सफन्या २:१-१५

  • यहोवाच्या क्रोधाचा दिवस येण्याआधी त्याला शोधा (१-३)

    • नीतीने आणि नम्रतेने वागण्याचा प्रयत्न करा ()

    • कदाचित तुमचं रक्षण केलं जाईल ()

  • आसपासच्या राष्ट्रांवर न्यायदंड (४-१५)

 अरे निर्लज्ज राष्ट्रा,+एकत्र हो, आपल्या लोकांना गोळा कर.+  २  हुकूम अंमलात येण्याआधी,आणि दिवस भुशासारखा उडून जाण्याआधी,यहोवाचा भयानक क्रोध तुमच्यावर येण्याआधी,+आणि यहोवाच्या क्रोधाचा दिवस तुमच्यावर येण्याआधी,  ३  अहो पृथ्वीवरच्या सर्व नम्र लोकांनो,देवाच्या नीतिनियमांप्रमाणे* चालणाऱ्‍यांनो,यहोवाला शोधा.+ नीतीने आणि नम्रतेने वागण्याचा मनापासून प्रयत्न करा.* म्हणजे कदाचित, यहोवाच्या क्रोधाच्या दिवशी तुमचं रक्षण केलं जाईल.+  ४  कारण गाझा शहर उजाड होईल,आणि अष्कलोन ओसाड पडेल.+ अश्‍दोदला दिवसाढवळ्या* हाकलून लावलं जाईल,आणि एक्रोनला उपटून टाकलं जाईल.+  ५  “समुद्रकिनाऱ्‍यावर राहणाऱ्‍यांचा, करेथी लोकांच्या राष्ट्राचा धिक्कार असो!+ यहोवाने तुमच्याविरुद्ध न्यायदंड घोषित केला आहे. हे कनान, हे पलिष्टी लोकांच्या राष्ट्रा, मी तुझा नाश करीन,तुझ्यात एकही रहिवासी उरणार नाही.  ६  समुद्रकिनाऱ्‍याच्या प्रदेशाची कुरणं होतील.* तिथे मेंढपाळांसाठी विहिरी आणि मेंढरांसाठी मेंढवाडे असतील.  ७  तो यहूदाच्या घराण्यातल्या उरलेल्यांचा+ प्रदेश होईल;ते तिथे चरतील. संध्याकाळी ते अष्कलोनच्या घरांमध्ये आरामात पडतील. कारण त्यांचा देव यहोवा त्यांच्याकडे लक्ष देईल,*आणि तो त्यांना बंदिवासातून गोळा करेल.”+  ८  “मवाबने केलेली निंदा+ आणि अम्मोनी लोकांनी केलेला अपमान मी ऐकला आहे,+त्यांनी माझ्या लोकांना टोमणे मारले आणि त्यांचा देश बळकावण्याच्या धमक्या दिल्या.”+  ९  इस्राएलचा देव, सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, “माझ्या जिवाची शपथ,मबाव सदोमसारखा होईल,+आणि अम्मोन गमोरासारखा होईल.+ तो जंगली झाडाझुडपांचं ठिकाण, मिठाचा खड्डा आणि कायमचा ओसाड प्रदेश बनेल.+ माझ्या लोकांमधले उरलेले त्यांना लुटतील. आणि माझ्या राष्ट्रातले उरलेले लोक त्यांना हाकलून लावतील. १०  त्यांच्या गर्वाच्या बदल्यात हेच त्यांच्या पदरी पडेल,+कारण त्यांनी सैन्यांचा देव यहोवा याच्या लोकांना टोमणे मारले आणि त्यांना तुच्छ लेखलं. ११  त्यांना यहोवाची दहशत बसेल;*कारण तो पृथ्वीवरच्या सर्व देवांना नाहीसं* करेल,आणि राष्ट्रांची सर्व बेटं आपापल्या जागेवरून त्याला नमन* करतील.+ १२  कूशच्या* लोकांनो, तुम्हीही माझ्या तलवारीने मारले जाल.+ १३  तो उत्तरेकडे आपला हात उगारेल आणि अश्‍शूरचा नाश करेल,आणि तो निनवेला वाळवंटासारखं रुक्ष* आणि उजाड करून टाकेल.+ १४  गुरंढोरं, तसंच सर्व प्रकारची जंगली जनावरं* तिच्यात पडून राहतील. पाणकोळी आणि साळिंदर तिच्या पडलेल्या खांबांमध्ये रात्र काढतील. खिडकीतून गाण्याचा आवाज येईल. उंबरठ्यावर नुसतेच दगडधोंडे असतील;कारण तो देवदाराच्या चौकटींना उघडं पाडेल. १५  हीच ती गर्विष्ठ नगरी आहे, जी अगदी निर्धास्त बसली होती,ती मनात म्हणायची, ‘मीच सगळ्यात श्रेष्ठ आहे, माझ्याशिवाय कोणीच नाही.’ आता पाहा, तिची किती भयानक अवस्था झाली आहे! ती जंगली प्राण्यांचं विसाव्याचं ठिकाण बनली आहे. येणारा-जाणारा प्रत्येक जण तिच्याकडे बोट दाखवून तिची थट्टा करेल.”*+

तळटीपा

शब्दशः “त्याच्या न्यायाप्रमाणे.”
शब्दशः “नीती शोधा, नम्रता शोधा.”
किंवा “भर दुपारी.”
किंवा “प्रदेशाच्या चारण्याच्या जमिनी होतील.”
किंवा “त्यांची काळजी घेईल.”
किंवा “विस्मय वाटेल.”
किंवा “दुबळं.”
किंवा “उपासना.”
किंवा “इथियोपियाच्या.”
किंवा “कोरडं.”
शब्दशः “राष्ट्रातला प्रत्येक प्राणी.”
शब्दशः “शिट्ट्या मारेल.”