योहानला झालेलं प्रकटीकरण १५:१-८

  • सात स्वर्गदूतांजवळ सात पीडा (१-८)

    • मोशेचं आणि कोकऱ्‍याचं गीत (३, ४)

१५  नंतर, स्वर्गात आणखी एक मोठं आणि अद्‌भुत असं चिन्ह मला दिसलं. मला सात स्वर्गदूत+ दिसले. त्यांच्याजवळ सात पीडा होत्या. या शेवटच्या पीडा आहेत, कारण त्यांद्वारे देवाचा क्रोध संपतो.+ २  मग, अग्नी मिसळलेल्या काचेच्या समुद्रासारखं काहीतरी+ मला दिसलं. आणि जे जंगली पशूवर, त्याच्या मूर्तीवर+ आणि त्याच्या नावाच्या संख्येवर+ विजय मिळवतात,+ ते देवाच्या वीणा हातात घेऊन काचेच्या समुद्राजवळ उभे होते. ३  ते देवाचा सेवक मोशे+ याचं गीत आणि कोकऱ्‍याचं+ गीत गाऊन म्हणत होते: “हे सर्वसमर्थ यहोवा* देवा,+ तुझी कार्यं महान आणि अद्‌भुत आहेत.+ हे अनंतकाळच्या राजा,+ तुझे मार्ग नीतीचे आणि सत्याचे आहेत.+ ४  हे यहोवा* तुझी भीती कोण बाळगणार नाही? तुझा गौरव कोण करणार नाही? कारण, फक्‍त तूच एकनिष्ठ आहेस.+ सर्व राष्ट्रं तुझ्यापुढे येऊन तुझी उपासना करतील.+ कारण तुझा न्याय नीतिमान असल्याचं प्रकट झालं आहे.” ५  यानंतर, स्वर्गात मला साक्षीच्या मंडपाचं पवित्र स्थान*+ उघडलेलं दिसलं,+ ६  आणि ज्यांच्याजवळ सात पीडा होत्या ते सात स्वर्गदूत+ पवित्र स्थानातून बाहेर आले. त्यांनी शुभ्र, तेजस्वी मलमलीची वस्त्रं घातली होती आणि छातीला सोन्याचे पट्टे गुंडाळले होते. ७  चार जिवंत प्राण्यांपैकी एकाने त्या सात स्वर्गदूतांना सात सोन्याच्या वाट्या दिल्या. त्या सदासर्वकाळ जिवंत राहणाऱ्‍या देवाच्या क्रोधाने भरलेल्या होत्या.+ ८  आणि देवाच्या गौरवापासून आणि सामर्थ्यापासून निघालेल्या धुराने संपूर्ण पवित्र स्थान भरून गेलं.+ त्या सात स्वर्गदूतांकडे असलेल्या सात पीडा+ संपेपर्यंत कोणीही पवित्र स्थानात जाऊ शकत नव्हतं.

तळटीपा

अति. क५ पाहा.
अति. क५ पाहा.
म्हणजे, मंदिराचं परमपवित्र स्थान.