नीतिवचनं १५:१-३३
१५ सौम्यपणे* दिलेल्या उत्तरामुळे राग शांत होतो,+पण कठोर* शब्दामुळे क्रोध भडकतो.+
२ बुद्धिमानांची जीभ ज्ञानाचा चांगला वापर करते,+पण मूर्खांच्या तोंडून फक्त मूर्खपणाच निघतो.
३ यहोवाची नजर सगळीकडे असते,तो चांगल्या आणि वाईट, सर्व लोकांना पाहतो.+
४ शांतपणे बोललेले शब्द* म्हणजे जीवनाचा वृक्ष,+पण कपटी शब्दांमुळे मन दुखावतं.
५ मूर्ख आपल्या वडिलांनी दिलेल्या शिक्षणाचा* अनादर करतो,+पण शहाणा माणूस ताडन* स्वीकारतो.+
६ नीतिमानाच्या घरात भरपूर संपत्ती असते,पण दुष्टाच्या उत्पन्नामुळे* त्याच्यावर संकट येतं.+
७ बुद्धिमानाचे ओठ बऱ्याच लोकांना ज्ञान देतात,+पण मूर्खाला तसं करण्याची इच्छा नसते.+
८ दुष्टाने दिलेल्या बलिदानाची यहोवाला घृणा वाटते,+पण प्रामाणिक माणसाच्या प्रार्थनेने त्याला आनंद होतो.+
९ यहोवाला दुष्टाच्या मार्गाची घृणा वाटते,+पण जो नीतीने वागण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यावर तो प्रेम करतो.+
१० चांगला मार्ग सोडून देणाऱ्याला शिक्षा नकोशी* वाटते,+पण ताडनाचा तिरस्कार करणारा आपला जीव गमावेल.+
११ कबर* आणि विनाशाचं ठिकाण यहोवापासून लपलेलं नाही,+मग माणसांची मनं त्याच्यापासून कशी लपलेली असतील?+
१२ गर्विष्ठ माणूस आपलं ताडन करणाऱ्याचा* द्वेष करतो.+
तो बुद्धिमानांकडून सल्ला घेत नाही.+
१३ मन आनंदी असेल, तर चेहराही आनंदी दिसतो,पण दुःखामुळे मन खचून जातं.+
१४ समजशक्ती असलेल्या माणसाचं मन ज्ञान शोधतं,+पण मूर्खाच्या तोंडून मूर्खपणाच बाहेर पडतो.+
१५ दुःखी माणसासाठी सगळेच दिवस वाईट असतात,+पण ज्याचं मन आनंदी असतं, त्याच्यासाठी दररोज मेजवानी असते.+
१६ भरपूर संपत्ती असून चिंता* असण्यापेक्षा,+यहोवाची भीती बाळगून गरीब असणं बरं.+
१७ जिथे द्वेष आहे तिथे मेजवानी* करण्यापेक्षा,+प्रेम असलेल्या घरातलं साधं जेवण* बरं.+
१८ तापट माणूस वाद सुरू करतो,+पण जो लगेच रागवत नाही तो भांडण मिटवतो.+
१९ आळश्याचा मार्ग काट्यांच्या कुंपणासारखा असतो,+पण सरळ मनाच्या माणसाची वाट महामार्गासारखी असते.+
२० बुद्धिमान मुलामुळे वडिलांना आनंद होतो,+पण मूर्ख माणूस आपल्या आईला तुच्छ लेखतो.+
२१ ज्याला समज नसते, त्याला मूर्खपणात मौज वाटते,+पण समंजस माणूस सरळ मार्गाने चालत राहतो.+
२२ मनमोकळी चर्चा होत नाही, तेव्हा योजना निष्फळ होतात,पण पुष्कळ जणांच्या सल्ल्यामुळे कामात यश मिळतं.+
२३ योग्य उत्तर दिल्यामुळे* माणसाला खूप आनंद होतो!+
योग्य वेळी बोललेला शब्द किती चांगला असतो!+
२४ सखोल समज असलेल्या माणसाला जीवनाचा मार्ग उंचावर नेतो,+तो त्याला खाली कबरेत* जाण्यापासून वाचवतो.+
२५ गर्विष्ठ माणसाचं घर यहोवा पाडून टाकेल,+पण विधवेच्या जमिनीचं तो रक्षण करेल.*+
२६ दुष्टांच्या योजनांची यहोवाला घृणा वाटते,+पण प्रेमळ बोल त्याला शुद्ध वाटतात.+
२७ बेइमानीची कमाई करणारा आपल्याच घराण्यावर संकट* आणतो,+पण ज्याला लाचखोरीची घृणा वाटते, तो जिवंत राहील.+
२८ नीतिमान माणूस विचार करून उत्तर देतो,*+पण मूर्ख माणूस विचार न करता वाईट गोष्टी बोलतो.
२९ यहोवा दुष्टांपासून फार दूर असतो,पण तो नीतिमानांची प्रार्थना ऐकतो.+
३० तेजस्वी डोळ्यांमुळे* मन आनंदी होतं;चांगल्या बातमीमुळे हाडांना बळ मिळतं.*+
३१ जो जीवन देणारं ताडन ऐकतो,तो बुद्धिमानांमध्ये राहतो.+
३२ जो शिक्षण नाकारतो, तो आपल्या जीवनाला* तुच्छ लेखतो,+पण जो ताडन स्वीकारतो, त्याला समजशक्ती* मिळते.+
३३ यहोवाची भीती माणसाला बुद्धिमानपणे वागायला शिकवते,+नम्रता दाखवल्यामुळे पुढे गौरव होतो.+
तळटीपा
^ किंवा “दुखावणाऱ्या.”
^ किंवा “प्रेमळपणे.”
^ किंवा “आरोग्य देणारी जीभ.”
^ किंवा “सुधारण्यासाठी दिलेला सल्ला.”
^ किंवा “मिळकतीमुळे.”
^ किंवा “कठोर.”
^ हिब्रू भाषेत “शिओल.” शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “आपली चूक सुधारणाऱ्याचा.”
^ किंवा “मनात गोंधळ.”
^ शब्दशः “भाजी.”
^ शब्दशः “धष्टपुष्ट बैल.”
^ शब्दशः “आपल्या तोंडून निघालेल्या उत्तरामुळे.”
^ हिब्रू भाषेत “शिओल.” शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दशः “सीमा टिकवेल.”
^ किंवा “कलंक.”
^ किंवा “कसं उत्तर द्यावं यावर नीट विचार करतो; बोलण्याआधी मनन करतो.”
^ शब्दशः “हाडं जाडी होतात.”
^ किंवा “आनंदी नजरेने पाहिल्यामुळे.”
^ किंवा “जिवाला.”
^ शब्दशः “हृदय.”