नीतिवचनं ९:१-१८

  • खरी बुद्धी आमंत्रण देते (१-१२)

    • “माझ्यामुळे तुला मोठं आयुष्य लाभेल” (११)

  • मूर्ख स्त्री आमंत्रण देते (१३-१८)

    • “चोरलेलं पाणी गोड लागतं” (१७)

 खऱ्‍या बुद्धीने आपलं घर बांधलंय;तिने सात खांबांवर ते उभारलंय.  २  तिने मांस शिजवून ठेवलंय;चवदार द्राक्षारस तयार केलाय;आणि आपलं मेजही सजवलंय.  ३  तिने आपल्या दासींना पाठवलंय;त्या शहराच्या उंच ठिकाणांहून अशी घोषणा करतात:+  ४  “जे भोळे आहेत,* त्यांनी इथे यावं.” ज्यांना समज नाही, त्यांना ती म्हणते:  ५  “या, माझ्याकडची भाकर खाआणि मी तयार केलेला द्राक्षारस प्या.  ६  आपला भोळेपणा सोडा, म्हणजे तुम्ही जिवंत राहाल;+समजशक्‍तीच्या मार्गाने पुढे चालत राहा.”+  ७  जो थट्टा करणाऱ्‍याची चूक सुधारतो, तो आपला अपमान करून घेतो+आणि जो दुष्टाचं ताडन करतो त्याचं नुकसान होईल.  ८  थट्टा करणाऱ्‍याचं ताडन करू नकोस, नाहीतर तो तुझा द्वेष करेल.+ बुद्धिमानाचं ताडन कर, म्हणजे तो तुझ्यावर प्रेम करेल.+  ९  बुद्धिमान माणसाला ज्ञान दे, म्हणजे तो आणखी बुद्धिमान होईल.+ नीतिमानाला शिकव, म्हणजे तो आपलं ज्ञान वाढवेल. १०  यहोवाची भीती बाळगणं हीच बुद्धीची सुरुवात आहे,+आणि परमपवित्र देवाचं ज्ञान+ हीच समजशक्‍ती आहे. ११  कारण माझ्यामुळे* तुला मोठं आयुष्य लाभेल+आणि तू बरीच वर्षं जगशील. १२  तू बुद्धिमान झालास, तर तुलाच त्याचा फायदा होईल,पण थट्टा करत राहिलास, तर तुलाच त्याचे परिणाम भोगावे लागतील. १३  मूर्ख स्त्री मोठमोठ्याने बोलते.+ तिला कसलंही ज्ञान नसतं; कशाचीच माहिती नसते. १४  ती शहरातल्या उंच ठिकाणी,आपल्या घराच्या दाराजवळ बसते.+ १५  ती येणाऱ्‍या-जाणाऱ्‍यांना;आपल्या रस्त्याने सरळ जाणाऱ्‍यांना हाक मारून म्हणते: १६  “जे भोळे आहेत, त्यांनी इथे यावं.” ज्यांना समज नाही त्यांना ती म्हणते:+ १७  “चोरलेलं पाणी गोड लागतंआणि चोरून खाण्यातच खरी मजा आहे.”+ १८  पण त्यांना माहीत नसतं, की तिचं घर म्हणजे मृतांचं घर;आणि तिच्या घरी जाणारे कबरेच्या* खोल ठिकाणांत जातात.+

तळटीपा

किंवा “ज्यांना अनुभव नाही.”
म्हणजे, बुद्धी.
हिब्रू भाषेत “शिओल.”  शब्दार्थसूची पाहा.