व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यिर्मयाचं पुस्तक

अध्याय

पुस्तकाची रूपरेषा

    • यिर्मयाला संदेष्टा म्हणून नेमलं जातं (१-१०)

    • बदामाच्या झाडाचा दृष्टान्त (११, १२)

    • मोठ्या भांड्याचा दृष्टान्त (१३-१६)

    • यिर्मयाला त्याचं काम करायला हिंमत दिली जाते (१७-१९)

    • इस्राएली लोक यहोवाला सोडून इतर दैवतांच्या नादी लागतात (१-३७)

      • इस्राएल परक्या द्राक्षवेलीसारखी (२१)

      • तिचा झगा रक्‍ताने डागाळलेला (३४)

    • इस्राएल मोठ्या प्रमाणात भ्रष्ट (१-५)

    • इस्राएल आणि यहूदा व्यभिचारासाठी दोषी (६-११)

    • पापी मार्गापासून मागे वळण्यासाठी केलेला आर्जव (१२-२५)

    • पश्‍चात्ताप केल्यामुळे मिळणारे आशीर्वाद (१-४)

    • उत्तरेकडून येणारं संकट (५-१८)

    • येणाऱ्‍या संकटामुळे यिर्मयाला झालेलं दुःख (१९-३१)

    • यहोवाने शिक्षा केली, पण लोकांनी त्यातून धडा घेतला नाही (१-१३)

    • नाश केला, पण पूर्णपणे नाही (१४-१९)

    • यहोवा लोकांकडून हिशोब घेतो (२०-३१)

    • यरुशलेमला लवकरच वेढा पडेल (१-९)

    • यरुशलेमवर यहोवाचा क्रोध (१०-२१)

      • काहीही बरोबर नसताना, ‘सगळं ठीक आहे!’ असं ते म्हणतात (१४)

    • उत्तरेकडून क्रूर लोकांचा हल्ला (२२-२६)

    • यिर्मया धातूची पारख करणाऱ्‍यासारखा (२७-३०)

    • यहोवाच्या मंदिरावर व्यर्थ भरवसा (१-११)

    • मंदिराची दशा शिलोसारखी होईल (१२-१५)

    • खोट्या उपासनेचा धिक्कार (१६-३४)

      • ‘स्वर्गाच्या राणीची’ उपासना (१८)

      • हिन्‍नोम खोऱ्‍यात मुला-मुलींचा आगीत होम (३१)

    • इतर जण चालतात त्याच मार्गावर चालण्याची लोकांची निवड (१-७)

    • यहोवाच्या वचनाशिवाय सुज्ञता नाही (८-१७)

    • यहूदाच्या जखमेमुळे यिर्मयाला झालेलं दुःख (१८-२२)

      • “गिलादमध्ये मलम नाही का?” (२२)

    • यिर्मया अतिशय दुःखी होतो (१-३क)

    • यहोवा यहूदाकडून हिशोब घेतो (३ख-१६)

    • यहूदासाठी शोक (१७-२२)

    • यहोवाला ओळखत असल्याचा अभिमान बाळगा (२३-२६)

  • १०

    • इतर राष्ट्रांच्या देवांविरुद्ध जिवंत देव (१-१६)

    • लवकरच होणारा नाश आणि बंदिवास (१७, १८)

    • यिर्मया शोक करतो (१९-२२)

    • संदेष्ट्याची प्रार्थना (२३-२५)

      • मनुष्याला आपली पावलंही नीट टाकता येत नाहीत (२३)

  • ११

    • यहूदा यहोवासोबतचा करार मोडतो (१-१७)

      • दैवतांची संख्या शहरांइतकी जास्त (१३)

    • यिर्मया कत्तल करायला नेल्या जाणाऱ्‍या कोकऱ्‍यासारखा (१८-२०)

    • यिर्मयाच्या शहरातल्या लोकांकडूनच त्याचा विरोध (२१-२३)

  • १२

    • यिर्मयाची तक्रार (१-४)

    • यहोवाचं उत्तर (५-१७)

  • १३

    • खराब झालेला पट्टा (१-११)

    • द्राक्षारसाची मडकी फोडली जातील (१२-१४)

    • कधीही न सुधरणाऱ्‍या यहूदाचा बंदिवास (१५-२७)

      • ‘कूशी माणसं आपल्या त्वचेचा रंग बदलू शकतात का?’ (२३)

  • १४

    • दुष्काळ आणि तलवार (१-१२)

    • खोट्या संदेष्ट्यांना शिक्षा सुनावली जाते (१३-१८)

    • यिर्मया लोकांचं पाप कबूल करतो (१९-२२)

  • १५

    • यहोवा आपला न्याय-निर्णय बदलणार नाही (१-९)

    • यिर्मयाची तक्रार (१०)

    • यहोवाचं उत्तर (११-१४)

    • यिर्मयाची प्रार्थना (१५-१८)

      • देवाचा संदेश खाल्ल्याने यिर्मयाचं मन आनंदित होतं (१६)

    • यहोवा यिर्मयाला प्रोत्साहन देतो (१९-२१)

  • १६

    • लग्न, शोक किंवा मेजवानी करायची यिर्मयाला मनाई (१-९)

    • शिक्षा, मग पुनर्वसन (१०-२१)

  • १७

    • खोलवर मुळावलेलं यहूदाचं पाप (१-४)

    • यहोवावर भरवसा ठेवल्यामुळे मिळणारे आशीर्वाद (५-८)

    • हृदय सगळ्यात जास्त धोका देणारं आहे (९-११)

    • यहोवा, इस्राएलची आशा (१२, १३)

    • यिर्मयाची प्रार्थना (१४-१८)

    • शब्बाथाचा दिवस पवित्र माना (१९-२७)

  • १८

    • कुंभाराच्या हातातली माती (१-१२)

    • यहोवा इस्राएलकडे पाठ फिरवतो (१३-१७)

    • यिर्मयाविरुद्ध कट; त्याची विनंती (१८-२३)

  • १९

    • यिर्मयाला मातीचं मडकं फोडायला सांगितलं जातं (१-१५)

      • बआलसाठी मुलांचा बळी ()

  • २०

    • पशहूर यिर्मयाला फटके मारतो (१-६)

    • यिर्मया प्रचार थांबवत नाही (७-१३)

      • देवाचा संदेश धगधगत्या आगीसारखा ()

      • यहोवा एका शूर योद्ध्यासारखा (११)

    • यिर्मयाची तक्रार (१४-१८)

  • २१

    • यहोवा सिद्‌कीयाची विनंती अमान्य करतो (१-७)

    • लोकांना जीवन किंवा मरण निवडण्याची संधी (८-१४)

  • २२

    • दुष्ट राजांविरुद्ध न्यायाचा संदेश (१-३०)

  • २३

    • चांगले आणि दुष्ट मेंढपाळ (१-४)

    • “नीतिमान अंकुर” याच्या राज्यात सुरक्षितता (५-८)

    • खोट्या संदेष्ट्यांना शिक्षा सुनावली जाते (९-३२)

    • “यहोवाचा संदेश ओझ्यासारखा आहे” (३३-४०)

  • २४

    • चांगली आणि खराब अंजिरं (१-१०)

  • २५

    • यहोवाचा राष्ट्रांसोबत वाद (१-३८)

      • राष्ट्रं ७० वर्षं बाबेलची गुलामी करतील (११)

      • देवाच्या क्रोधाचा प्याला (१५)

      • राष्ट्रा-राष्ट्रावर एक संकट (३२)

      • यहोवाच्या हातून मारले गेलेले (३३)

  • २६

    • यिर्मयाला मारून टाकायची धमकी (१-१५)

    • यिर्मयाला वाचवलं जातं (१६-१९)

      • मीखाच्या भविष्यवाणीचा उल्लेख (१८)

    • उरीया संदेष्टा (२०-२४)

  • २७

    • बाबेलचं जू (१-११)

    • सिद्‌कीयाला बाबेलसमोर शरण यायला सांगितलं जातं (१२-२२)

  • २८

    • यिर्मया आणि खोटा संदेष्टा हनन्या (१-१७)

  • २९

    • बाबेलमधल्या बंदिवानांना यिर्मयाचं पत्र (१-२३)

      • इस्राएल ७० वर्षांनंतर परत येईल (१०)

    • शमायासाठी संदेश (२४-३२)

  • ३०

    • बरं करण्याची आणि पुनर्वसन करण्याची अभिवचनं (१-२४)

  • ३१

    • इस्राएलचे उरलेले लोक देशात पुन्हा वस्ती करतील (१-३०)

      • राहेल आपल्या मुलांसाठी रडत आहे (१५)

    • एक नवीन करार (३१-४०)

  • ३२

    • यिर्मया शेत विकत घेतो (१-१५)

    • यिर्मयाची प्रार्थना (१६-२५)

    • यहोवाचं उत्तर (२६-४४)

  • ३३

    • पुनर्वसन करण्याची अभिवचनं (१-१३)

    • ‘नीतिमान अंकुराच्या’ राज्यात सुरक्षा (१४-१६)

    • दावीद आणि याजक यांच्यासोबत करार (१७-२६)

      • दिवस आणि रात्र यांबद्दलचा करार (२०)

  • ३४

    • सिद्‌कीयाला न्यायाचा संदेश (१-७)

    • दासांना मुक्‍त करण्याचा करार मोडला जातो (८-२२)

  • ३५

    • आज्ञा पाळण्याच्या बाबतीत रेखाबी लोकांचं चांगलं उदाहरण (१-१९)

  • ३६

    • यिर्मया बारूखकडून गुंडाळी लिहून घेतो (१-७)

    • बारूख गुंडाळी मोठ्याने वाचतो (८-१९)

    • यहोयाकीम गुंडाळी जाळून टाकतो (२०-२६)

    • नवीन गुंडाळीवर संदेश पुन्हा लिहिला जातो (२७-३२)

  • ३७

    • खास्दी लोक काही काळासाठी वेढा काढतात (१-१०)

    • यिर्मयाला तुरुंगात टाकलं जातं (११-१६)

    • सिद्‌कीया यिर्मयाला भेटतो (१७-२१)

      • यिर्मयाला भाकर पुरवली जाते (२१)

  • ३८

    • यिर्मयाला कोरड्या विहिरीत टाकलं जातं (१-६)

    • एबद-मलेख यिर्मयाला सोडवतो (७-१३)

    • सिद्‌कीयाने शरण जावं अशी यिर्मया त्याला विनंती करतो (१४-२८)

  • ३९

    • यरुशलेमचा नाश (१-१०)

      • सिद्‌कीया पळतो, पण पकडला जातो (४-७)

    • यिर्मयाचं संरक्षण (११-१४)

    • एबद-मलेखचा जीव वाचेल हे सांगितलं जातं (१५-१८)

  • ४०

    • नबुजरदान यिर्मयाची सुटका करतो (१-६)

    • गदल्याची अधिकारी म्हणून देशावर नेमणूक (७-१२)

    • गदल्याला ठार मारायचा कट (१३-१६)

  • ४१

    • इश्‍माएल गदल्याचा खून करतो (१-१०)

    • योहानानच्या भीतीने इश्‍माएल पळून जातो (११-१८)

  • ४२

    • लोक यिर्मयाला मार्गदर्शनासाठी प्रार्थना करायला सांगतात (१-६)

    • यहोवाचं उत्तर: “इजिप्तला जाऊ नका” (७-२२)

  • ४३

    • लोक ऐकत नाहीत, ते इजिप्तला जातात (१-७)

    • यिर्मयाला इजिप्तमध्ये यहोवाकडून संदेश (८-१३)

  • ४४

    • इजिप्तमधल्या यहुद्यांवर संकट येईल अशी भविष्यवाणी (१-१४)

    • लोक देवाच्या इशाऱ्‍याकडे दुर्लक्ष करतात (१५-३०)

      • ‘स्वर्गाच्या राणीची’ उपासना (१७-१९)

  • ४५

    • बारूखसाठी यहोवाचा संदेश (१-५)

  • ४६

    • इजिप्तच्या विरोधात भविष्यवाणी (१-२६)

      • नबुखद्‌नेस्सर इजिप्तवर विजय मिळवेल (१३,२६)

    • इस्राएलला दिलेली अभिवचनं (२७, २८)

  • ४७

    • पलिष्ट्यांच्या विरोधात भविष्यवाणी (१-७)

  • ४८

    • मवाबच्या विरोधात भविष्यवाणी (१-४७)

  • ४९

    • अम्मोनच्या विरोधात भविष्यवाणी (१-६)

    • अदोमच्या विरोधात भविष्यवाणी (७-२२)

      • राष्ट्र म्हणून अदोमचं अस्तित्व नाहीसं होईल (१७, १८)

    • दिमिष्कच्या विरोधात भविष्यवाणी (२३-२७)

    • केदार आणि हासोरच्या विरोधात भविष्यवाणी (२८-३३)

    • एलामच्या विरोधात भविष्यवाणी (३४-३९)

  • ५०

    • बाबेलच्या विरोधात भविष्यवाणी (१-४६)

      • बाबेलमधून पळ काढा ()

      • इस्राएलला परत आणलं जाईल (१७-१९)

      • बाबेलचे जलाशय सुकून जातील (३८)

      • बाबेलमध्ये कोणीच राहणार नाही (३९, ४०)

  • ५१

    • बाबेलच्या विरोधात भविष्यवाणी (१-६४)

      • बाबेल अचानक मेदच्या हाती पडेल (८-१२)

      • पुस्तक फरात नदीत फेकलं जातं (५९-६४)

  • ५२

    • सिद्‌कीया बाबेलविरुद्ध बंड करतो (१-३)

    • नबुखद्‌नेस्सर यरुशलेमला वेढा घालतो (४-११)

    • शहराचा आणि मंदिराचा नाश (१२-२३)

    • लोकांना बाबेलच्या बंदिवासात नेलं जातं (२४-३०)

    • यहोयाखीनची तुरुंगातून सुटका (३१-३४)