यहोशवा १९:१-५१

  • शिमोनला मिळालेला वारसा (१-९)

  • जबुलूनला मिळालेला वारसा (१०-१६)

  • इस्साखारला मिळालेला वारसा (१७-२३)

  • आशेरला मिळालेला वारसा (२४-३१)

  • नफतालीला मिळालेला वारसा (३२-३९)

  • दानला मिळालेला वारसा (४०-४८)

  • यहोशवाला मिळालेला वारसा (४९-५१)

१९  दुसरी चिठ्ठी+ शिमोन+ वंशाची निघाली. त्या वंशाच्या घराण्यांना वारशात मिळालेला प्रदेश, यहूदाला मिळालेल्या प्रदेशात होता.+ २  त्यांना वारशात ही शहरं मिळाली: शेबासोबत बैर-शेबा,+ मोलादा,+ ३  हसर-शुवाल,+ बाला, असेम,+ ४  एल्तोलाद,+ बथूल, हर्मा, ५  सिक्लाग,+ बेथ-मर्काबोथ, हसर-सूसा, ६  बेथ-लबावोथ+ आणि शारूहेन; अशी एकूण १३ शहरं आणि त्यांच्या आसपासच्या वस्त्या; ७  तसंच अईन, रिम्मोन, एतेर आणि आशान;+ अशी एकूण चार शहरं आणि त्यांच्या आसपासच्या वस्त्या; ८  या शहरांच्या आसपासच्या आणि बालथ-बैर, म्हणजे दक्षिणेकडचं रामा इथपर्यंतच्या सगळ्या वस्त्या त्यांना मिळाल्या. हा शिमोन वंशाला त्याच्या घराण्यांप्रमाणे मिळालेला वारसा होता. ९  शिमोन वंशाला मिळालेला हा वारसा यहूदाला मिळालेल्या वाट्यातून देण्यात आला; कारण यहूदाला मिळालेला प्रदेश त्याच्यासाठी फारच मोठा होता. अशा रितीने, शिमोनच्या वंशजांना यहूदाच्या वारशातच त्यांच्या हिश्‍शाचा वाटा मिळाला.+ १०  मग तिसरी चिठ्ठी+ जबुलून+ वंशाची निघाली. त्या वंशाच्या घराण्यांना वारशात मिळालेल्या प्रदेशाची सीमा सारीदपर्यंत होती. ११  त्यांची सीमा पश्‍चिमेकडे मरलापर्यंत जाऊन दब्बेशेथपर्यंत पोहोचली आणि तिथून यकनामसमोर असलेल्या ओढ्यापर्यंत गेली. १२  सारीद इथून ही सीमा पूर्वेकडे किसलोथ-ताबोरच्या हद्दीजवळून जाऊन दाबरथकडे+ निघाली आणि याफीयपर्यंत गेली. १३  तिथून पुढे ती पूर्वेकडे गथ-हेफेर+ आणि इत्ता-कासीनपर्यंत गेली आणि रिम्मोनकडे निघून नेयापर्यंत गेली. १४  मग उत्तरेकडे ही सीमा हन्‍नाथोनकडे वळली आणि इफताएल खोऱ्‍यापर्यंत जाऊन संपली. १५  याशिवाय कट्टाथ, नहलाल, शुम्रोन,+ इदला आणि बेथलेहेम+ ही शहरंसुद्धा त्यांना देण्यात आली. अशा प्रकारे त्यांना १२ शहरं आणि त्यांच्या आसपासच्या वस्त्या मिळाल्या. १६  ही शहरं आणि त्यांच्या आसपासच्या वस्त्या, हा जबुलून वंशाला त्यांच्या घराण्यांप्रमाणे मिळालेला वारसा होता.+ १७  चौथी चिठ्ठी+ इस्साखार+ वंशाच्या घराण्यांची निघाली. १८  त्यांच्या सीमेवर ही शहरं होती: इज्रेल,+ कसुल्लोथ, शूनेम,+ १९  हफराईम, शियोन, अनाहराथ, २०  रब्बीथ, किश्‍शोन, अबेस, २१  रेमेथ, एन-गन्‍नीम,+ एन-हद्दा, बेथ-पसेस. २२  मग ही सीमा पुढे ताबोर,+ शहसुमा आणि बेथ-शेमेश इथून गेली, आणि यार्देन नदीपर्यंत जाऊन संपली. अशी एकूण १६ शहरं आणि त्यांच्या आसपासच्या वस्त्या त्यांना मिळाल्या. २३  ही शहरं आणि त्यांच्या आसपासच्या वस्त्या इस्साखार वंशाला त्यांच्या घराण्यांप्रमाणे मिळालेला वारसा होता.+ २४  पाचवी चिठ्ठी+ आशेर+ वंशाच्या घराण्यांची निघाली. २५  त्यांच्या सीमेवर ही शहरं होती: हेलकथ,+ हली, बटेन, अक्षाफ, २६  अल्लामेलेख, अमाद आणि मिशाल. त्यांची सीमा पश्‍चिमेकडे कर्मेल+ आणि शिहोर-लिबनाथपर्यंत गेली; २७  पूर्वेला ही सीमा बेथ-दागोनकडे जाऊन जबुलूनच्या हद्दीवरून इफताहएल खोऱ्‍याच्या उत्तरेकडे पोहोचली. तिथून ती बेथ-एमेक आणि नियेलकडे निघाली आणि पुढे काबुलच्या डावीकडे गेली. २८  मग एब्रोन, रहोब, हम्मोन आणि कानाह इथून जाऊन ती मोठ्या सीदोनपर्यंत गेली.+ २९  पुढे ती रामाच्या दिशेने जाऊन, मजबूत भिंती असलेल्या सोर+ शहरापर्यंत गेली. मग ती होसाच्या दिशेने गेली आणि समुद्रापर्यंत जाऊन संपली; समुद्राच्या जवळ अकजीब, ३०  उम्मा, अफेक+ आणि रहोब+ ही शहरं होती. अशी २२ शहरं आणि त्यांच्या आसपासच्या वस्त्या त्यांना मिळाल्या. ३१  ही शहरं आणि त्यांच्या आसपासच्या वस्त्या आशेर वंशाला त्यांच्या घराण्यांप्रमाणे मिळालेला वारसा होता.+ ३२  सहावी चिठ्ठी+ नफताली वंशाच्या घराण्यांची निघाली. ३३  त्यांच्या प्रदेशाची सीमा हेलेफ आणि साननीममधला मोठा वृक्ष+ इथून सुरू होऊन अदामीनेकेपर्यंत गेली. पुढे ती यबनेलवरून लक्कूमपर्यंत गेली; आणि यार्देन नदीपर्यंत जाऊन संपली. ३४  मग ही सीमा पश्‍चिमेकडे अजनोथ-ताबोर इथे गेली; तिथून ती हुक्कोककडे जाऊन दक्षिणेला जबुलूनपर्यंत पोहोचली. पुढे ती सीमा पश्‍चिमेकडे आशेरपर्यंत, आणि पूर्वेकडे यार्देनजवळ असलेल्या यहूदापर्यंत* गेली. ३५  मजबूत भिंती असलेली त्यांची शहरं म्हणजे: सिद्दीम, सेर, हम्मथ,+ रक्कथ, किन्‍नेरेथ, ३६  अदामा, रामा, हासोर,+ ३७  केदेश,+ एद्रई, एन-हासोर, ३८  इरोन, मिग्दल-एल, होरेम, बेथ-अनाथ आणि बेथ-शेमेश;+ अशी १९ शहरं आणि त्यांच्या आसपासच्या वस्त्या. ३९  ही शहरं आणि त्यांच्या आसपासच्या वस्त्या नफताली वंशाला त्यांच्या घराण्यांप्रमाणे मिळालेला वारसा होता.+ ४०  सातवी चिठ्ठी+ दान+ वंशाच्या घराण्यांची निघाली. ४१  त्यांना वारशात मिळालेल्या प्रदेशाच्या सीमेवर ही शहरं होती: सरा,+ अष्टावोल, ईर-शेमेश, ४२  शालब्बीन,+ अयालोन,+ इथला, ४३  एलोन, तिम्ना,+ एक्रोन,+ ४४  एल्तके, गिब्बथोन,+ बालाथ, ४५  यहूद, बने-बराक, गथ-रिम्मोन,+ ४६  मी-यर्कोन आणि रक्कोन. ही सीमा यापोच्या+ समोरून जात होती. ४७  पण दान वंशाला मिळालेला प्रदेश त्यांच्यासाठी खूप कमी पडत होता.+ त्यामुळे त्यांनी लेशेमवर+ हल्ला करून तिथल्या लोकांना तलवारीने मारून टाकलं. मग ते ताब्यात घेऊन ते तिथे राहू लागले. त्यांनी लेशेमचं नाव बदललं आणि त्याला आपल्या पूर्वजाच्या नावावरून दान हे नाव दिलं.+ ४८  ही शहरं आणि त्यांच्या आसपासच्या वस्त्या दान वंशाला त्यांच्या घराण्यांप्रमाणे मिळालेला वारसा होता. ४९  अशा प्रकारे वारसा म्हणून देश वाटून देण्याचं काम त्यांनी संपवलं. मग इस्राएली लोकांनी नूनचा मुलगा यहोशवा याला आपल्यामध्ये वारसा म्हणून त्याच्या हिश्‍शाची जमीन दिली. ५०  यहोवाच्या आज्ञेवरून इस्राएली लोकांनी यहोशवाला त्याने मागितलेलं शहर दिलं. ते एफ्राईमच्या डोंगराळ भागात असलेलं तिम्नाथ-सेरह+ हे शहर होतं. ते शहर पुन्हा बांधून यहोशवा तिथे राहू लागला. ५१  एलाजार याजक, नूनचा मुलगा यहोशवा आणि इस्राएल वंशांच्या घराण्यांचे प्रमुख यांनी हा सगळा प्रदेश शिलो+ इथे यहोवासमोर, भेटमंडपाच्या+ दारासमोर चिठ्ठ्या टाकून वारसा म्हणून वाटून दिला.+ अशा रितीने त्यांनी देश वाटून देण्याचं काम पूर्ण केलं.

तळटीपा

असं दिसतं, की हे यहूदा वंशाला नाही, तर त्या वंशातल्या एका पुरुषाच्या घराण्याला सूचित करतं.