यहोशवा २१:१-४५

  • लेवी वंशाला मिळालेली शहरं (१-४२)

    • अहरोनच्या वंशजांना (९-१९)

    • कहाथच्या बाकीच्या घराण्यांना (२०-२६)

    • गेर्षोनच्या वंशजांना (२७-३३)

    • मरारीच्या घराण्यांना (३४-४०)

  • यहोवाने दिलेली अभिवचनं पूर्ण होतात (४३-४५)

२१  मग लेवी वंशाच्या घराण्यांचे प्रमुख हे एलाजार याजक,+ नूनचा मुलगा यहोशवा आणि इस्राएल वंशांच्या घराण्यांचे प्रमुख यांच्याकडे आले. २  ते कनान देशातल्या शिलो+ इथे येऊन त्यांना म्हणाले: “यहोवाने मोशेद्वारे आज्ञा दिली होती, की आम्हाला राहण्यासाठी काही शहरं आणि आमच्या गुराढोरांसाठी तिथली कुरणं देण्यात यावीत.”+ ३  त्यामुळे यहोवाच्या आज्ञेप्रमाणे इस्राएली लोकांनी वारशात मिळालेल्या प्रदेशातली काही शहरं+ आणि तिथली कुरणं लेवी वंशाला दिली.+ ४  पहिली चिठ्ठी ही कहाथच्या घराण्यांची+ निघाली. अहरोन याजकाचे वंशज असलेल्या लेव्यांना यहूदा,+ शिमोन+ आणि बन्यामीन या वंशांच्या प्रदेशातली १३ शहरं चिठ्ठ्या टाकून वाटून देण्यात आली.+ ५  तर कहाथच्या बाकीच्या घराण्यांना एफ्राईम आणि दान वंशांच्या, तसंच मनश्‍शेच्या अर्ध्या वंशाच्या घराण्यांच्या वाट्यातून दहा शहरं चिठ्ठ्या टाकून वाटून देण्यात आली.+ ६  गेर्षोनच्या+ घराण्यांना इस्साखार, आशेर आणि नफताली वंशांच्या, तसंच बाशानमध्ये+ असलेल्या मनश्‍शेच्या अर्ध्या वंशाच्या घराण्यांच्या वाट्यातून १३ शहरं चिठ्ठ्या टाकून वाटून देण्यात आली. ७  आणि मरारीच्या वंशजांना+ त्यांच्या घराण्यांप्रमाणे रऊबेन, गाद आणि जबुलून वंशांच्या घराण्यांच्या वाट्यातून १२ शहरं देण्यात आली.+ ८  अशा प्रकारे इस्राएली लोकांनी ही शहरं आणि तिथली कुरणं, यहोवाने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे लेवी वंशाला चिठ्ठ्या टाकून वाटून दिली.+ ९  यहूदा आणि शिमोनच्या वंशांच्या प्रदेशातून त्यांनी पुढे सांगितलेली काही शहरं दिली.+ १०  ही शहरं लेवी वंशाच्या कहाथी घराण्यातल्या अहरोनच्या मुलांना मिळाली; कारण पहिली चिठ्ठी त्यांच्या नावाची निघाली. ११  त्यांनी त्यांना यहूदाच्या डोंगराळ प्रदेशातलं किर्याथ-अर्बा+ (अर्बा हा अनाक याचा पिता होता), म्हणजे हेब्रोन+ आणि त्याच्या आसपासची कुरणं दिली. १२  पण त्या शहराची शेती आणि त्याच्या आसपासच्या वस्त्या त्यांनी यफुन्‍नेचा मुलगा कालेब याला त्याचा वाटा म्हणून दिल्या होत्या.+ १३  आणि अहरोन याजकाच्या मुलांना त्यांनी हेब्रोन आणि तिथली कुरणं दिली. हेब्रोन+ हे खुनाबद्दल दोषी असलेल्यांसाठी शरण-शहर होतं.+ याशिवाय, लिब्ना+ व तिथली कुरणं, १४  यत्तीर+ व तिथली कुरणं, एष्टमोवा+ व तिथली कुरणं, १५  होलोन+ व तिथली कुरणं, दबीर+ व तिथली कुरणं, १६  अईन+ व तिथली कुरणं, यूटा+ व तिथली कुरणं आणि बेथ-शेमेश व तिथली कुरणं, अशी यहूदा आणि शिमोन वंशांतली नऊ शहरं त्यांना देण्यात आली. १७  बन्यामीन वंशातून: गिबोन+ व तिथली कुरणं, गेबा व तिथली कुरणं,+ १८  अनाथोथ+ व तिथली कुरणं आणि अलमोन व तिथली कुरणं, अशी चार शहरं त्यांना देण्यात आली. १९  अशा प्रकारे अहरोनच्या वंशजांना, म्हणजे याजकांना एकूण १३ शहरं आणि तिथली कुरणं देण्यात आली.+ २०  लेवी वंशातल्या कहाथच्या बाकीच्या घराण्यांना चिठ्ठ्या टाकून एफ्राईमच्या वंशातून काही शहरं देण्यात आली. २१  त्यांनी त्यांना एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातलं शखेम व तिथली कुरणं दिली; शखेम+ हे खुनाबद्दल दोषी असलेल्यांसाठी शरण-शहर होतं.+ याशिवाय, गेजेर+ व तिथली कुरणं, २२  किबसाईम व तिथली कुरणं आणि बेथ-होरोन+ व तिथली कुरणं, अशी चार शहरं त्यांना देण्यात आली. २३  आणि दान वंशातून: एल्तके व तिथली कुरणं, गिब्बथोन व तिथली कुरणं, २४  अयालोन+ व तिथली कुरणं आणि गथ-रिम्मोन व तिथली कुरणं, अशी चार शहरं त्यांना देण्यात आली. २५  आणि मनश्‍शेच्या अर्ध्या वंशातून: तानख+ व तिथली कुरणं आणि गथ-रिम्मोन व तिथली कुरणं, अशी दोन शहरं त्यांना देण्यात आली. २६  अशा प्रकारे कहाथच्या बाकीच्या घराण्यांना एकूण दहा शहरं आणि तिथली कुरणं मिळाली. २७  लेवी वंशातल्या गेर्षोनच्या+ घराण्यांना मनश्‍शेच्या अर्ध्या वंशातून बाशान प्रदेशातलं गोलान+ आणि तिथली कुरणं मिळाली; गोलान हे खुनाबद्दल दोषी असलेल्यांसाठी शरण-शहर होतं. याशिवाय त्यांना बैश्‍तरा आणि तिथली कुरणं, अशी दोन शहरं मिळाली. २८  आणि इस्साखार वंशातून:+ किश्‍शोन व तिथली कुरणं, दाबरथ+ व तिथली कुरणं, २९  यर्मूथ व तिथली कुरणं आणि एन-गन्‍नीम व तिथली कुरणं, अशी चार शहरं त्यांना मिळाली. ३०  आणि अशेर वंशातून:+ मिशाल व तिथली कुरणं, अब्दोन व तिथली कुरणं, ३१  हेलकथ+ व तिथली कुरणं आणि रहोब+ व तिथली कुरणं, अशी चार शहरं त्यांना देण्यात आली. ३२  आणि नफताली वंशातून: गालील प्रदेशातलं केदेश आणि तिथली कुरणं; केदेश+ हे खुनाबद्दल दोषी असलेल्यांसाठी शरण-शहर होतं.+ याशिवाय हम्मोथ-दोर व तिथली कुरणं आणि कर्तान व तिथली कुरणं, अशी तीन शहरं त्यांना देण्यात आली. ३३  अशा प्रकारे गेर्षोनच्या वंशजांना त्यांच्या घराण्यांप्रमाणे एकूण १३ शहरं आणि तिथली कुरणं मिळाली. ३४  आणि उरलेल्या लेवी वंशाला, म्हणजे मरारीच्या+ घराण्यांना जबुलून वंशातून:+ यकनाम+ व तिथली कुरणं, कर्ता व तिथली कुरणं, ३५  दिम्ना व तिथली कुरणं आणि नहलाल+ व तिथली कुरणं, अशी चार शहरं मिळाली. ३६  आणि रऊबेन वंशातून: बेसेर+ व तिथली कुरणं, याहस व तिथली कुरणं,+ ३७  कदेमोथ व तिथली कुरणं आणि मेफाथ व तिथली कुरणं, अशी चार शहरं त्यांना देण्यात आली. ३८  आणि गाद वंशातून:+ गिलाद प्रदेशातलं रामोथ आणि तिथली कुरणं देण्यात आली; रामोथ हे खुनाबद्दल दोषी असलेल्यांसाठी शरण-शहर होतं.+ याशिवाय महनाइम+ व तिथली कुरणं, ३९  हेशबोन+ व तिथली कुरणं आणि याजेर+ व तिथली कुरणं, अशी एकूण चार शहरं त्यांना देण्यात आली. ४०  अशा प्रकारे लेवीच्या उरलेल्या घराण्यांना, म्हणजे मरारीच्या वंशजांना त्यांच्या घराण्यांप्रमाणे चिठ्ठ्या टाकून १२ शहरं वाटून देण्यात आली. ४१  इस्राएली लोकांना मिळालेल्या वारशात लेव्यांची एकूण ४८ शहरं आणि तिथली कुरणं होती.+ ४२  त्यांपैकी प्रत्येक शहराच्या आसपास त्यांची कुरणं होती. ४३  अशा रितीने, यहोवाने इस्राएली लोकांच्या वाडवडिलांना वचन दिल्याप्रमाणे सगळा देश इस्राएली लोकांना दिला.+ इस्राएली लोकांनी तो देश ताब्यात घेतला आणि ते तिथे राहू लागले.+ ४४  तसंच यहोवाने त्यांचे सर्व शत्रू त्यांच्या हाती दिले.+ त्यांच्या शत्रूंपैकी एकही त्यांच्यापुढे टिकू शकला नाही.+ अशा प्रकारे, यहोवाने इस्राएली लोकांच्या वाडवडिलांना वचन दिल्याप्रमाणे त्याने इस्राएली लोकांना चारही बाजूंनी शांती दिली.+ ४५  यहोवाने इस्राएलच्या घराण्यांना चांगल्या गोष्टींबद्दल दिलेल्या सर्व अभिवचनांपैकी एकही अभिवचन* निष्फळ ठरलं नाही; त्यांपैकी प्रत्येक अभिवचन पूर्ण झालं.+

तळटीपा

किंवा “शब्द.”