योएल १:१-२०

  • किड्यांची भयंकर पीडा (१-१४)

  • “यहोवाचा दिवस जवळ आलाय” (१५-२०)

    • संदेष्टा यहोवाला हाक मारतो (१९, २०)

 पथूएलचा मुलगा योएल* याला मिळालेला यहोवाचा* संदेश:  २  “हे वडीलजनांनो, ऐका,आणि देशाच्या* सर्व रहिवाशांनो, लक्ष द्या. तुमच्या काळात किंवा तुमच्या वाडवडिलांच्या काळात,कधी असं घडलं होतं का?+  ३  तुम्ही आपल्या मुलांना याबद्दल सांगा,आणि तुमच्या मुलांनी ते त्यांच्या मुलांना सांगावं;आणि त्यांच्या मुलांनी ते पुढच्या पिढीला सांगावं.  ४  कुरतडणाऱ्‍या टोळांनी जे सोडलं, ते झुंडींनी येणाऱ्‍या टोळांनी खाल्लं;+झुंडींनी येणाऱ्‍या टोळांनी जे सोडलं, ते बिनपंखांच्या टोळांनी खाल्लं;आणि बिनपंखांच्या टोळांनी जे सोडलं, ते अधाशी टोळांनी खाल्लं.+  ५  अरे दारुड्यांनो,+ उठा आणि रडा! द्राक्षारस पिणाऱ्‍यांनो, आक्रोश करा,कारण गोड द्राक्षारस तुमच्या तोंडून काढून घेण्यात आलाय.+  ६  असंख्य लोक असलेल्या एका शक्‍तिशाली राष्ट्राने+ माझ्या देशावर हल्ला केलाय. त्याचे दात सिंहाच्या दातांसारखे+ आणि त्याचा जबडा सिंहाच्या जबड्यासारखा आहे.  ७  त्याने माझा द्राक्षवेल उद्ध्‌वस्त केला आहे आणि माझ्या अंजिराच्या झाडाचं फक्‍त खोड ठेवलं आहे,त्यांची साल त्यांनी पूर्णपणे सोलून टाकली आहे,आणि त्यांच्या फांद्या पांढऱ्‍या झाल्या आहेत.  ८  गोणपाट घालून आपल्या तरुण वरासाठी*शोक करणाऱ्‍या कुमारीसारखा* आक्रोश करा.  ९  यहोवाच्या मंदिरातली अन्‍नार्पणं+ आणि पेयार्पणं+ बंद झाली आहेत;यहोवाची सेवा करणारे याजक शोक करत आहेत. १०  शेताची नासधूस करण्यात आली आहे, जमीन शोक करत आहे;+कारण धान्याचा नाश करण्यात आलाय, नवीन द्राक्षारस सुकून गेलाय आणि तेलही संपलंय.+ ११  गव्हाच्या आणि जवाच्या पिकांमुळेशेतकरी हताश झाले आहेत, द्राक्षमळ्यांची मशागत करणारे आक्रोश करत आहेत,कारण शेतातलं पीक नष्ट झालंय. १२  द्राक्षवेल सुकून गेलाय,अंजिराचं झाड कोमेजून गेलंय. डाळिंब, खजूर आणि सफरचंदअशी रानातली सगळी झाडं सुकली आहेत;+कारण लोकांचा आनंद अपमानात बदललाय. १३  हे याजकांनो, गोणपाट घालून शोक करा;*वेदीच्या सेवकांनो, आक्रोश करा.+ माझ्या देवाच्या सेवकांनो, या आणि रात्रभर गोणपाट घालून राहा;कारण तुमच्या देवाच्या मंदिरात आता कोणीहीअन्‍नार्पण+ आणि पेयार्पण+ आणत नाही. १४  उपास घोषित करा;* पवित्र सभा भरवा.+ तुमचा देव यहोवा याच्या मंदिरात वडीलजनांना आणि देशाच्या सर्व रहिवाशांना एकत्र करा,+आणि यहोवाला मदतीची याचना करा. १५  त्या दिवसामुळे हायहाय करा! कारण यहोवाचा दिवस जवळ आलाय,+सर्वसमर्थाकडून येणाऱ्‍या नाशासारखा तो दिवस येईल! १६  आपल्या डोळ्यांदेखत आपलं अन्‍न काढून घेण्यात आलं नाही का? आणि आपल्या देवाच्या मंदिरातून आनंद आणि उत्साह नाहीसा झाला नाही का? १७  बियाणं* फावड्यांखाली सुकून गेलंय. गोदामं उजाड पडली आहेत. धान्य सुकून गेल्यामुळे, कोठारं पाडून टाकण्यात आली आहेत. १८  गुरंढोरंही कण्हत आहेत! चारा नसल्यामुळे गायबैलांचे कळप गोंधळून इकडे तिकडे भटकत आहेत,आणि मेंढरांचे कळप शिक्षा भोगत आहेत! १९  हे यहोवा, मी तुला हाक मारीन;+कारण रानातली कुरणं* जळून गेली आहेत,आणि एका ज्वालेने रानातली सगळी झाडं भस्म केली आहेत. २०  जंगली पशूंनाही तुझीच आस लागली आहे,कारण पाण्याचे ओढे कोरडे पडले आहेतआणि आगीने रानातली कुरणं नष्ट केली आहेत.”

तळटीपा

म्हणजे, “यहोवा देव आहे.”
किंवा “पृथ्वीच्या.”
किंवा “नवऱ्‍यासाठी.”
किंवा “तरुणीसारखा.”
किंवा “छाती बडवा.”
शब्दशः “पवित्र करा.”
किंवा कदाचित, “सुकलेली अंजिरं.”
किंवा “गुरं चारण्याच्या जमिनी.”