यिर्मया ४७:१-७

  • पलिष्ट्यांच्या विरोधात भविष्यवाणी (१-७)

४७  फारोने गाझावर हल्ला केला, त्याआधी यिर्मया संदेष्टयाला पलिष्टी लोकांबद्दल+ यहोवाकडून असा संदेश मिळाला: २  यहोवा म्हणतो,“पाहा! उत्तरेकडून पाणी वर चढतय. ते वाढत जाऊन मोठा पूर येईल. त्या पुरामुळे संपूर्ण देश आणि त्यातलं सगळं काही पाण्याखाली जाईल. शहर आणि त्यातले सगळे लोक बुडून जातील. माणसं रडतील, देशातले सगळे लोक आक्रोश करतील.  ३  त्याच्या घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकून,त्याच्या रथांचा खडखडाट,आणि चाकांचा घडघडाट ऐकून,वडिलांचे हात गळून जातील,पळताना ते मागे वळून आपल्या मुलांकडेही पाहणार नाहीत.  ४  कारण सर्व पलिष्ट्यांच्या नाशाचा दिवस जवळ येतोय;+त्या दिवशी सोर+ आणि सीदोनच्या+ उरलेल्या सगळ्या मित्र-राष्ट्रांचा नाश होईल. कारण यहोवा पलिष्ट्यांचा,म्हणजे कफतोर* बेटावरच्या उरलेल्या लोकांचा नाश करेल.+  ५  गाझाचं मुंडण केलं जाईल.* अष्कलोनला गप्प करण्यात आलंय.+ त्यांच्या खोऱ्‍यातल्या उरलेल्या लोकांनो,तुम्ही कधीपर्यंत स्वतःच्या अंगावर जखमा करून घेत राहाल?+  ६  हे यहोवाची तलवार!+ तू कधी शांत होशील? आपल्या म्यानात परत जा. शांत हो आणि विश्रांती घे.  ७  पण, ती कशी शांत बसू शकेल? कारण यहोवानेच तिला आज्ञा दिली आहे. त्याने तिला अष्कलोन आणि समुद्रकिनाऱ्‍यावरच्या प्रदेशांविरुद्ध+ नेमलंय.”

तळटीपा

म्हणजे, क्रीट.
म्हणजे, ते शोकामुळे आणि लज्जित झाल्यामुळे आपल्या डोक्यावरचे केस काढून टाकतील.