स्तोत्रं १:१-६
१ सुखी आहे तो माणूस, जो दुष्टांच्या सल्ल्याप्रमाणे वागत नाही;पापी लोकांच्या मार्गात उभा राहत नाही,+आणि निंदा करणाऱ्यांसोबत बसत नाही!+
२ तर तो यहोवाच्या* नियमशास्त्रावर मनापासून प्रेम करतो,+आणि रात्रंदिवस त्याच्यावर विचार करतो.*+
३ तो वाहत्या पाण्याजवळ लावलेल्या अशा झाडासारखा होईल,जे आपल्या ऋतूमध्ये फळ देतं,आणि ज्याची पानं कोमेजत नाहीत.
तो जे काही करतो त्यात त्याला यश मिळतं.+
४ पण, दुष्टांचं तसं नाही;ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुशासारखे असतात.
५ म्हणून, न्यायाच्या वेळी दुष्ट टिकू शकणार नाहीत;+आणि पापी लोक नीतिमान लोकांमध्ये उभे राहू शकणार नाहीत.+
६ कारण नीतिमान माणसांचे मार्ग यहोवाला माहीत असतात,+पण दुष्टांचा आणि त्यांच्या मार्गांचा अंत होईल.+