लेवीय १२:१-८

  • मुलांच्या जन्मानंतर शुद्ध होणं (१-८)

१२  मग यहोवा मोशेला म्हणाला: २  “इस्राएली लोकांना सांग, ‘जर एखाद्या गर्भवती स्त्रीला मुलगा झाला, तर ती सात दिवस अशुद्ध राहील. तिच्या मासिक पाळीच्या दिवसांत ती अशुद्ध असते, तशीच ती अशुद्ध राहील.+ ३  आठव्या दिवशी त्या मुलाची सुंता* केली जावी.+ ४  त्या स्त्रीने पुढच्या ३३ दिवसांपर्यंत स्वतःला रक्‍तस्रावापासून शुद्ध करावं. तिचे शुद्ध होण्याचे दिवस पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत तिने कोणत्याही पवित्र वस्तूला स्पर्श करू नये किंवा पवित्र ठिकाणात येऊ नये. ५  जर तिला मुलगी झाली, तर ती स्त्री १४ दिवस अशुद्ध राहील. तिच्या मासिक पाळीच्या दिवसांत ती अशुद्ध असते, तशीच ती अशुद्ध राहील. त्या स्त्रीने पुढच्या ६६ दिवसांपर्यंत स्वतःला रक्‍तस्रावापासून शुद्ध करावं. ६  मुलाच्या किंवा मुलीच्या जन्मानंतर, तिचे शुद्ध होण्याचे दिवस पूर्ण झाल्यावर, तिने होमार्पणासाठी एक वर्षाचा मेंढा+ आणि पापार्पणासाठी कबुतराचं पिल्लू किंवा पारवा, भेटमंडपाच्या प्रवेशाजवळ याजकाकडे आणावा. ७  तिच्यासाठी प्रायश्‍चित्त म्हणून याजक ही अर्पणं यहोवाला देईल आणि ती तिच्या रक्‍तस्रावापासून शुद्ध होईल. मुलाला किंवा मुलीला जन्म देणाऱ्‍या स्त्रीबद्दलचा हा नियम आहे. ८  पण मेंढा द्यायची तिची ऐपत नसेल, तर तिने दोन पारवे किंवा कबुतराची दोन पिल्लं आणावीत.+ यांतलं एक होमार्पणासाठी आणि एक पापार्पणासाठी असेल. याजक तिच्यासाठी प्रायश्‍चित्त करेल आणि ती शुद्ध होईल.’”

तळटीपा