यशया ५८:१-१४

  • खरा आणि दिखाऊ उपास (१-१२)

  • शब्बाथाचा दिवस आनंदाने पाळावा (१३, १४)

५८  “मोठ्याने घोषणा कर! गप्प राहू नकोस! आपला आवाज रणशिंगासारखा वाढव. माझ्या लोकांना, त्यांनी केलेल्या बंडाबद्दल स्पष्टपणे सांग;+याकोबच्या घराण्यातल्या लोकांना त्यांच्या पापांबद्दल उघडपणे सांग.  २  ते दररोज मला शोधतात,आणि माझे मार्ग जाणून घ्यायची इच्छा व्यक्‍त करतात;जसं काय ते नीतीने वागणाऱ्‍या राष्ट्राचे लोक आहेत,आणि आपल्या देवाचे नियम पाळायचं त्यांनी सोडलं नाही.+ ते मला योग्य न्याय करायला सांगतात,जसं काय त्यांना देवाजवळ जायला फार आवडतं.+  ३  आणि आता ते म्हणतात: ‘आम्ही उपास करतो, तेव्हा तू का बघत नाहीस?+ आम्ही आमच्या पापांसाठी शोक करतो, तेव्हा तू लक्ष का देत नाहीस?’+ कारण तुमच्या उपासांच्या दिवशी तुम्ही स्वतःच्याच इच्छा पूर्ण करता,आणि तुमच्या मजुरांचा छळ करता.+  ४  तुमच्या उपासांचा शेवट भांडणांत आणि मारामाऱ्‍यांत होतो. आणि तुम्ही एकमेकांना दुष्टपणाचे ठोसे मारता. पण, अशा प्रकारे उपास करून तुमच्या प्रार्थना स्वर्गात ऐकल्या जातील, अशी अपेक्षा तुम्ही करू शकत नाही.  ५  मला आवडणारा उपासाचा दिवस असा असावा का? त्या दिवशी तुम्ही स्वतःला यातना करून घेता,लव्हाळ्यांसारखं डोकं खाली घालता,आणि गोणपाटाला व राखेला आपला बिछाना करता. तुम्ही याला उपास म्हणता? हा दिवस यहोवाला मान्य आहे असं म्हणता?  ६  खरंतर, मला आवडणारा उपासाचा दिवस असा असायला हवा: त्या दिवशी तुम्ही दुष्टपणाच्या बेड्या काढून टाकाव्यात,जोखडाचे* दोर तोडून टाकावेत,+अत्याचार सोसणाऱ्‍यांना मुक्‍त करावं,+आणि प्रत्येक जोखड मोडून टाकावं;  ७  तुम्ही भुकेल्यांसोबत आपली भाकर वाटून खावी,+गरीब आणि बेघर असलेल्यांना आपल्या घरात आसरा द्यावा,एखादा उघडा दिसला तर त्याला कपडे द्यावेत,+आणि आपल्या बांधवांकडे पाठ फिरवू नये.  ८  मग, तुमचा प्रकाश पहाटेच्या प्रकाशासारखा उजळेल,+आणि तुमच्या जखमा लवकर बऱ्‍या होतील. तुमचं नीतिमत्त्व तुमच्या पुढे चालेल,आणि यहोवाचा गौरव तुमच्या मागे तुमचं रक्षण करेल.+  ९  तुम्ही यहोवाला हाक माराल, तेव्हा तो तुम्हाला उत्तर देईल,तुम्ही मदतीसाठी धावा कराल, तेव्हा तो म्हणेल, ‘मी इथे आहे!’ तुम्ही जर तुमच्यामधून जुलमाचं जोखड काढून टाकलं,आणि इतरांकडे बोट दाखवण्याचं आणि निंदानालस्ती करण्याचं सोडून दिलं;+ १०  तसंच, तुम्हाला स्वतःला जे हवंय ते जर तुम्ही भुकेल्यांना दिलं,+आणि दुःखात असलेल्यांची काळजी घेतली,तर तुमचा प्रकाश अंधारातही चमकेल,आणि तुमचा काळोख भर दुपारच्या उन्हासारखा उजळेल.+ ११  शिवाय, यहोवा नेहमी तुमचं मार्गदर्शन करेल,रुक्ष प्रदेशातही तो तुमचा सांभाळ करेल;+तो तुमची हाडं मजबूत करेल. आणि तुम्ही भरपूर पाणी मिळालेल्या बागेसारखे,+कधीही न आटणाऱ्‍या झऱ्‍यासारखे व्हाल. १२  तुमच्यासाठी ते जुनी आणि उद्ध्‌वस्त झालेली ठिकाणं पुन्हा बांधतील,+आणि जुन्या पिढ्यांनी घातलेला पाया तुम्ही पुन्हा घालाल.+ तुम्हाला पडक्या* भिंतींची डागडुजी करणारे,आणि लोकवस्ती होण्यासाठी रस्ते दुरुस्त करणारे म्हटलं जाईल.+ १३  तुम्ही जर शब्बाथाच्या दिवशी, माझ्या पवित्र दिवशी स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्याचं सोडून दिलं,+आणि शब्बाथाच्या दिवसाला अतिशय आनंदाचा दिवस, यहोवाचा पवित्र दिवस, गौरवाचा दिवस असं मानलं,+तसंच, स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्याऐवजी आणि वायफळ गोष्टी बोलण्याऐवजी, त्या दिवसाचा गौरव केला, १४  तर यहोवामुळे तुमच्या आनंदाला सीमा राहणार नाही. मी तुम्हाला पृथ्वीच्या उच्च स्थानांवर स्वारी करायला लावीन,+तुमचा पूर्वज याकोब याच्या वारशाच्या जमिनीचा उपज मी तुम्हाला खायला देईन.+ यहोवा स्वतः हे बोललाय.”

तळटीपा

शब्दशः “खिंडारं पडलेल्या.”