यशया ४९:१-२६

  • यहोवाच्या सेवकाचं काम (१-१२)

    • राष्ट्रांसाठी प्रकाश ()

  • इस्राएलला सांत्वन (१३-२६)

४९  हे द्वीपांनो, मी काय म्हणतो ते ऐका. दूरदूरच्या राष्ट्रांनो, माझ्याकडे लक्ष द्या.+ माझा जन्म होण्याआधीच यहोवाने मला बोलावलं.+ मी आईच्या गर्भात होतो तेव्हाच त्याने मला माझ्या नावाने बोलावलं.  २  त्याने माझं तोंड धारदार तलवारीसारखं केलं. आपल्या हाताच्या सावलीत त्याने मला लपवलं.+ त्याने मला एका तीक्ष्ण बाणासारखं केलं आणि मला आपल्या भात्यात लपवलं.  ३  तो मला म्हणाला: “हे इस्राएल, तू माझा सेवक आहेस;+तुझ्याद्वारे मी आपलं वैभव दाखवून देईन.”+  ४  पण मी म्हणालो: “मी उगीचच मेहनत केली. शून्यवत गोष्टींसाठी मी माझी शक्‍ती वाया घालवली. पण यहोवा माझा न्याय करणारा आहे,*आणि माझा देव मला माझं प्रतिफळ* देईल.”+  ५  मी गर्भात होतो तेव्हापासून यहोवाने मला त्याचा सेवक होण्यासाठी घडवलं;मी याकोबला परत त्याच्याकडे आणावं,आणि इस्राएलला त्याच्याकडे गोळा करावं म्हणून त्याने मला घडवलं.+ यहोवाच्या नजरेत मला मानसन्मान मिळेल,माझा देव माझी ताकद बनेल.  ६  तो म्हणाला, “तू फक्‍त यासाठी माझा सेवक नाहीस, की तू याकोबच्या वंशांची पुन्हा स्थापना करावी,आणि इस्राएलच्या वाचलेल्या लोकांना परत आणावं. तर, माझ्याकडून मिळणारं तारण पृथ्वीच्या कानाकोपऱ्‍यांत पोहोचावं,+यासाठीही मी तुला राष्ट्रांकरता प्रकाश म्हणून दिलंय.”+ ७  ज्याला तुच्छ लेखण्यात आलं,+ ज्याचा राष्ट्रांनी तिरस्कार केला आणि जो शासकांचा सेवक आहे, त्याला इस्राएलचा सोडवणारा, पवित्र देव यहोवा म्हणतो:+ “विश्‍वासू देव यहोवा याच्यामुळे,+तुला निवडणाऱ्‍या इस्राएलच्या पवित्र देवामुळे,+राजे तुला पाहताच उठून उभे राहतील आणि अधिकारी तुझ्यासमोर वाकतील.”  ८  यहोवा म्हणतो: “मी तुला कृपेच्या काळात उत्तर दिलं,+आणि तारणाच्या दिवशी मदत केली.+ तुला लोकांसाठी करार म्हणून देता यावं,+देशात पुन्हा लोकवस्ती व्हावी,आणि माझ्या लोकांना ओसाड पडलेल्या आपल्या वारशाच्या जमिनींचा ताबा घेता यावा,म्हणून मी तुझं रक्षण करत आलो.+  ९  कैद्यांना ‘बाहेर या!’ असं तुला म्हणता यावं,+आणि अंधारात असलेल्यांना+ ‘उजेडात या!’ असं तुला बोलता यावं,म्हणून मी तुझं रक्षण करत आलो. ते मेंढरांसारखे रस्त्यांच्या कडेला चरतील,पायवाटांना* लागून असलेली सगळी कुरणं त्यांच्या चरायच्या जागा बनतील. १०  ते उपाशी किंवा तहानलेले राहणार नाहीत.+ त्यांना उन्हाच्या झळा लागणार नाहीत, किंवा तळपत्या सूर्याचा त्रास होणार नाही.+ कारण त्यांच्यावर दया करणारा त्यांचं मार्गदर्शन करेल,+आणि तो त्यांना पाण्याच्या झऱ्‍यांजवळ घेऊन जाईल.+ ११  मी माझ्या सगळ्या डोंगरांना सपाट रस्ता बनवीन,आणि माझे महामार्ग उंच केले जातील.+ १२  पाहा! लोक दुरून येत आहेत.+ ते उत्तरेकडून व पश्‍चिमेकडून,आणि सीनीम लोकांच्या देशातून येत आहेत.”+ १३  आकाशांनो, आनंदाने जयजयकार करा! हे पृथ्वी, आनंदित हो!+ डोंगरांनो, जयघोष करा!+ कारण यहोवाने आपल्या लोकांचं सांत्वन केलं आहे.+ तो दुःखात असलेल्या आपल्या लोकांवर दया करतो.+ १४  पण सीयोन असं म्हणत राहिली: “यहोवाने मला सोडून दिलंय.+ यहोवा मला विसरून गेलाय.”+ १५  अंगावर पाजणारी स्त्री आपल्या बाळाला कधी विसरू शकते का? आपल्या पोटच्या मुलाबद्दल आईला कळवळा वाटत नाही का? एक वेळ आई आपल्या बाळाला विसरेल, पण मी तुला कधीच विसरणार नाही.+ १६  बघ, मी तुला माझ्या तळहातांवर कोरलं आहे. तुझ्या शहराच्या भिंती नेहमी माझ्या नजरेसमोर आहेत. १७  तुझी मुलं घाईने येत आहेत. तुझा नाश करणारे आणि तुला उद्ध्‌वस्त करणारे तुझ्यापासून निघून जातील. १८  आपली नजर वर करून सगळीकडे बघ. ते सगळे एकत्र जमून तुझ्याकडे येत आहेत.+ यहोवा म्हणतो: “माझ्या जीवनाची शपथ,तू त्यांना दागिन्यांसारखं अंगावर घालशील;नवरी जशी स्वतःला अलंकारांनी सजवते, तसं तू स्वतःला त्यांनी सजवशील. १९  तुझ्या जागा ओसाड आणि उद्ध्‌वस्त झाल्या होत्या,आणि तुझा देश उजाड पडला होता.+ पण आता तिथे लोकांना राहण्यासाठी जागा कमी पडेल.+ आणि ज्यांनी तुला गिळून टाकलं,+ ते दूर गेले असतील.+ २०  तुझी मुलं मेल्यावर जी मुलं जन्मली, ती तुला म्हणतील: ‘आम्हाला ही जागा फार कमी पडते. आम्हाला राहायला आणखी जागा दे.’+ २१  आणि तू आपल्या मनात म्हणशील: ‘माझी मुलं तर मेली आहेत, आणि मी तर वांझ आहे,मला कैद करून बंदिवासात नेण्यात आलं होतं. मग मला देण्यात आलेली ही मुलं कोणाची आहेत? यांना कोणी वाढवलं?+ बघा! मी तर एकटीच होते,+मग ही मुलं आली कुठून?’”+ २२  सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो: “पाहा! मी आपल्या हाताने राष्ट्रांना इशारा करीन,आणि राष्ट्रांसाठी निशाणी म्हणून मी आपला झेंडा उभारीन.+ ते तुझ्या मुलांना आपल्या कुशीत घेऊन येतील,आणि तुझ्या मुलींना खांद्यांवर बसवून आणतील.+ २३  राजे तुझा सांभाळ करणारे बनतील,+आणि त्यांच्या राण्या तुझ्या दाया होतील. ते जमिनीवर डोकं टेकवून तुला दंडवत घालतील,+आणि तुझ्या पायांची धूळ चाटतील.+ तेव्हा तुला समजेल की मी यहोवा आहे;जे माझ्यावर आशा ठेवतात, ते कधीही लज्जित होणार नाहीत.”+ २४  शूरवीराच्या हातून कोणी कैद्यांना हिसकावून घेऊ शकतो का? किंवा जुलूम करणाऱ्‍याच्या हातून कोणी बंदिवानांची सुटका करू शकतो का? २५  पण यहोवा असं म्हणतो: “शूरवीराच्या हातून कैद्यांना हिसकावून घेतलं जाईल,+आणि जुलूम करणाऱ्‍यांच्या हातून बंदिवानांची सुटका केली जाईल.+ जे तुझा विरोध करतात त्यांचा मी विरोध करीन,+आणि तुझ्या मुलांना मी वाचवीन. २६  तुला वाईट वागणूक देणाऱ्‍यांना मी त्यांचंच मांस खायला लावीन,आणि गोड द्राक्षारस पिऊन झिंगतात, तसं ते स्वतःचं रक्‍त पिऊन झिंगतील. मग सर्व लोकांना कळून येईल, की मीच यहोवा आहे,+आणि मीच तुझा तारणकर्ता+ व तुझा सोडवणारा,+याकोबचा शक्‍तिशाली देव आहे.”+

तळटीपा

किंवा “यहोवा मला न्याय मिळवून देईल.”
किंवा “माझी मजुरी.”
किंवा कदाचित, “उजाड टेकड्यांना.”