यहोशवा १५:१-६३

  • यहूदाला मिळालेला वारसा (१-१२)

  • कालेबच्या मुलीला जमीन मिळते (१३-१९)

  • यहूदाची शहरं (२०-६३)

१५  यहूदा वंशाच्या घराण्यांना चिठ्ठ्या टाकून जो प्रदेश वाटून देण्यात आला,+ तो प्रदेश अदोमची+ सीमा, झिनचं ओसाड रान आणि नेगेबच्या दक्षिण टोकापर्यंत पसरलेला होता. २  त्यांच्या प्रदेशाच्या दक्षिण सीमेची सुरुवात, क्षार समुद्राच्या* दक्षिण टोकाकडे असलेल्या खाडीपासून झाली.+ ३  आणि ती सीमा, दक्षिणेकडे असलेल्या अक्राब्बीमच्या+ चढावरून झिनपर्यंत गेली. मग पुढे ती कादेश-बर्ण्याच्या+ दक्षिणेपासून हेस्रोन व अद्दारजवळून कर्काकडे वळली. ४  तिथून ती असमोनच्या+ जवळून इजिप्तच्या ओढ्याकडे+ गेली. आणि शेवटी समुद्रापर्यंत* जाऊन संपली; ही त्यांची दक्षिणेकडची सीमा होती. ५  पूर्वेकडची सीमा, क्षार समुद्राचा* किनारा असून यार्देन नदीच्या मुखापर्यंत होती. आणि उत्तरेकडची सीमा, समुद्राच्या खाडीपासून, म्हणजे यार्देन नदीच्या मुखापासून सुरू होऊन,+ ६  पुढे ती बेथ-होग्लापासून+ आणि बेथ-अराबाच्या+ उत्तरेकडून बोहनच्या खडकापर्यंत जात होती; बोहन+ हा रऊबेनचा वंशज होता. ७  ती सीमा पुढे आखोर खोऱ्‍यातल्या+ दबीरपर्यंत गेली, आणि गिलगालला+ उत्तरेकडे वळली; गिलगाल हे अदुम्मीमच्या चढासमोर, ओढ्याच्या दक्षिणेला आहे. तिथून ती सीमा एन-शेमेश+ झऱ्‍याजवळून जाऊन शेवटी एन-रोगेलपर्यंत+ गेली. ८  मग ही सीमा ‘हिन्‍नोमच्या वंशजांच्या खोऱ्‍यातून’+ यबूसी+ शहराकडे, म्हणजे यरुशलेमच्या+ दक्षिण उतारापर्यंत गेली. तिथून ती सीमा ‘हिन्‍नोम खोऱ्‍याच्या’ पश्‍चिमेकडे आणि रेफाईम खोऱ्‍याच्या उत्तरी टोकाकडे असलेल्या डोंगरापर्यंत गेली. ९  त्या डोंगरावरून ती नफ्तोहाच्या झऱ्‍यापर्यंत+ जाऊन, पुढे एफ्रोन डोंगरावर असलेल्या शहरांपासून बालापर्यंत गेली; याला किर्याथ-यारीम+ म्हणूनही ओळखलं जातं. १०  बालापासून वळून ती सीमा पश्‍चिमेकडे सेईर डोंगराकडे गेली, आणि तिथून यारीम डोंगराच्या, म्हणजे कसालोनच्या उत्तरेकडच्या उतारांकडे गेली; तिथून खाली ती बेथ-शेमेशला+ जाऊन तिम्नाकडे+ निघाली. ११  मग ती सीमा उत्तरेकडे असलेल्या एक्रोनच्या+ उतारांवरून शिक्रोनपर्यंत पोहोचली; पुढे ती बाला डोंगरावरून जाऊन यबनेलपर्यंत गेली; आणि शेवटी समुद्रापर्यंत जाऊन संपली. १२  यहूदाच्या प्रदेशाची पश्‍चिम सीमा महासागराचा*+ किनारा होती. यहूदा वंशाच्या घराण्यांना मिळालेल्या प्रदेशाच्या चारही बाजूंना असलेली ही सीमा होती. १३  यहोशवाने यफुन्‍नेचा मुलगा कालेब+ याला यहोवाच्या आज्ञेप्रमाणे, यहूदाच्या वंशजांच्या प्रदेशात जमिनीचा वाटा दिला. तो म्हणजे, किर्याथ-अर्बा (अर्बा हा अनाकचा पिता होता); याला हेब्रोन+ असंही म्हणतात. १४  कालेबने तिथून अनाकच्या+ तीन मुलांना, म्हणजे शेशय, अहीमान आणि तलमय+ या अनाकच्या वंशजांना हाकलून दिलं. १५  मग तो दबीरच्या+ लोकांविरुद्ध लढण्यासाठी गेला. (दबीरचं पूर्वीचं नाव किर्याथ-सेफर असं होतं.) १६  कालेब म्हणाला: “जो कोणी किर्याथ-सेफरवर हल्ला करून त्यावर कब्जा मिळवेल त्याचं लग्न मी माझ्या मुलीसोबत, अखसासोबत लावून देईन.” १७  तेव्हा अथनिएलने+ किर्याथ-सेफरवर कब्जा मिळवला; तो कालेबचा भाऊ कनाज+ याचा मुलगा होता. मग कालेबने आपली मुलगी अखसा+ हिचं अथनिएलसोबत लग्न लावून दिलं. १८  आपल्या नवऱ्‍याच्या घरी जात असताना तिने नवऱ्‍याकडे असा आग्रह धरला, की त्याने तिच्या वडिलांकडून जमीन मागून घ्यावी. ती गाढवावरून उतरली,* तेव्हा कालेबने तिला विचारलं: “तुला काय हवंय?”+ १९  ती म्हणाली: “मला एक आशीर्वाद द्या. तुम्ही मला दक्षिणेकडे* जमिनीचा तुकडा दिलाय; आता मला गुल्लोथ-माईमसुद्धा* द्या.” म्हणून मग त्याने तिला वरचं गुल्लोथ आणि खालचं गुल्लोथ दिलं. २०  यहूदाच्या वंशाला त्यांच्या घराण्यांनुसार मिळालेला वारसा पुढीलप्रमाणे होता: २१  यहूदा वंशाला, दक्षिणेकडे अदोमच्या सीमेजवळ+ मिळालेली शहरं म्हणजे: कब्सेल, एदेर, यागूर, २२  कीना, दीमोना, अदादा, २३  केदेश, हासोर, इथनान, २४  जीफ, टेलेम, बालोथ, २५  हासोर-हदत्ता, करीयोथ-हस्रोन (म्हणजे हासोर), २६  अमाम, शमा, मोलादा,+ २७  हसरगदा, हेष्मोन, बेथ-पलेत,+ २८  हसर-शुवाल, बैर-शेबा,+ बिजोथा, २९  बाला, ईयीम, असेम, ३०  एल्तोलाद, कसील, हर्मा,+ ३१  सिक्लाग,+ मदमन्‍ना, सनसन्‍ना, ३२  लबावोथ, शिलहीम, अईन आणि रिम्मोन;+ अशी एकूण २९ शहरं आणि त्यांच्या आसपासच्या वस्त्या. ३३  शेफीलामधली+ शहरं म्हणजे: अष्टावोल, सरा,+ अष्णा, ३४  जानोह, एन-गन्‍नीम, तप्पूहा, एनाम, ३५  यर्मूथ, अदुल्लाम,+ सोखो, अजेका,+ ३६  शारईम,+ अदीथईम, गदेरा आणि गदेरोथईम;* अशी एकूण १४ शहरं आणि त्यांच्या आसपासच्या वस्त्या. ३७  सनान, हदाशा, मिग्दल-गाद, ३८  दिलान, मिस्पे, यकथेल, ३९  लाखीश,+ बसकाथ, एग्लोन, ४०  कब्बोन, लहमाम, किथलीश, ४१  गदेरोथ, बेथदागोन, नामा आणि मक्केदा;+ अशी एकूण १६ शहरं आणि त्यांच्या आसपासच्या वस्त्या. ४२  लिब्ना,+ एथेर, आशान,+ ४३  इफताह, अष्णा, नेझिब, ४४  कईला, अकजीब आणि मारेशा; अशी एकूण नऊ शहरं आणि त्यांच्या आसपासच्या वस्त्या. ४५  एक्रोन आणि त्याच्या आसपासची नगरं व वस्त्या; ४६  एक्रोनच्या पश्‍चिमेकडे आणि अश्‍दोदच्या आसपासचा सगळा प्रदेश आणि त्यातल्या सगळ्या वस्त्या. ४७  अश्‍दोद+ आणि त्याच्या आसपासची नगरं आणि वस्त्या; गाझा+ आणि इजिप्तच्या ओढ्यापर्यंतची सगळी नगरं आणि वस्त्या; तसंच महासागराच्या* जवळचा प्रदेश.+ ४८  आणि डोंगराळ भागातली शहरं, म्हणजे: शामीर, यत्तीर,+ सोखो, ४९  दन्‍ना, किर्याथ-सन्‍ना (म्हणजे दबीर), ५०  अनाब, एष्टमो,+ अनीम, ५१  गोशेन,+ होलोन आणि गिलो;+ अशी एकूण ११ शहरं आणि त्यांच्या आसपासच्या वस्त्या. ५२  अरबस्तान, दुमा, एशान, ५३  यानीम, बेथ-तप्पूहा, अफेका, ५४  हुमटा, किर्याथ-अर्बा (म्हणजे हेब्रोन)+ आणि सियोर; अशी एकूण नऊ शहरं आणि त्यांच्या आसपासच्या वस्त्या. ५५  मावोन,+ कर्मेल, जीफ,+ यूटा, ५६  इज्रेल, यकदाम, जानोह, ५७  काइन, गिबा आणि तिम्ना;+ अशी एकूण दहा शहरं आणि त्यांच्या आसपासच्या वस्त्या. ५८  हलहूल, बेथ-सूर, गदोर, ५९  माराथ, बेथ-अनोथ आणि एल्तकोन; अशी एकूण सहा शहरं आणि त्यांच्या आसपासच्या वस्त्या. ६०  किर्याथ-बाल (म्हणजे किर्याथ-यारीम)+ आणि राब्बा; अशी एकूण दोन शहरं आणि त्यांच्या आसपासच्या वस्त्या. ६१  ओसाड रानातली शहरं म्हणजे: बेथ-अराबा,+ मिद्दीन आणि सखाखा, ६२  निबशान, क्षार शहर व एन-गेदी;+ अशी एकूण सहा शहरं आणि त्यांच्या आसपासच्या वस्त्या. ६३  यहूदाचे लोक यरुशलेममध्ये राहणाऱ्‍या यबूसी+ लोकांना मात्र हाकलून देऊ शकले नाहीत.+ त्यामुळे यबूसी लोक आजही यहूदाच्या लोकांसोबत यरुशलेममध्ये+ राहत आहेत.

तळटीपा

म्हणजे, मृत समुद्र.
म्हणजे, महासागर, भूमध्य सुमद्र.
म्हणजे, मृत समुद्र.
म्हणजे, भूमध्य समुद्र.
किंवा कदाचित, “ती गाढवावर बसलेली असताना, लक्ष वेधून घेण्यासाठी तिने टाळी वाजवली.”
किंवा “नेगेबकडे.”
म्हणजे, “पाण्याचे झरे.”
किंवा कदाचित, “गदेरा आणि त्याचे मेंढवाडे.”
म्हणजे, भूमध्य समुद्र.