यिर्मया १५:१-२१

  • यहोवा आपला न्याय-निर्णय बदलणार नाही (१-९)

  • यिर्मयाची तक्रार (१०)

  • यहोवाचं उत्तर (११-१४)

  • यिर्मयाची प्रार्थना (१५-१८)

    • देवाचा संदेश खाल्ल्याने यिर्मयाचं मन आनंदित होतं (१६)

  • यहोवा यिर्मयाला प्रोत्साहन देतो (१९-२१)

१५  मग यहोवा मला म्हणाला: “मोशे आणि शमुवेल जरी या लोकांसाठी माझ्यासमोर उभे असते,+ तरी मी या लोकांवर दया केली नसती. यांना माझ्या नजरेसमोरून दूर कर. घालवून दे त्यांना. २  आणि जर ते तुला म्हणाले, ‘आम्ही कुठे जाऊ?’ तर तू त्यांना सांग, ‘यहोवा असं म्हणतो: “जीवघेण्या रोगासाठी नेमलेल्यांनी, जीवघेण्या रोगाकडे जावं,तलवारीसाठी नेमलेल्यांनी तलवारीकडे जावं,+दुष्काळासाठी नेमलेल्यांनी दुष्काळाकडे जावं,आणि बंदिवासासाठी नेमलेल्यांनी बंदिवासात जावं!”’+ ३  यहोवा म्हणतो, ‘मी त्यांच्यावर चार पीडा* आणीन;+ ठार मारायला तलवार, प्रेतं ओढून न्यायला कुत्री, तसंच त्यांना खायला आणि त्यांचा नाश करायला आकाशातले पक्षी व जमिनीवरचे प्राणी.+ ४  यहूदाच्या राजाने, म्हणजे हिज्कीयाचा मुलगा मनश्‍शे याने यरुशलेममध्ये जे केलं,+ त्यामुळे मी त्यांची अशी दशा करीन, की ती पाहून पृथ्वीवरच्या सगळ्या राज्यांना दहशत बसेल.+  ५  हे यरुशलेम, कोणाला तुझी दया येईल? कोणाला तुझ्याबद्दल सहानुभूती वाटेल? आणि कोण थांबून तुझी विचारपूस करेल?’  ६  यहोवा म्हणतो, ‘त्यांनी मला सोडून दिलं.+ त्यांनी वारंवार माझ्याकडे पाठ फिरवली.*+ म्हणून मी त्यांच्यावर माझा हात उगारीन आणि त्यांचा नाश करीन.+ त्यांना सारखी-सारखी दया दाखवून मी वैतागलोय.  ७  मी देशाच्या दरवाजांमध्ये त्यांची पाखडणी करून त्यांना वाऱ्‍याने उडवून टाकीन. मी त्यांची मुलं त्यांच्यापासून दूर करीन.+ मी माझ्या लोकांचा नाश करून टाकीन,कारण त्यांनी आपल्या मार्गांपासून मागे वळायला नकार दिला.+  ८  माझ्यासमोर त्यांच्यातल्या विधवांची संख्या समुद्राच्या वाळूपेक्षा जास्त होईल. मी भरदुपारी नाश करणाऱ्‍याला त्यांच्याविरुद्ध आणीन; आई आणि तरुण मुलं यांच्याविरुद्ध मी त्याला आणीन. मी त्यांच्या मनाचा अचानक गोंधळ उडवीन आणि त्यांना भयभीत करीन.  ९  सात मुलांना जन्म देणारी स्त्री कमजोर झाली आहे;ती धापा टाकत आहे. भरदिवसा तिचा सूर्य मावळलाय,त्यामुळे बदनामी आणि अपमान झालाय.’* यहोवा म्हणतो ‘त्यांच्यापैकी उरलेल्या लोकांना मी शत्रूच्या तलवारीच्या हवाली करीन.’”+ १०  हे माझ्या आई! तू मला जन्म का दिलास?+ देशातले सगळे लोक माझ्याशी भांडतात आणि वाद घालतात. मी कोणाला उसनं दिलं नाही, की कोणाकडून काही घेतलं नाही;पण तरी ते सगळे मला शाप देतात. ११  यहोवा म्हणाला: “मी नक्की तुझं भलं करीन;संकटाच्या काळात मी तुझ्यासाठी नक्की मध्यस्थी करीन;दुःखाच्या काळात तुझ्या वतीने मी शत्रूंशी बोलीन. १२  कोणी लोखंडाचे तुकडे-तुकडे करू शकतं का? कोणी उत्तरेकडच्या लोखंडाचे आणि तांब्याचे तुकडे-तुकडे करू शकतं का? १३  तू* आपल्या सगळ्या प्रदेशांत पापं केली आहेत. म्हणून मी तुझी सगळी संपत्ती आणि तुझा सगळा खजिना, कोणताही मोबदला न घेता तुझ्या शत्रूंच्या हाती देईन.+ १४  तुला माहीत नाही अशा देशात नेण्यासाठी मी ते सगळं तुझ्या शत्रूंच्या हाती देईन.+ कारण माझ्या क्रोधाची आग पेटली आहे,आणि ती तुमच्यावर भडकली आहे.”+ १५  हे यहोवा, तुला तर सगळं माहीत आहे. माझी आठवण कर, माझ्याकडे लक्ष दे. माझा छळ करणाऱ्‍यांचा सूड घे.+ त्यांच्या बाबतीत तू सहनशीलता दाखवू नकोस, नाहीतर माझा नाश होईल. मी तुझ्यासाठी निंदा सहन करतोय याची तू जाणीव ठेव.+ १६  मला तुझा संदेश मिळाला आणि मी तो खाल्ला;+त्या संदेशामुळे मी अतिशय खूश झालो आणि माझं मन आनंदित झालं. कारण, हे सैन्यांच्या देवा यहोवा! मला तुझ्या नावाने ओळखलं जातं. १७  मी मौजमजा करणाऱ्‍यांसोबत बसून मौजमजा करत नाही.+ तुझा हात माझ्यावर असल्यामुळे मी एकटाच बसतो,कारण तू मला क्रोधाने* भरून टाकलं आहेस.+ १८  माझं दुःख दूर का होत नाही? आणि माझी जखम भरून का येत नाही? ती बरं होण्याचं नावच घेत नाही. तू माझ्यासाठी अशा एका फसव्या ओढ्यासारखा होणार आहेस का,ज्यात कधी पाणी असतं तर कधी नसतं? १९  म्हणून यहोवा असं म्हणतो: “तू जर माझ्याकडे परत आलास,तर मी पुन्हा तुझ्यावर कृपा करीन आणि तू माझ्यासमोर उभा राहशील. तू जर मौल्यवान गोष्टींपासून निरर्थक गोष्टी वेगळ्या केल्यास,तर तू माझ्या वतीने बोलणारा* होशील. तुला त्यांच्याकडे जावं लागणार नाही,उलट त्यांना तुझ्याकडे यावं लागेल.” २०  यहोवा म्हणतो: “मी तुला या लोकांविरुद्ध तांब्याच्या मजबूत भिंतीसारखं बनवत आहे.+ ते तुझ्याशी लढतील, पण तुला हरवू शकणार नाहीत.+ कारण तुला वाचवायला मी तुझ्यासोबत असेन. २१  मी तुला दुष्ट लोकांच्या हातून सोडवीन,आणि क्रूर लोकांच्या पंजातून तुझी सुटका करीन.”

तळटीपा

किंवा कदाचित, “चार प्रकारचे न्यायदंड.”
किंवा कदाचित, “ते माघारी जात राहिले.”
किंवा कदाचित, “तो लज्जित आणि अपमानित झालाय.”
हे यहूदा राष्ट्राला सूचित करत असावं.
किंवा “न्यायदंडाच्या संदेशाने.”
किंवा “माझं मुख.”