यशया ३५:१-१०

  • पृथ्वीवर पुन्हा नंदनवन (१-७)

    • आंधळ्यांचे डोळे उघडतील, बहिऱ्‍यांचे कान खुले होतील ()

  • सुटका झालेल्यांसाठी ‘पवित्रतेचा मार्ग’ (८-१०)

३५  ओसाड प्रदेश आणि कोरडी भूमी आनंदित होईल,+वाळवंट हर्ष करेल आणि केशराच्या फुलांसारखा फुलेल.+  २  तो नक्कीच मोहरून जाईल;+तो अतिशय आनंदित होऊन जल्लोष करेल. त्याला लबानोनचं वैभव दिलं जाईल,+कर्मेल+ आणि शारोनचं ऐश्‍वर्य त्याला मिळेल.+ लोक यहोवाचं वैभव पाहतील,त्यांना त्याचं ऐश्‍वर्य दिसेल.  ३  कमजोर हातांना बळ द्या,लटपटणारे गुडघे स्थिर करा.+  ४  जे घाबऱ्‍या मनाचे आहेत त्यांना म्हणा: “हिंमत धरा! घाबरू नका! पाहा! तुमचा देव तुमच्या शत्रूंवर सूड उगवायला येईल,तो त्यांचा बदला घ्यायला येईल.+ तो येईल आणि तुम्हाला वाचवेल.”+  ५  त्या वेळी, आंधळे पाहू लागतील,+आणि बहिरे ऐकू लागतील.+  ६  तेव्हा लंगडा हरणासारखा उड्या मारेल,+आणि मुक्याची जीभ आनंदाने गीत गाईल.+ ओसाड प्रदेशात पाण्याचे प्रवाह उफाळून बाहेर येतील,आणि वाळवंटात झरे फुटतील.  ७  तापलेली, रखरखीत जमीन पाण्याचा तलाव* होईल,आणि तहानलेल्या जमिनीतून पाण्याचे झरे फुटतील.+ जिथे कोल्हे राहत होते,+तिथे हिरवंगार गवत, बोरू* आणि लव्हाळं उगवेल.  ८  एक राजमार्ग तिथे असेल,+हो, ज्याला ‘पवित्रतेचा मार्ग’ म्हणतात तो तिथे असेल. अशुद्ध असलेला कोणीही त्यावरून जाणार नाही.+ जो त्या मार्गानुसार चालतो, त्याच्यासाठीच तो असेल;मूर्ख त्यावरून जाणार नाही.  ९  तिथे सिंह असणार नाही,कोणताही हिंस्र पशू त्यावर येणार नाही. त्यांच्यापैकी कोणीही तिथे दिसणार नाही;+किंमत देऊन ज्यांना सोडवण्यात आलं आहे, फक्‍त तेच त्यावरून चालतील.+ १०  यहोवाने ज्यांची सुटका केली आहे ते परत येतील;+ते आनंदाने जयघोष करत सीयोनमध्ये येतील.+ सर्वकाळ टिकणारा आनंद त्यांच्या डोक्यावरचा मुकुट होईल.+ ते आनंदाने आणि हर्षाने भरून जातील,शोक आणि दुःख त्यांच्यापासून दूर पळून जाईल.+

तळटीपा

शब्दशः “बोरू असलेले तलाव.”