यशया ६२:१-१२
-
सीयोनला नवीन नाव (१-१२)
६२ सीयोनसाठी मी गप्प राहणार नाही,+यरुशलेमसाठी मी शांत बसणार नाही;जोपर्यंत तिचं नीतिमत्त्व तेजस्वी प्रकाशासारखं झळकत नाही,+आणि तिचं तारण मशालीसारखं पेटत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही.+
२ “हे स्त्री! सगळी राष्ट्रं तुझं नीतिमत्त्व पाहतील,+आणि सर्व राजे तुझं वैभव बघतील.+
तुला एक नवीन नाव दिलं जाईल;+यहोवा स्वतः तुला ते नाव देईल.
३ तू यहोवाच्या हातात असलेला सुंदर मुकुट बनशील,तू तुझ्या देवाच्या तळहातावर असलेली शाही पगडी बनशील.
४ यापुढे कोणीही तुला सोडून दिलेली स्त्री म्हणणार नाही.+
तुझ्या देशाला पुन्हा कधीही ओसाड देश म्हटलं जाणार नाही.+
उलट, ‘ती माझा आनंद आहे,’ असं तुला म्हटलं जाईल,+आणि तुझ्या देशाला ‘विवाहित’ असं नाव पडेल.
कारण तुझ्यामुळे यहोवाला आनंद होईल,आणि तुझा देश विवाहित असल्यासारखा असेल.
५ एखादा तरुण जसं कुमारीशी लग्न करतो,तसं तुझ्यात राहणारे लोक तुझ्याशी लग्न करतील.
वधूमुळे जसा वराला आनंद होतो,तसा तुझ्यामुळे तुझ्या देवाला आनंद होईल.+
६ हे यरुशलेम! मी तुझ्या भिंतींवर पहारेकरी नेमले आहेत.
दिवस असो किंवा रात्र, त्यांनी शांत बसू नये.
हे यहोवाची स्तुती करणाऱ्यांनो,तुम्ही स्वस्थ बसू नका.
७ आणि जोपर्यंत तो यरुशलेमची भक्कम स्थापना करत नाही,आणि संपूर्ण पृथ्वीवर तिला प्रशंसा मिळवून देत नाही,तोपर्यंत त्यालाही स्वस्थ बसू देऊ नका.”+
८ यहोवाने आपल्या उजव्या हाताने, आपल्या शक्तिशाली हाताने अशी शपथ घेतली आहे:
“यापुढे मी तुझं धान्य तुझ्या शत्रूंना खायला देणार नाही,किंवा ज्यासाठी तू कष्ट केलेस, तो तुझा नवा द्राक्षारस विदेशी लोक पिणार नाहीत.+
९ ज्यांनी ते धान्य गोळा केलंय, तेच ते खातील आणि यहोवाची स्तुती करतील;आणि ज्यांनी द्राक्षारस साठवलाय, तेच लोक तो द्राक्षारस माझ्या पवित्र अंगणांत पितील.”+
१० बाहेर पडा! शहराच्या दरवाजांतून बाहेर पडा.
लोकांसाठी रस्ता मोकळा करा.+
महामार्ग तयार करा.
त्यावरचे दगडगोटे काढून टाका.+
लोकांसाठी निशाणी म्हणून झेंडा उभारा.+
११ पाहा! यहोवाने पृथ्वीच्या कानाकोपऱ्यांपर्यंत अशी घोषणा केली आहे:
“सीयोनच्या मुलीला सांगा,‘पाहा! तुझं तारण तुझ्याकडे येत आहे.+
पाहा! त्याचं प्रतिफळ त्याच्याजवळ आहे,आणि जी मजुरी तो देतो ती त्याच्यासमोर आहे.’”+
१२ यहोवाने ज्यांना किंमत देऊन सोडवलं आहे, त्यांना पवित्र लोक असं म्हटलं जाईल,+आणि तुला, ‘हवी असलेली, टाकून न दिलेली नगरी,’ म्हटलं जाईल.+