यशया २३:१-१८
-
सोरविरुद्ध न्यायाचा संदेश (१-१८)
२३ सोरविरुद्ध न्यायाचा संदेश:+
तार्शीशच्या जहाजांनो,+ आक्रोश करा!
कारण बंदराचा नाश करण्यात आला आहे,आणि जहाजं तिथे जाऊ शकत नाहीत.
ही गोष्ट त्यांना कित्तीम+ देशात कळली आहे.
२ समुद्रकिनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांनो, शांत राहा.
समुद्र पार करून येणाऱ्या सीदोनच्या+ व्यापाऱ्यांनी तुला समृद्ध केलं आहे.
३ सोरची मिळकत असलेलं शीहोरचं*+ धान्य आणि नाईलचं पीक,अनेक जलाशयांवरून गेलं,आणि तिने राष्ट्रांना नफा मिळवून दिला.+
४ हे सीदोन, समुद्राच्या मजबूत किल्ल्या!
शरमेने मान खाली घाल. कारण समुद्र असं म्हणाला आहे:
“मला प्रसूतीच्या वेदना झाल्या नाहीत,मी कोणाला जन्म दिला नाही,किंवा तरुण मुलामुलींना वाढवलं नाही.”+
५ इजिप्तबद्दलची बातमी ऐकल्यावर लोकांना जसं दुःख झालं,+तसं सोरबद्दलची बातमी ऐकल्यावर लोकांना दुःख होईल.+
६ समुद्र पार करून तार्शीशला जा!
समुद्रकिनाऱ्यावर राहणाऱ्यांनो, शोक करा!
७ जी फार पूर्वीपासून, अगदी सुरुवातीपासून मौजमजा करायची ती तुमची नगरी हीच का?
तिचे पाय तिला दूरदूरच्या देशात राहण्यासाठी घेऊन जायचे.
८ जी शासकांना नेमायची,जिचे व्यापारी राजकुमार होते,आणि जिच्या सौदागरांना संपूर्ण पृथ्वीवर मानसन्मान होता,+त्या सोरविरुद्ध हे कोणी ठरवलं?
९ सैन्यांचा देव यहोवा याने स्वतः हे ठरवलं आहे.
आपल्या सौंदर्याबद्दल असलेला तिचा गर्व मोडण्यासाठी,संपूर्ण पृथ्वीवर ज्यांचा मानसन्मान केला जायचा,त्या सगळ्यांचा अपमान करण्यासाठी त्याने हे ठरवलं आहे.+
१० हे तार्शीशच्या मुली! नाईल नदीसारखं तुझा देश पार कर.
कारण जहाज बांधण्याचं एकही ठिकाण* आता राहिलं नाही.+
११ देवाने समुद्रावर आपला हात उगारला आहे;त्याने राज्यं हादरवून सोडली आहेत.
यहोवाने फेनिकेच्या मजबूत किल्ल्यांचा नाश करायचा हुकूम दिला आहे.+
१२ तो म्हणतो: “अत्याचार सोसलेली सीदोनची कुमारी!
मौजमजा करायचे तुझे दिवस संपले आहेत.+
ऊठ, समुद्र पार करून कित्तीमला जा.+
पण तिथेही तुला विसावा मिळणार नाही.”
१३ पाहा, खास्दी लोकांचा देश!+
अश्शूरने+ नाही, तर या देशाने तिला जंगली प्राण्यांच्या राहण्याचं ठिकाण बनवलंय.
त्यांनी युद्धस्तंभ उभारून वेढा घातलाय;त्यांनी तिचे मजबूत बुरूज पाडले आहेत,+आणि तिला जमीनदोस्त केलंय.
१४ तार्शीशच्या जहाजांनो, आक्रोश करा!
कारण तुमच्या मजबूत किल्ल्याचा नाश करण्यात आलाय.+
१५ त्या दिवसापासून ७० वर्षांपर्यंत, म्हणजे एखाद्या राजाच्या जीवनकाळाइतक्या वर्षांपर्यंत, सोरची कोणालाही आठवण राहणार नाही.+ मग ७० वर्षांच्या शेवटी वेश्येच्या या गीतात सांगितल्याप्रमाणे सोरसोबत घडेल:
१६ “हे वेश्ये, तुझी कोणालाही आठवण राहिलेली नाही!
आता वीणा* घे आणि शहराभोवती फिर.
तुझी वीणा कुशलतेने वाजव, आणि अनेक गाणी गा,म्हणजे त्यांना तुझी आठवण होईल.”
१७ मग ७० वर्षांच्या शेवटी यहोवा सोरकडे लक्ष देईल. ती परत आपल्या कमाईकडे वळेल, आणि पृथ्वीवरच्या सगळ्या राज्यांसोबत व्यभिचार करेल.
१८ पण तिला व्यवसायात झालेला नफा आणि तिची कमाई यहोवासाठी पवित्र ठरेल. ते साठवून किंवा राखून ठेवलं जाणार नाही. तिची कमाई यहोवाच्या लोकांसाठी असेल, म्हणजे त्यांना खायला पोटभर अन्न आणि घालायला चांगले कपडे मिळतील.+