लेवीय ३:१-१७

  • शांती-अर्पण (१-१७)

    • चरबी किंवा रक्‍त खाण्याची मनाई (१७)

 जर कोणाला आपल्या गुराढोरांच्या कळपातून शांती-अर्पण द्यायचं असेल,+ तर त्याने एक नर किंवा मादी आणावी. त्याने कोणताही दोष नसलेला प्राणी यहोवासमोर आणावा. २  त्याने अर्पण म्हणून आणलेल्या प्राण्याच्या डोक्यावर हात ठेवावा. मग तो प्राणी भेटमंडपाच्या प्रवेशाजवळ कापावा; त्यानंतर याजक, म्हणजे अहरोनची मुलं त्या प्राण्याचं रक्‍त वेदीच्या सभोवती शिंपडतील. ३  शांती-अर्पणातले हे भाग यहोवासाठी अग्नीत जाळून केलेलं अर्पण म्हणून दिले जावेत:+ आतड्यांवर आणि त्यांच्या आजूबाजूला असलेली चरबी,+ ४  तसंच दोन्ही गुरदे आणि त्यांवर असलेली कमरेजवळची चरबी. गुरद्यांसोबतच यकृतावरची चरबीही काढावी.+ ५  अहरोनच्या मुलांनी हे सर्व वेदीच्या आगीवर असलेल्या लाकडांवरच्या होमार्पणावर जाळावं.+ हे अग्नीत जाळून केलेलं अर्पण आहे आणि त्याच्या सुवासाने यहोवाला आनंद होईल.*+ ६  जर कोणाला बकऱ्‍यांच्या वा मेंढरांच्या कळपातून यहोवाला शांती-अर्पण द्यायचं असेल, तर त्याने एक नर किंवा मादी आणावी. त्याने कोणताही दोष नसलेला प्राणी आणावा.+ ७  जर त्याला अर्पण म्हणून मेंढा द्यायचा असेल, तर त्याने तो यहोवासमोर आणावा. ८  त्याने अर्पण म्हणून आणलेल्या प्राण्याच्या डोक्यावर आपला हात ठेवावा. मग तो प्राणी भेटमंडपासमोर कापावा; यानंतर अहरोनची मुलं त्या प्राण्याचं रक्‍त वेदीच्या सभोवती शिंपडतील. ९  यहोवासाठी अग्नीत जाळून केलेलं अर्पण म्हणून शांती-अर्पणातली चरबी आणावी.+ मणक्याजवळचं संपूर्ण चरबीदार शेपूट, तसंच आतड्यांवर आणि त्यांच्या आजूबाजूला असलेली चरबी, १०  तसंच दोन्ही गुरदे आणि त्यांवर असलेली कमरेजवळची चरबी काढावी. गुरद्यांसोबतच यकृतावरची चरबीही काढावी.+ ११  मग याजकाने हे सर्व वेदीवर अन्‍न* म्हणून जाळावं. हे यहोवासाठी अग्नीत जाळून केलेलं अर्पण आहे.+ १२  जर त्याला बकरा अर्पण करायचा असेल, तर त्याने तो यहोवासमोर आणावा. १३  त्याने अर्पण म्हणून आणलेल्या प्राण्याच्या डोक्यावर हात ठेवावा. मग तो प्राणी भेटमंडपासमोर कापावा; त्यानंतर अहरोनची मुलं त्या प्राण्याचं रक्‍त वेदीच्या सभोवती शिंपडतील. १४  यहोवासाठी अग्नीत जाळून केलेलं अर्पण म्हणून हे भाग आणावेत: आतड्यांवर आणि त्यांच्या आजूबाजूला असलेली चरबी,+ १५  तसंच दोन्ही गुरदे आणि त्यांवर असलेली कमरेजवळची चरबी. गुरद्यांसोबतच यकृतावरची चरबीही काढावी. १६  मग याजकाने हे सर्व वेदीवर अन्‍न* म्हणून जाळावं. हे सुवासासाठी* अग्नीत जाळून केलेलं अर्पण आहे. सगळी चरबी यहोवाची आहे.+ १७  तुमच्या सगळ्या वस्त्यांमध्ये, पिढ्या न्‌ पिढ्या पाळण्याचा हा कायमचा नियम आहे: तुम्ही कोणत्याही प्रकारची चरबी किंवा रक्‍त मुळीच खाऊ नका.’”+

तळटीपा

किंवा “समाधान होईल.” शब्दशः “शांतिदायक.”
शब्दशः “भाकर,” म्हणजे शांती-अर्पणातला देवाचा हिस्सा.
शब्दशः “भाकर,” म्हणजे शांती-अर्पणातला देवाचा हिस्सा.
किंवा “समाधानासाठी.” शब्दशः “शांतिदायक.”