नीतिवचनं २:१-२२

  • बुद्धीचं मोल (१-२२)

    • गुप्त खजिन्याप्रमाणे बुद्धी शोध ()

    • “विचारशक्‍ती तुझा सांभाळ करेल” (११)

    • अनैतिक वागणुकीमुळे संकट येतं (१६-१९)

 माझ्या मुला, जर तू माझे शब्द ऐकशीलआणि माझ्या आज्ञा संपत्तीसारख्या साठवून ठेवशील,+  २  जर तू बुद्धीच्या गोष्टी लक्ष देऊन ऐकशील+आणि समंजसपणाकडे मन लावशील;+  ३  जर तू समजशक्‍तीला हाक मारशील+आणि समंजसपणाला मोठ्याने पुकारशील;+  ४  जर तू चांदीप्रमाणे त्यांना शोधशील+आणि गुप्त खजिन्याप्रमाणे त्यांचा शोध घेत राहशील;+  ५  तर यहोवाची भीती काय असते, हे तुला समजेल+आणि तुला देवाचं ज्ञान मिळेल.+  ६  कारण यहोवा स्वतः बुद्धी देतो;+ज्ञान आणि समंजसपणा हे त्याच्याच तोंडून येतात.  ७  तो सरळ लोकांसाठी व्यावहारिक बुद्धी राखून ठेवतो;खरेपणाने चालणाऱ्‍यांसाठी तो एक ढाल आहे.+  ८  तो न्यायाच्या मार्गांवर पहारा देतोआणि आपल्या एकनिष्ठ सेवकांच्या वाटेचं रक्षण करतो.+  ९  नीती, न्याय आणि निःपक्षपणा काय असतो, हेही तुला समजेलआणि योग्य मार्ग कोणता हे तुला कळेल.+ १०  जेव्हा बुद्धी तुझ्या मनात प्रवेश करेल+आणि ज्ञान तुझ्या जिवाला* प्रिय वाटू लागेल,+ ११  तेव्हा विचारशक्‍ती तुझा सांभाळ करेल+आणि समंजसपणा तुझं रक्षण करेल. १२  यामुळे वाईट मार्गापासून तुझा बचाव होईल. जो माणूस घृणास्पद गोष्टी बोलतो,+ १३  जे अंधारात चालण्यासाठीसरळ मार्ग सोडून देतात,+ १४  जे वाईट गोष्टी करण्यात आनंद मानतात,ज्यांना दुष्टपणाच्या घृणास्पद गोष्टी करण्यात मौज वाटते, १५  ज्यांचे मार्ग वाकडे आहेतआणि जे आयुष्यभर कपटीपणाने चालतात, त्यांच्यापासून तुझा बचाव होईल. १६  बुद्धी तुला वाईट चालीच्या* स्त्रीपासून;गोड* बोलणाऱ्‍या अनैतिक* स्त्रीपासून वाचवेल.+ १७  ती आपल्या तरुणपणाच्या जोडीदाराला* सोडून देते+आणि आपल्या देवाचा करार विसरते. १८  तिच्या घरी जाणं मृत्यूकडे जाण्यासारखं आहेआणि तिच्या घराकडे जाणारे मार्ग* कबरेकडे नेतात.+ १९  तिच्याशी संबंध ठेवणारे* परत येणार नाहीत,ते पुन्हा जीवनाच्या मार्गांवर चालणार नाहीत.+ २०  म्हणून चांगल्या लोकांच्या मार्गावर चालत राहाआणि नीतिमानांच्या वाटांवर टिकून राहा.+ २१  कारण फक्‍त सरळ मनाचे लोक पृथ्वीवर राहतीलआणि जे निर्दोष आहेत* तेच तिच्यावर टिकून राहतील.+ २२  पण दुष्ट लोकांचा पृथ्वीवरून नाश केला जाईल+आणि विश्‍वासघात करणाऱ्‍यांना तिच्यातून उपटून टाकलं जाईल.+

तळटीपा

शब्दशः “परक्या.” हे नैतिक रित्या देवाशी संबंध तुटलेल्या व्यक्‍तीला सूचित करतं.
किंवा “मोहक शब्द.”
शब्दशः “विदेशी.” हे देवापासून नैतिक रित्या दूर गेलेल्या व्यक्‍तीला सूचित करतं.
शब्दशः “जवळच्या मित्राला.” किंवा “नवऱ्‍याला.”
शब्दशः “पायवाटा.”
शब्दशः “तिच्याकडे जाणारे.”
किंवा “जे खरेपणाने वागतात.”