यशया ४८:१-२२

  • इस्राएलची कानउघाडणी; त्याला शुद्ध केलं जातं (१-११)

  • यहोवा बाबेलच्या विरोधात उठेल (१२-१६क)

  • देवाकडून मिळणारं शिक्षण लाभदायक (१६ख-१९)

  • “बाबेलमधून निघा!” (२०-२२)

४८  हे याकोबच्या घराण्या, ऐक! तू स्वतःला इस्राएलचं नाव लावतोस,+तू यहूदाच्या जलाशयांतून* आला आहेस,तू यहोवाच्या नावाने शपथ घेतोस,+आणि इस्राएलच्या देवाला प्रार्थना करतोस,पण, खरेपणाने आणि नीतीने नाही.+  २  तू स्वतःला पवित्र शहराचा+ रहिवासी म्हणवतोस,आणि ज्याचं नाव सैन्यांचा देव यहोवा आहे,त्या इस्राएलच्या देवाकडे मदतीसाठी वळतोस.+  ३  “मी फार पूर्वीच सुरुवातीच्या गोष्टी सांगितल्या. त्या माझ्या तोंडून निघाल्या,आणि मी त्या जाहीर केल्या.+ मी अचानक पाऊल उचललं आणि त्या घडून आल्या.+  ४  तू किती हट्टी आहेस, हे मला माहीत होतं. तुझी मान लोखंडाची आणि तुझं कपाळ तांब्याचं आहे;+  ५  म्हणून फार पूर्वीच मी तुला या गोष्टी सांगितल्या. त्या घडून येण्याआधीच मी त्या तुला कळवल्या,म्हणजे तू असं म्हणू शकणार नाहीस, की ‘माझ्या दैवताच्या मूर्तीनेच हे केलंय;आणि माझ्या कोरीव मूर्तीच्या व ओतीव* मूर्तीच्या आज्ञेवरूनच हे घडून आलंय.’  ६  तू स्वतः या सगळ्या गोष्टी पाहिल्यास आणि ऐकल्यास. मग, तू त्या जाहीर करणार नाहीस का?+ आतापासून मी तुला नवीन गोष्टी सांगतो,+तुला माहीत नाहीत अशा गुप्त गोष्टी मी तुला ऐकवतो.  ७  ज्या गोष्टी मी घडवून आणतोय त्या नवीन आहेत, जुन्या नाहीत;त्यांबद्दल तू यापूर्वी कधीच ऐकलं नाहीस. नाहीतर तू म्हणशील, ‘मला तर त्या आधीपासूनच माहीत होत्या.’  ८  नाही, तू या गोष्टी ऐकल्या नाहीस.+ त्यांबद्दल तुला काहीच माहीत नाही. पूर्वी तुझे कान बंद होते. मला माहीत आहे, की तू खूप विश्‍वासघातकी आहेस,+आणि तुला जन्मापासूनच अपराधी म्हणण्यात आलंय.+  ९  पण माझ्या नावासाठी मी माझ्या रागावर ताबा ठेवीन,+माझ्या गौरवासाठी मी स्वतःला आवरीन. मी तुझा नाश करणार नाही.+ १०  बघ! मी तुला शुद्ध केलंय, पण चांदीसारखं नाही.+ तुला दुःखाच्या धगधगत्या भट्टीत टाकून मी तुझी पारख केली आहे.*+ ११  माझ्या नावासाठी, हो, माझ्या स्वतःच्या नावासाठी मी असं करीन.+ कारण माझं नाव मी अपवित्र कसं होऊ देऊ?+ मी माझा गौरव दुसऱ्‍या कोणालाही मिळू देत नाही.* १२  हे याकोब, माझं ऐक! हे इस्राएल, मी तुला निवडलंय! मी तोच आहे.+ मीच पहिला आणि मीच शेवटचा आहे.+ १३  मी माझ्या हातांनी पृथ्वीचा पाया घातला,+माझ्या उजव्या हाताने मी आकाश पसरवलं.+ मी हाक मारताच ते उठून उभे राहतात. १४  तुम्ही सगळे एकत्र जमा आणि ऐका. तुमच्या दैवतांपैकी असा कोण आहे ज्याने या गोष्टी जाहीर केल्या? मी, यहोवाने ज्याच्यावर प्रेम केलं,+तो माझ्या इच्छेप्रमाणे बाबेलच्या विरोधात जाईल;+तो खास्दी लोकांवर आपला हात उगारेल.+ १५  मी स्वतः हे बोललोय, आणि मीच त्याला बोलावलंय.+ मीच त्याला आणलंय, आणि तो आपल्या कामात नक्की यशस्वी होईल.+ १६  माझ्या जवळ या आणि हे ऐका. सुरुवातीपासूनच मी उघडपणे बोललो; गुप्तपणे बोललो नाही.+ सांगितलेली गोष्ट घडू लागली, तेव्हापासून मी तिथे आहे.” आणि आता, सर्वोच्च प्रभू यहोवा याने मला आणि त्याच्या पवित्र शक्‍तीला* पाठवलं आहे.* १७  तुला सोडवणारा, इस्राएलचा पवित्र देव यहोवा म्हणतो:+ “मी यहोवा तुझा देव आहे. मी तुला तुझ्या भल्यासाठी शिकवतो,+आणि ज्या मार्गाने तू चाललं पाहिजेस, त्यावरून मी तुला नेतो.+ १८  तू माझ्या आज्ञा पाळल्यास तर किती बरं होईल!+ मग तुझी शांती नदीसारखी,+आणि तुझं नीतिमत्त्व समुद्राच्या लाटांसारखं होईल.+ १९  तुझी संतती* वाळूइतकी अगणित,आणि तुझे वंशज वाळूच्या कणांइतके असंख्य होतील.+ माझ्यासमोरून त्यांचं नाव कधीही मिटवलं किंवा नाहीसं केलं जाणार नाही.” २०  बाबेलमधून निघा!+ खास्दी लोकांपासून पळून जा! आनंदाने जयघोष करा! मोठ्याने घोषणा करा!+ पृथ्वीच्या कानाकोपऱ्‍यांपर्यंत जाहीर करा!+ असं म्हणा: “यहोवाने आपला सेवक याकोब याला किंमत देऊन सोडवलंय.+ २१  तो त्यांना ओसाड ठिकाणांतून घेऊन गेला, तेव्हा ते तहानेने व्याकूळ झाले नाहीत.+ त्याने त्यांच्यासाठी खडकातून पाणी वाहायला लावलं;त्याने खडक फोडला आणि पाणी खळखळ वाहू लागलं.”+ २२  यहोवा म्हणतो, “दुष्टाला कधी शांती नसते.”+

तळटीपा

किंवा कदाचित, “वंशातून.”
किंवा “धातूच्या.”
किंवा कदाचित, “तू दुःखाच्या धगधगत्या भट्टीत होतास, तेव्हा मी तुला निवडलं.”
किंवा “दुसऱ्‍या कोणासोबतही मी माझा गौरव वाटून घेत नाही.”
किंवा “मला त्याची पवित्र शक्‍ती देऊन पाठवलं आहे.”
शब्दशः “बीज.”