यशया २२:१-२५

  • दृष्टान्ताच्या खोऱ्‍याविरुद्ध न्यायाचा संदेश (१-१४)

  • शेबना कारभाऱ्‍याच्या जागी एल्याकीमची नेमणूक (१५-२५)

२२  दृष्टान्ताच्या खोऱ्‍याविरुद्ध* न्यायाचा संदेश:+ तुला काय झालं आहे? तुझे सगळे लोक घरांच्या छतांवर का गेले आहेत?  २  तू एक गजबजलेली, उत्साही नगरी होतीस. तुझ्या इथे मौजमजा चालायची. तुझे मारले गेलेले लोक, तलवारीने किंवा युद्धात मारले गेले नव्हते.+  ३  तुझे सगळे हुकूमशहा एकत्र पळून गेले.+ धनुष्य न वापरताच त्यांना बंदी करण्यात आलं. ते जरी दूर पळून गेले होते,तरी त्यांना पकडून बंदी करण्यात आलं.+  ४  म्हणून मी म्हणालो: “माझ्याकडे पाहू नका,मला मनसोक्‍त रडू द्या,+माझं सांत्वन करायचा प्रयत्न करू नका,माझ्या लोकांचा विनाश झालाय.+  ५  कारण दृष्टान्ताच्या खोऱ्‍यात आलेला हा गोंधळाचा, पराभवाचा आणि भीतीचा दिवस,+सर्वोच्च प्रभू, सैन्यांचा देव यहोवा याच्याकडून आलाय. शहराची भिंत पाडली जात आहे,+आणि लोकांचा आक्रोश डोंगरापर्यंत ऐकू येत आहे.  ६  एलामने+ बाणांनी भरलेला भाता उचलला आहे,तो युद्धाचे रथ आणि घोडेस्वार घेऊन येत आहे,आणि कीरने+ आपली ढाल तयार केली आहे.  ७  तुझी सगळ्यात उत्तम खोरी* युद्धाच्या रथांनी भरून जातील,आणि घोडेस्वार दरवाजाजवळ तैनात होतील.  ८  यहूदाचं संरक्षण काढून घेतलं जाईल. त्या दिवशी तू वनगृहातल्या+ शस्त्रांच्या भांडाराकडे आशेने पाहशील. ९  दावीदपुराच्या संरक्षण भिंतीला अनेक खिंडारं पडलेली तुम्हाला दिसतील,+ आणि तुम्ही खालच्या तळ्यात पाणी साठवून ठेवाल.+ १०  तुम्ही यरुशलेमच्या घरांची पाहणी कराल आणि भिंत मजबूत करण्यासाठी काही घरं पाडाल. ११  तुम्ही जुन्या तळ्याचं पाणी साठवण्यासाठी दोन भिंतींच्या मधे एक हौद बांधाल. पण ज्याने हे केलं त्या महान देवाकडे तुम्ही पाहणार नाही; ज्याने फार पूर्वी हे सगळं घडवून आणलं, त्याच्याकडे तुम्ही लक्ष देणार नाही. १२  त्या दिवशी सर्वोच्च प्रभू, सैन्यांचा देव यहोवा,तुम्हाला रडायला आणि शोक करायला,+डोक्याचं मुंडण करायला आणि गोणपाट घालायला सांगेल. १३  पण त्याऐवजी तुमच्या इथे उत्सव आणि मौजमजा चालेल,गुरंढोरं कापणं आणि मेंढरांची कत्तल करणं चालेल,मांस खाणं आणि द्राक्षारस पिणं चालेल.+ तुम्ही म्हणाल: ‘चला आपण खाऊ-पिऊ, कारण उद्या आपल्याला मरायचंच आहे.’”+ १४  तेव्हा सैन्यांचा देव यहोवा याने माझ्या कानात असं सांगितलं: “‘तुम्ही मरेपर्यंत तुमच्या या पापाचं प्रायश्‍चित्त होणार नाही,’+ असं सर्वोच्च प्रभू, सैन्यांचा देव यहोवा म्हणतो.” १५  सर्वोच्च प्रभू, सैन्यांचा देव यहोवा म्हणतो: “राजमहालाची व्यवस्था पाहणारा कारभारी शेबना+ याच्याकडे जा आणि त्याला असं म्हण: १६  ‘तू इथे काय करत आहेस? तुझं इथे कोण आहे? तू इथे खडकात स्वतःसाठी कबर का तयार करत आहेस?’ शेबना एका उंच जागेवर स्वतःसाठी कबर बनवतोय; तो खडक फोडून स्वतःसाठी विश्रांतीचं ठिकाण तयार करतोय. १७  ‘हे माणसा, पाहा! यहोवा तुला धरेल आणि जोराने खाली आपटेल. १८  तो तुला घट्ट गुंडाळेल आणि चेंडूसारखं खुल्या मैदानात भिरकावून देईल. तिथेच तू मरशील आणि तिथेच तुझे वैभवशाली रथ पडून राहतील. यामुळे तुझ्या मालकाचं घराणं लज्जित होईल. १९  मी तुला तुझ्या हुद्द्‌यावरून काढून टाकीन आणि तुझ्या पदावरून तुला उलथवून देईन. २०  त्या दिवशी, मी हिल्कीयाचा मुलगा एल्याकीम+ या माझ्या सेवकाला बोलावून घेईन. २१  मी तुझा झगा त्याला घालीन आणि तुझा कमरबंद त्याच्या कमरेला बांधीन.+ मी तुझा अधिकार त्याच्या हाती देईन, आणि तो यरुशलेमच्या रहिवाशांचा आणि यहूदाच्या घराण्याचा पिता बनेल. २२  मी दावीदच्या घराण्याची चावी त्याच्या खांद्यावर ठेवीन.+ तो उघडेल आणि कोणीही बंद करू शकणार नाही; तो बंद करेल आणि कोणीही उघडू शकणार नाही. २३  मी त्याला एका खुंटीसारखं मजबूत जागी बसवीन. आणि तो आपल्या वडिलांच्या घराण्यासाठी एक वैभवशाली राजासन ठरेल. २४  त्याच्या वडिलांच्या घराण्याचं सगळं वैभव त्याच्यावर टांगलं जाईल; ज्याप्रमाणे छोटी भांडी, वाट्या आणि मोठी मडकी खुंटीवर टांगली जातात, त्याप्रमाणे त्याची मुलंबाळं आणि त्याचे वंशज त्याच्यावर विसंबून राहतील.’ २५  सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, ‘त्या दिवशी, मजबूत जागी बसवलेली खुंटी काढून टाकली जाईल;+ ती कापून खाली पाडली जाईल आणि तिच्यावर आधारलेला सगळा भार खाली पडून नष्ट होईल, कारण यहोवा स्वतः हे बोललाय.’”

तळटीपा

हे यरुशलेम असावं असं दिसतं.
शब्दार्थसूचीत “खोरं” पाहा.