रोमकर यांना पत्र ५:१-२१

  • ख्रिस्ताद्वारे देवाशी समेट (१-११)

  • आदामद्वारे मरण, ख्रिस्ताद्वारे जीवन (१२-२१)

    • पाप आणि मरण सर्वांमध्ये पसरलं (१२)

    • एक न्यायी कृत्य (१८)

 म्हणून आता आपल्याला विश्‍वासाने नीतिमान ठरवण्यात आलं असल्यामुळे,+ आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे+ आपण देवासोबत शांतीचा संबंध टिकवून ठेवू या. २  त्याच्याचद्वारे विश्‍वासाने आपल्याला देवासमोर येऊन ती अपार कृपा मिळवणं शक्य झालं आहे, जी आज आपल्यावर आहे.+ म्हणून देवाच्या गौरवाची जी आशा आपल्याला मिळाली आहे, तिच्यामुळे आपण आनंदी होऊ या. ३  आणि इतकंच नाही, तर संकटांत असतानाही आपण आनंदी होऊ या.+ कारण आपल्याला माहीत आहे की संकटामुळे धीर उत्पन्‍न होतो;+ ४  आणि धीरामुळे आपल्याला देवाची मान्यता मिळते;+ देवाची मान्यता मिळाल्यामुळे आशा निर्माण होते.+ ५  या आशेमुळे पुढे आपली निराशा होणार नाही.+ कारण आपल्याला देण्यात आलेल्या पवित्र शक्‍तीद्वारे,* आपलं हृदय देवाच्या प्रेमाने भरून टाकण्यात आलं आहे.+ ६  कारण खरं पाहिलं, तर आपण दुर्बळ असतानाच+ ख्रिस्त नेमलेल्या वेळी पापी लोकांसाठी मरण पावला. ७  एखाद्या नीतिमान माणसासाठी मरणारा क्वचितच कोणी सापडेल; आणि चांगल्या माणसासाठी मरायला कदाचित कोणी तयार होईलही. ८  पण, आपण अजून पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. यातूनच देव आपल्यावर असलेलं त्याचं प्रेम दाखवून देतो.+ ९  तर मग, आता ख्रिस्ताच्या रक्‍ताद्वारे नीतिमान ठरवण्यात आलं असल्यामुळे,+ आपल्याला देवाच्या क्रोधापासून नक्कीच वाचवलं जाईल!+ १०  कारण आपण शत्रू असतानाच देवाच्या मुलाच्या मृत्यूद्वारे आपला देवाशी समेट झाला.+ तर मग आता समेट झाल्यावर आपण नक्कीच अशी खातरी बाळगू शकतो, की ख्रिस्ताच्या जीवनाद्वारे आपल्याला वाचवलं जाईल!* ११  आणि इतकंच नाही, तर ज्याच्याद्वारे आता आपला समेट झाला आहे, त्या आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे, देवासोबत असलेल्या आपल्या नात्यामुळे आपण आनंदी आहोत.+ १२  तर, एका माणसाद्वारे पाप जगात आलं आणि पापाद्वारे मरण आलं+ आणि अशा रितीने सर्व माणसांमध्ये मरण पसरलं, कारण त्या सगळ्यांनी पाप केलं होतं.+ १३  खरंतर नियमशास्त्राआधीच पाप जगात होतं. पण जिथे नियमशास्त्र नाही, तिथे पाप केल्याबद्दल कोणालाही दोषी ठरवलं जात नाही.+ १४  तरीपण, आदामच्या काळापासून मोशेच्या काळापर्यंत मृत्यूने सर्व लोकांवर राजा म्हणून राज्य केलं. त्यांनी आदामसारखं पाप केलं नव्हतं, तरीसुद्धा मृत्यूने त्यांच्यावर राज्य केलं. आदाम तर जो येणार होता त्याच्यासारखा होता.+ १५  पण देवाचं दान त्या अपराधासारखं नाही. कारण एका माणसाच्या अपराधामुळे पुष्कळ लोक मरतात. त्याच प्रकारे, एका माणसाच्या, म्हणजेच येशू ख्रिस्ताच्या अपार कृपेमुळे, पुष्कळ लोकांना+ देवाची अपार कृपा आणि त्याचं मोफत दान भरभरून* मिळतं.+ १६  तसंच, त्या मोफत दानाचे फायदे, एका माणसाने केलेल्या पापाच्या परिणामांसारखे नाहीत.+ कारण एका अपराधामुळे झालेल्या न्यायाने माणसांना दोषी ठरवण्यात आलं,+ पण पुष्कळ अपराधांनंतर मिळालेल्या दानामुळे त्यांना नीतिमान ठरवण्यात आलं.+ १७  कारण एका माणसाच्या अपराधामुळे मृत्यूने राजा म्हणून त्याच्याद्वारे राज्य केलं.+ तर मग, ज्यांना भरपूर प्रमाणात अपार कृपा आणि नीतिमत्त्वाचं मोफत दान मिळतं,+ ते एका माणसाद्वारे, म्हणजेच येशू ख्रिस्ताद्वारे जीवन मिळाल्यामुळे+ राजे म्हणून राज्य करतील,+ अशी आपण नक्कीच खातरी बाळगू शकतो! १८  त्यामुळे, जसं एका अपराधाद्वारे सर्व प्रकारच्या माणसांना दोषी ठरवण्यात आलं,+ तसंच एका न्यायी कार्यामुळे सर्व प्रकारच्या माणसांना+ जीवनासाठी नीतिमान ठरवण्यात येतं.+ १९  कारण जसं एका माणसाने आज्ञा मोडल्यामुळे पुष्कळ जण पापी ठरले,+ तसंच, एकाच माणसाने आज्ञापालन केल्यामुळे पुष्कळांना नीतिमान ठरवलं जाईल.+ २०  नियमशास्त्र यासाठी आलं, की अपराधांमध्ये वाढ व्हावी.+ पण जेव्हा अपराधांमध्ये वाढ झाली, तेव्हा अपार कृपेचा आणखीनच जास्त वर्षाव झाला. २१  कशासाठी? यासाठी, की जसं पापाने मृत्यूसोबत राजा म्हणून राज्य केलं,+ तसंच अपार कृपेने नीतिमत्त्वामुळे, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे सर्वकाळाचं जीवन देण्यासाठी राजा म्हणून राज्य करावं.+

तळटीपा

किंवा “आपलं तारण होईल.”
किंवा “मोठ्या प्रमाणात.”