यशया ८:१-२२

  • अश्‍शूरच्या हल्ल्याविषयी भविष्यवाणी (१-८)

    • महेर-शालाल-हाश-बज (१-४)

  • घाबरू नका⁠​—⁠देव आपल्यासोबत आहे! (९-१७)

  • यशया आणि त्याची मुलं इस्राएलसाठी चिन्हं (१८)

  • नियमशास्त्राकडे वळा, दुष्ट स्वर्गदूतांकडे नाही (१९-२२)

 यहोवा मला म्हणाला: “एक मोठी पाटी घे+ आणि त्यावर एका साध्या लेखणीने ‘महेर-शालाल-हाश-बज’* असं लिही. २  आणि तू हे लिहिलंस याची साक्ष म्हणून दोन विश्‍वासू साक्षीदारांकडून, म्हणजे उरीया+ याजक आणि यवरेख्याचा मुलगा जखऱ्‍या यांच्याकडून लेखी पुरावा घे.” ३  मग मी, संदेष्टी असलेल्या माझ्या बायकोसोबत संबंध ठेवले. ती गरोदर राहिली आणि तिला एक मुलगा झाला.+ तेव्हा यहोवा मला म्हणाला: “त्याचं नाव महेर-शालाल-हाश-बज असं ठेव. ४  कारण तो मुलगा ‘आईबाबा’ असं बोलायला शिकेल, त्याआधीच दिमिष्कची धनसंपत्ती आणि शोमरोनची लूट अश्‍शूरच्या राजापुढे नेली जाईल.”+ ५  यहोवा पुढे मला म्हणाला:  ६  “या लोकांनी संथ वाहणाऱ्‍या शिलोहचं* पाणी नाकारलंय,+आणि रसीन व रमाल्याह यांच्यामुळे ते आनंदी आहेत.+  ७  म्हणून पाहा! यहोवा महानदीचा* जोरदार आणि प्रचंड प्रवाह,म्हणजे अश्‍शूरचा राजा+ आणि त्याची सगळी ताकद त्यांच्याविरुद्ध आणेल. नदीपात्राचं पाणी वर चढत जाऊन काठांवरून ओसंडून वाहतं तसा तो येईल,  ८  आणि यहूदामध्ये शिरेल. तो पुराच्या पाण्यासारखा वाहील आणि गळ्यापर्यंत पोहोचेल;+हे इम्मानुएल!*+ तो आपले पंख पसरून तुझा संपूर्ण देश झाकून टाकेल.”  ९  राष्ट्रांनो, त्यांना हात लावून तर पाहा! तुमचाच चुराडा होईल. पृथ्वीवर असलेल्या दूरदूरच्या देशांनो, ऐका! तुम्ही करा युद्धाची तयारी, पण तुमचे तुकडे-तुकडे होतील!+ तुम्ही करा लढाईची तयारी, पण तुमचे तुकडे-तुकडे केले जातील! १०  तुम्हाला काय योजना आखायची ती आखा, पण ती निष्फळ होईल! तुम्हाला काय बोलायचं ते बोला, पण तसं मुळीच घडणार नाही. कारण देव आमच्यासोबत आहे!*+ ११  यहोवाचा मजबूत हात माझ्यावर होता. आणि मी या लोकांसारखं वागू नये, म्हणून त्याने मला असं बजावून सांगितलं: १२  “हे लोक ज्याला कटकारस्थान म्हणतात, त्याला तुम्ही कटकारस्थान म्हणू नका! ते ज्या गोष्टीला घाबरतात, तिला तुम्ही घाबरू नका; तिला भिऊ नका. १३  तर, सैन्यांचा देव यहोवा यालाच तुम्ही पवित्र माना,+त्याचीच भीती बाळगा,आणि फक्‍त त्याचाच धाक बाळगा.”+ १४  तो तुमच्यासाठी एक पवित्र ठिकाण होईल. पण तो इस्राएलच्या दोन्ही घराण्यांसाठी,ठेच लागण्याचा दगड आणि अडखळण्याचा खडकही होईल.+ यरुशलेमच्या रहिवाशांसाठी,तो एक सापळा आणि जाळं होईल. १५  अनेक जण अडखळून पडतील आणि जखमी होतील;ते सापळ्यात अडकून पकडले जातील. १६  संदेश लिहिलेली गुंडाळी बांधून ठेव;आणि माझ्या शिष्यांमध्ये नियम* मोहर लावून बंद कर! १७  ज्याने याकोबच्या घराण्यापासून आपलं तोंड फिरवलंय,+ त्या यहोवाची मी आतुरतेने वाट पाहीन;+ आणि त्याच्यावर मी आपली आशा ठेवीन. १८  पाहा! मी, आणि यहोवाने मला दिलेली मुलं,+ आम्ही इस्राएलसाठी चिन्हं+ आणि चमत्कार आहोत; आम्ही सीयोन डोंगरावर राहणाऱ्‍या सैन्यांच्या देवाकडून, यहोवाकडून इस्राएलसाठी चिन्हं आणि चमत्कार आहोत. १९  आणि जर ते तुम्हाला म्हणाले: “पुटपुटणाऱ्‍या आणि चिवचिवाट करणाऱ्‍या ज्योतिष्यांकडे किंवा भूतविद्या करणाऱ्‍यांकडे मार्गदर्शन मागा,” तर तसं करणं योग्य राहील का? लोकांनी आपल्या देवाकडे मार्गदर्शन मागू नये का? जिवंत माणसांसाठी त्यांनी मेलेल्यांकडे मार्गदर्शन का मागावं?+ २०  याउलट, मार्गदर्शनासाठी त्यांनी नियमशास्त्राकडे आणि देवाने सांगितलेल्या गोष्टींकडे वळलं पाहिजे. ते जेव्हा देवाच्या वचनाप्रमाणे बोलत नाहीत, तेव्हा त्यांच्याकडे प्रकाश नसतो.+ २१  प्रत्येक जण दुःखी आणि उपाशी होऊन देशभर भटकेल;+ आणि भुकेमुळे व रागामुळे तो आपल्या राजाची निंदा करेल आणि वर पाहून आपल्या देवाला शिव्याशाप देईल. २२  मग तो पृथ्वीवर पाहील, तेव्हा त्याला सगळीकडे फक्‍त दुःख व अंधार; निराशा व संकट आणि उदासीनता व काळोखच दिसेल.

तळटीपा

याचा अर्थ, “लोक शत्रू राष्ट्राला लुटण्यासाठी लवकरच येतील,” असा होतो.
शिलोह हा पाण्याचा पाट होता.
म्हणजे, फरात नदी.
यश ७:१४ पाहा.
“देव आमच्यासोबत आहे,” यासाठी असलेला हिब्रू शब्द इम्मानुएल  आहे. यश ७:१४; ८:८ पाहा.
किंवा “शिक्षण.”