यशया १५:१-९
-
मवाबविरुद्ध न्यायाचा संदेश (१-९)
१५ मवाबविरुद्ध न्यायाचा संदेश:+
मवाबच्या आर+ शहराचं तोंड बंद होईल,कारण ते एका रात्रीत उद्ध्वस्त केलं जाईल.
मवाबातल्या कीरचं+ तोंड बंद होईल,कारण ते एका रात्रीत उद्ध्वस्त केलं जाईल.
२ शोक करण्यासाठी लोक देवळात आणि दीबोनमध्ये जातील;+शोक करण्यासाठी ते उच्च स्थानांवर* जातील.
मवाब नबोसाठी+ आणि मेदबासाठी+ शोक करेल.
प्रत्येक माणूस डोक्याचं मुंडण करेल+ आणि आपली दाढी काढेल.+
३ ते गोणपाट घालून रस्त्यांवर येतील.
ते सगळे घरांच्या छतांवर आणि चौकाचौकांत जाऊन शोक करतील;शोक करत ते खाली जमिनीवर पडतील.+
४ हेशबोन आणि एलाले+ आक्रोश करतील;त्यांचा आवाज दूरपर्यंत, याहसपर्यंत+ ऐकू येईल.
मवाबचे शस्त्रधारी सैनिक ओरडत राहतील.
लोकांच्या काळजाचा थरकाप उडेल.
५ माझं मन मवाबसाठी रडेल.
त्याचे पळपुटे सोअरपर्यंत+ आणि एगलाथ-शलि-शीयापर्यंत+ पळून जातील.
लूहीथच्या चढावर जाता-जाता ते रडतील;ओढवलेल्या संकटामुळे ते होरोनाइमकडे जाताना रडतील.+
६ निम्रीमचे जलाशय आटतील;हिरवं गवत वाळून जाईल,सगळी हिरवळ नाहीशी होऊन तिथे काहीच उरणार नाही.
७ म्हणून ते आपलं उरलंसुरलं अन्नधान्य आणि धनसंपत्ती घेऊन,हिवरांच्या झाडांचं खोरं* पार करतील.
८ मवाबच्या संपूर्ण प्रदेशात लोकांच्या ओरडण्याचा आवाज ऐकू येईल.+
त्यांचा आक्रोश एग्लाईमपर्यंत पोहोचेल;त्यांच्या रडण्याचा आवाज बैर-एलीमपर्यंत पोहोचेल.
९ दीमोनचे जलाशय रक्ताने भरून जातील.
तरी मी दीमोनवर आणखी संकट आणीन:
मवाबमधून निसटलेल्यांवर
आणि देशात उरलेल्यांवर मी सिंह पाठवीन.+