यशया २७:१-१३

  • यहोवा लिव्याथानाला मारून टाकतो ()

  • द्राक्षमळा म्हटलेल्या इस्राएलबद्दल गीत (२-१३)

२७  त्या दिवशी, यहोवा आपली मोठी, कठीण आणि मजबूत तलवार हाती घेईल,+आणि लिव्याथानाकडे,* त्या चपळ सापाकडे आपलं लक्ष वळवेल;वेटोळे घालणाऱ्‍या त्या सापाला, त्या लिव्याथानाला तो शिक्षा करेल;समुद्रातल्या त्या महाकाय प्राण्याला तो मारून टाकेल.  २  त्या दिवशी तिच्यासाठी* हे गीत गा: “फेसाळलेल्या द्राक्षारसाचा मळा!+  ३  मी, यहोवा, तिचं रक्षण करतो.+ मी वेळोवेळी तिला पाणी घालतो.+ कोणी तिचं नुकसान करू नये,म्हणून रात्रंदिवस मी तिची राखण करतो.+  ४  तिच्यावरचा माझा राग शांत झालाय.+ जर एखाद्याने माझ्यासमोर जंगली गवत आणि काटेरी झुडपं ठेवली,तर मी त्यांना पायांखाली तुडवून एकत्र जाळून टाकीन आणि त्याच्याशी लढाई करीन.  ५  पण असं होऊ नये अशी त्याची इच्छा असेल, तर त्याने माझ्या आश्रयस्थानात यावं. त्याने माझ्याशी सलोखा करावा;माझ्यासोबत शांतीचे संबंध जोडावेत.”  ६  येणाऱ्‍या दिवसांत याकोब मूळ धरेल,इस्राएलला पालवी फुटेल आणि फुलं येतील.+ आणि आपल्या पिकाने ते संपूर्ण भूमी भरून टाकतील.+  ७  त्याला जसं मारलं जात आहे, तसं मारण्याची गरज आहे का? त्याच्या लोकांना जसं ठार मारण्यात आलं, तसं त्याला ठार मारण्याची गरज आहे का?  ८  तिला दूर पाठवून देताना, तू तिला घाबरवशील आणि तिच्याशी वादविवाद करशील. पूर्वेकडच्या वाऱ्‍याच्या दिवशी, तू आपल्या क्रोधाच्या जोरदार झपाट्याने तिला हाकलून देशील.+  ९  अशा प्रकारे याकोबच्या अपराधाचं प्रायश्‍चित्त होईल.+ त्याचं पाप दूर केलं जाईल तेव्हा त्याला हे प्रतिफळ मिळेल: तो वेदीच्या सगळ्या दगडांचा चुनखड्यांच्या चुऱ्‍यासारखा चुराडा करेल,आणि एकही पूजेचा खांब* किंवा धूपस्तंभ शिल्लक राहणार नाही.+ १०  कारण तटबंदीचं शहर ओसाड पडेल;कुरणं रानासारखी रिकामी पडतील आणि सोडून दिली जातील.+ तिथे वासरू चरेल आणि विसावा घेईल,ते तिच्या फांद्या खाईल.+ ११  तिच्या डहाळ्या जेव्हा सुकून जातील,तेव्हा बायका येऊन त्या तोडतील,आणि जाळण्यासाठी वापरतील. या लोकांमध्ये समजबुद्धी नाही.+ म्हणून त्यांचा निर्माणकर्ता त्यांच्यावर दया करणार नाही;ज्याने त्यांना घडवलं तो त्यांच्यावर कृपा करणार नाही.+ १२  हे इस्राएलच्या लोकांनो, एखादा माणूस जसा झाडांवरची फळं पाडतो आणि एकेक करून ती गोळा करतो, तसं यहोवा महानदीच्या* वाहत्या ओढ्यापासून ते इजिप्तच्या खोऱ्‍यापर्यंत*+ विखुरलेल्या तुम्हा सगळ्यांना गोळा करेल.+ १३  त्या दिवशी, एक मोठं शिंग फुंकलं जाईल.+ आणि जे अश्‍शूर देशात नाश होण्याच्या बेतात आहेत+ व इजिप्त देशात पांगलेले आहेत+ ते येतील आणि यरुशलेममध्ये पवित्र डोंगरावर यहोवाला नमन करतील.+

तळटीपा

हे इस्राएलला सूचित करतं असं दिसतं. इथे इस्राएलला एका स्त्रीची उपमा देऊन तिची तुलना एका द्राक्षमळ्याशी करण्यात आली आहे.
म्हणजे, फरात नदी.