सफन्या १:१-१८

  • यहोवाचा न्यायदंडाचा दिवस जवळ (१-१८)

    • यहोवाचा दिवस फार वेगाने येत आहे (१४)

    • चांदी आणि सोनं वाचवू शकत नाही (१८)

 आमोनचा+ मुलगा योशीया,+ जो यहूदाचा राजा होता, त्याच्या शासनकाळात कूशीचा मुलगा सफन्या* याला यहोवाकडून* एक संदेश मिळाला. कूशी गदल्याचा, गदल्या अमऱ्‍याचा आणि अमऱ्‍या हिज्कीयाचा मुलगा होता. सफन्याला हा संदेश मिळाला:  २  यहोवा म्हणतो, “मी पृथ्वीच्या पाठीवरून सर्वकाही नाहीसं करीन.”+  ३  “मी माणसांना आणि प्राण्यांना नष्ट करीन. आकाशातल्या पक्ष्यांना आणि समुद्रातल्या माशांना नाहीसं करीन,+दुष्टांसोबत मी सर्व अडथळेही*+ नाहीसे करीन;आणि मी सबंध पृथ्वीवरून मानवांचा नाश करीन,” असं यहोवा म्हणतो.  ४  “मी यहूदाविरुद्ध आणि यरुशलेमच्या सर्व रहिवाशांविरुद्ध,आपला हात उगारीन. या ठिकाणातून मी बआलचं नामोनिशाण मिटवून टाकीन,*+याजकांचं आणि परक्या देवांच्या पुजाऱ्‍यांचं नावही उरणार नाही.+  ५  जे आपल्या छतांवर आकाशाच्या सैन्याला नमन करतात,+जे एकीकडे यहोवाला नमन करून त्याच्याशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतात;+आणि दुसरीकडे मल्कामशीही एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतात,+  ६  जे यहोवाच्या इच्छेप्रमाणे चालायचं सोडून देतात;+आणि जे यहोवाला शोधत नाहीत किंवा त्याचा सल्ला घेत नाहीत,+ त्या सर्वांचा नाश होईल.”  ७  सर्वोच्च प्रभू यहोवा याच्यासमोर शांत राहा,कारण यहोवाचा दिवस जवळ आला आहे.+ यहोवाने एक बलिदान तयार केलं आहे; त्याने ज्यांना आमंत्रण दिलं आहे, त्यांना त्याने पवित्र केलं आहे.  ८  “यहोवाच्या बलिदानाच्या दिवशी मी सर्व अधिकाऱ्‍यांकडून,राजाच्या मुलांकडून+ आणि विदेश्‍यांसारखा पेहराव करणाऱ्‍यांकडून हिशोब घेईन.  ९  त्या दिवशी, जो कोणी मंचावर* चढतो त्या प्रत्येकाकडून; आणि जे आपल्या मालकाच्या घरात मोठ्या प्रमाणात हिंसाचार आणि फसवणूक करतात,त्या सर्वांकडून मी हिशोब घेईन.” १०  यहोवा म्हणतो, “त्या दिवशी,मासे फाटकाकडून+ ओरडण्याचा आवाज येईल, शहराच्या नवीन भागातून+ शोक करण्याचा आवाज येईल,आणि टेकड्यांवरून मोठ्या धडाक्याचा आवाज येईल. ११  मक्‍तेशच्या* रहिवाशांनो रडा! कारण सर्व व्यापाऱ्‍यांचा नाश करण्यात आला आहे;आणि चांदी तोलून देणाऱ्‍या सर्वांना ठार मारण्यात आलं आहे.* १२  त्या वेळी मी दिवे घेऊन यरुशलेमचा कोपरा न्‌ कोपरा शोधीन,आणि ‘यहोवा चांगलं करणार नाही आणि वाईटही करणार नाही,’असा विचार करणाऱ्‍या बेपर्वा लोकांकडून मी हिशोब घेईन.+ १३  त्यांची संपत्ती लुटली जाईल आणि त्यांची घरं उजाड पडतील.+ ते घरं बांधतील पण त्यांत राहू शकणार नाहीत;आणि द्राक्षमळे लावतील पण त्यांचा द्राक्षारस पिऊ शकणार नाहीत.+ १४  यहोवाचा मोठा दिवस जवळ आला आहे!+ तो जवळ आहे आणि फार वेगाने* येत आहे!+ यहोवाच्या दिवसाचा आवाज भयानक आहे.+ ऐका, योद्धा मोठ्याने ओरडत आहे!+ १५  तो क्रोधाचा दिवस आहे,+तो संकटाचा आणि यातनांचा दिवस आहे,+तो वादळाचा आणि नाशाचा दिवस आहे,तो अंधाराचा आणि काळोखाचा दिवस आहे,+तो ढगांचा आणि भयंकर काळोखाचा दिवस आहे,+ १६  तो तटबंदीच्या शहरांविरुद्ध आणि उंच बुरुजांविरुद्ध,*+रणशिंगाचा आणि युद्धाच्या ललकारीचा दिवस आहे.+ १७  मी माणसांवर संकट आणीनआणि ते आंधळ्यांसारखे चालतील,+कारण त्यांनी यहोवाविरुद्ध पाप केलं आहे.+ त्यांचं रक्‍त धुळीसारखं ओतलं जाईलआणि त्यांचं मांस* शेणासारखं फेकून दिलं जाईल.+ १८  यहोवाच्या क्रोधाच्या दिवशी त्यांचं सोनं किंवा चांदी त्यांना वाचवू शकणार नाही;+त्याच्या आवेशाच्या आगीने संपूर्ण पृथ्वी भस्म होईल,+कारण तो पृथ्वीवर राहणाऱ्‍या सगळ्या लोकांचा सर्वनाश करेल; तो नाश खरोखर भयंकर असेल.”+

तळटीपा

म्हणजे “यहोवाने लपवलं (जपून ठेवलं) आहे.”
हे मूर्तिपूजेशी संबंधित वस्तूंना किंवा कार्यांना सूचित करतात.
किंवा “अंशही राहू देणार नाही.”
किंवा “व्यासपीठावर; उंबरठ्यावर.” कदाचित राजासनाचा चौथरा.
शब्दशः “गप्प बसवण्यात आलं आहे.”
हा कदाचित यरुशलेम शहराचा, मासे फाटकाजवळचा भाग असावा.
किंवा “घाईघाईने.”
किंवा “कोपऱ्‍यांवरच्या उंच बुरुजांविरुद्ध.”
शब्दशः “आतड्या.”