स्तोत्रं १०४:१-३५

  • सृष्टीतल्या अद्‌भुत गोष्टींबद्दल देवाची स्तुती

    • पृथ्वी कायम टिकून राहील ()

    • द्राक्षारस आणि भाकर माणसासाठी (१५)

    • “तू किती अद्‌भुत गोष्टी निर्माण केल्या आहेत!” (२४)

    • श्‍वास काढून घेतल्यावर ते मरून जातात (२९)

१०४  माझ्या जिवा, यहोवाची स्तुती कर.+ हे यहोवा माझ्या देवा, तू खूप महान आहेस.+ तू ऐश्‍वर्याचं* आणि वैभवाचं वस्त्र घातलं आहेस.+  २  तू प्रकाशाने स्वतःला पांघरलं आहेस;+तंबू ताणावा तसं तू आकाश ताणलं आहेस.+  ३  तो आपल्या माडीवरच्या खोल्यांच्या तुळया* आकाशातल्या पाण्यात बसवतो,+तो ढगांच्या रथावर स्वार होऊन,+वाऱ्‍याच्या पंखांवरून जातो.+  ४  तो आपल्या स्वर्गदूतांना खूप शक्‍तिशाली बनवतो;आपल्या सेवकांना भस्म करणाऱ्‍या आगीसारखं बनवतो.+  ५  त्याने पृथ्वीला तिच्या पायांवर स्थिर केलंय;+आपल्या ठिकाणावरून ती कधीच हलवली जाणार नाही.*+  ६  तू तिच्यावर खोल पाण्याचं वस्त्र पांघरलंस.+ पर्वत जलाशयांनी झाकलेले होते.  ७  तू धमकावलंस तेव्हा जलाशय पळून गेले;+तुझ्या गर्जनेने ते घाबरून पळून गेले.  ८  तू त्यांच्यासाठी ठरवलेल्या ठिकाणी ते गेले. पर्वत वर आले+ आणि दऱ्‍या खोल गेल्या.  ९  तू जलाशयांना मर्यादा घालून दिलीस. त्यांनी ती पार करू नये आणि पृथ्वीला पुन्हा झाकू नये,+म्हणून तू असं केलंस. १०  तो दऱ्‍यांमधून झरे वाहायला लावतो;ते पर्वतांच्या मधून वाहतात. ११  ते रानातल्या सर्व जंगली प्राण्यांना पाणी पुरवतात;रानगाढवं त्यांतलं पाणी पिऊन आपली तहान भागवतात. १२  आकाशातले पक्षी त्यांच्या जवळपास घरटी बांधतात;ते दाट वृक्षांमध्ये किलबिल करतात. १३  तो आपल्या माडीवरच्या खोल्यांमधून पर्वतांना पाणी देतो.+ तुझ्या कार्यांच्या फळाने पृथ्वी तृप्त होते.+ १४  तो गुराढोरांसाठी गवत उगवायला लावतो;आणि माणसांसाठी झाडंझुडपं उगवायला लावतो.+ त्यामुळे त्यांना जमिनीतून अन्‍न मिळतं; १५  मनाला आनंद देणारा द्राक्षारस,+चेहऱ्‍यावर चमक आणणारं तेलआणि माणसाच्या हृदयाचं पोषण करणारी भाकर मिळते.+ १६  यहोवाच्या वृक्षांना, त्याने लावलेल्या लबानोनच्या देवदारांनाभरपूर पाणी मिळतं. १७  त्यांच्यावर पक्षी आपली घरटी बांधतात. करकोच्याचं+ घर गंधसरूच्या झाडांत असतं. १८  उंच पर्वत पहाडी रानशेळ्यांसाठी असतात;+बिजू* डोंगरांच्या कडेकपारींत राहतात.+ १९  ऋतू ठरवण्यासाठी त्याने चंद्र बनवला;कधी मावळायचं, हे सूर्याला चांगलं माहीत असतं.+ २०  तू अंधार करतोस तेव्हा रात्र होते+ आणि रानातले सर्व जंगली प्राणी इकडे तिकडे फिरतात. २१  तरुण सिंह* आपल्या शिकारीसाठी डरकाळी फोडतात,+ते देवाकडे आपलं अन्‍न मागतात.+ २२  जेव्हा सूर्य उगवतो,तेव्हा ते आपल्या गुहेत जाऊन पडून राहतात. २३  माणूस आपल्या कामाला जातो,तो संध्याकाळपर्यंत कष्ट करतो. २४  हे यहोवा, तू किती अद्‌भुत गोष्टी निर्माण केल्या आहेत!+ त्या सर्व तू बुद्धीने निर्माण केल्या आहेत.+ तू बनवलेल्या गोष्टींनी ही पृथ्वी भरलेली आहे. २५  समुद्र किती मोठा, किती अफाट आहे! त्यात लहानमोठे असंख्य जीव राहतात.+ २६  त्यातून जहाजं प्रवास करतात आणि लिव्याथानसुद्धा;*+त्याला तू समुद्रात खेळण्यासाठी बनवलंस. २७  तू त्यांना वेळच्या वेळी अन्‍न देशील,म्हणून ते सर्व तुझी वाट पाहतात.+ २८  तू दिलेलं अन्‍न ते गोळा करतात.+ तू आपली मूठ उघडतोस, तेव्हा ते चांगल्या गोष्टींनी तृप्त होतात.+ २९  तू आपलं तोंड फिरवतोस, तेव्हा ते अस्वस्थ होतात. तू त्यांचा श्‍वास काढून घेतोस, तेव्हा ते मरून जातात आणि मातीला मिळतात.+ ३०  तू आपली पवित्र शक्‍ती* पाठवतोस तेव्हा ते निर्माण होतात,+तू पृथ्वीला नवजीवन देतोस. ३१  यहोवाचा गौरव सर्वकाळ टिकेल. यहोवा त्याच्या कार्यांमुळे आनंद करेल.+ ३२  तो पृथ्वीकडे पाहतो तेव्हा तिला हादरे बसतात;तो पर्वतांना स्पर्श करतो तेव्हा ते धुमसतात.*+ ३३  मी आयुष्यभर यहोवाचं गुणगान करीन;*+माझ्या जिवात जीव असेपर्यंत मी माझ्या देवाची स्तुती गाईन.+ ३४  माझ्या मनातले विचार त्याला आनंद देवोत.* मी यहोवामुळे हर्ष करीन. ३५  पापी लोक पृथ्वीवरून नाहीसे होतीलआणि दुष्टांचं अस्तित्व राहणार नाही.+ माझ्या जिवा, यहोवाची स्तुती कर. याहची स्तुती कर!*

तळटीपा

किंवा “सन्मानाचं.”
किंवा “छताची लाकडं.”
किंवा “डळमळणार नाही.”
खडकांमध्ये राहणारा सशासारखा एक प्राणी.
किंवा “आयाळ असलेले तरुण सिंह.”
किंवा “त्यांतून धूर निघतो.”
किंवा “संगीत रचीन.”
किंवा कदाचित, “त्याच्याबद्दलचं माझं मनन त्याला आवडो.”
किंवा “हालेलूयाह!” “याह” हे यहोवा या नावाचं संक्षिप्त रूप आहे.