच्या कार्यांचं प्रतिफळ मिळेल.+
१५ भोळा* प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवतो,पण शहाणा माणूस विचार करून प्रत्येक पाऊल टाकतो.+
१६ बुद्धिमान सावध असतो आणि वाइटापासून दूर राहतो,पण मूर्ख बेपर्वा* असतो आणि फाजील आत्मविश्वास दाखवतो.
१७ लगेच रागावणारा मूर्खपणे वागतो,+पण नीट विचार करून वागणाऱ्याचा द्वेष केला जातो.
१८ भोळे* मूर्खपणे वागतील,पण शहाण्या माणसांच्या डोक्यावर ज्ञानाचा मुकुट असतो.+
१९ वाईट लोकांना चांगल्या लोकांपुढे झुकावं लागेलआणि दुष्ट लोक नीतिमानांच्या फाटकांसमोर वाकतील.
२० गरिबाचे शेजारीही त्याचा द्वेष करतात,+पण श्रीमंत माणसाला भरपूर मित्र असतात.+
२१ जो आपल्या शेजाऱ्याला तुच्छ लेखतो, तो पाप करतो,पण दीनदुबळ्यांना दया दाखवणारा आनंदी असतो.+
२२ जे दुसऱ्याचं वाईट करण्याची योजना करतात, ते भरकटणार नाहीत का?
पण चांगलं करण्याची इच्छा असलेल्यांसोबत लोक एकनिष्ठ प्रेमाने आणि विश्वासूपणे वागतील.+
२३ मेहनत केल्याने नेहमीच फायदा होतो,पण नुसती बडबड केल्याने गरिबी येते.+
२४ बुद्धिमानांची संपत्ती त्यांचा मुकुट आहे;पण मूर्ख आपला मूर्खपणा सोडत नाहीत.+
२५ खरा साक्षीदार जीव वाचवतो,पण खोटा साक्षीदार क्षणाक्षणाला लबाड बोलतो.
२६ यहोवाची भीती बाळगणारा सर्व गोष्टींत त्याच्यावर भरवसा ठेवतो+आणि यामुळे त्याच्या मुलांना आश्रय मिळेल.+
२७ यहोवाची भीती म्हणजे जीवनाचा झरा;ती माणसाला मृत्यूच्या सापळ्यांपासून वाचवते.
२८ मोठी प्रजा म्हणजे राजाचं वैभव,+पण प्रजा नसलेल्या राजाची सत्ता टिकत नाही.
२९ जो लगेच रागावत नाही, तो फार समंजस असतो,+पण उतावळा माणूस आपला मूर्खपणा दाखवतो.+
३० शांत मन शरीराला आरोग्य* देतं,पण ईर्ष्या हाडांना सडवून टाकते.+
३१ दीनदुबळ्या माणसाची फसवणूक करणारा आपल्या निर्माणकर्त्याचा अपमान करतो,+पण जो गरिबाला दया दाखवतो, तो देवाचा गौरव करतो.+
३२ दुष्टाचा त्याच्याच वाईट कामांमुळे नाश होईल,पण नीतिमानाला त्याच्या खरेपणामुळे संरक्षण मिळेल.+
३३ समजशक्ती असलेला माणूस आपल्या बुद्धीचा दिखावा करत नाही,+पण मूर्ख आपल्याला किती ज्ञान आहे, हे दाखवण्याची एकही संधी सोडत नाही.
३४ नीतिमत्त्वामुळे राष्ट्राचा गौरव होतो,+पण पापामुळे राष्ट्रावर कलंक येतो.
३५ सखोल समज दाखवणाऱ्या सेवकामुळे राजाला आनंद होतो,+पण निर्लज्जपणे वागणाऱ्याचा त्याला संताप येतो.+
तळटीपा
^ किंवा “वाकडे.”
^ किंवा कदाचित, “मूर्ख इतरांना फसवतात.”
^ किंवा “भरपाई करण्याला.”
^ किंवा “आपल्या जिवाचा खेद.”
^ किंवा “अनुभव नसलेला.”
^ किंवा “तापट.”
^ किंवा “अनुभव नसलेले.”
^ किंवा “जीवन.”