स्तोत्रं १०८:१-१३

  • शत्रूंवर विजय मिळावा म्हणून प्रार्थना

    • मानवांकडून मिळणारं तारण व्यर्थ आहे (१२)

    • “देवच आम्हाला ताकद देईल” (१३)

दावीदचं गीत. स्तुतिगीत. १०८  हे देवा, माझं मन खंबीर आहे,मी संगीत वाजवून अंतःकरणापासून* तुझी स्तुती गाईन.+  २  तंतुवाद्यांनो, जागे व्हा; वीणा,+ तूही ऊठ. मी पहाटेला जागं करीन.  ३  हे यहोवा, मी सर्व लोकांमध्ये तुझी स्तुती करीन;*मी राष्ट्रांमध्ये तुझा महिमा गाईन.  ४  कारण तुझं एकनिष्ठ प्रेम आकाशाइतकं उंच आहे.+ तुझा विश्‍वासूपणा आभाळापर्यंत पोहोचला आहे.  ५  हे देवा, तुझा सन्मान आकाशापेक्षाही उंच आहे;सबंध पृथ्वीवर तुझा गौरव होवो!+  ६  तुझ्या प्रिय लोकांची सुटका व्हावी,म्हणून तुझ्या उजव्या हाताने आम्हाला वाचव आणि माझी प्रार्थना ऐक.+  ७  देव त्याच्या पवित्रतेमुळे* बोलला आहे: “मी आनंदित होऊन शखेम+ वारसा म्हणून देईन,मी सुक्कोथचं खोरं* मोजून देईन.+  ८  गिलाद+ माझा आहे आणि मनश्‍शेही माझा आहे,एफ्राईम माझ्या डोक्यावरचा टोप* आहे.+ यहूदा माझा राजदंड आहे.+  ९  मवाब माझ्यासाठी पाय धुण्याचं पात्र आहे.+ अदोमवर मी माझा जोडा फेकीन.+ पलेशेथला हरवल्यामुळे मी आनंदाने जल्लोष करीन.”+ १०  तटबंदी असलेल्या शहरात मला कोण नेईल? अदोमपर्यंत मला कोण घेऊन जाईल?+ ११  हे देवा, तूच नाही का? पण तू तर आमच्याकडे पाठ फिरवली आहेस. आता तू आमच्या सैन्यांसोबत लढाईला जात नाहीस.+ १२  आमच्या संकटात आम्हाला साहाय्य कर,+कारण मानवांकडून मिळणारं तारण व्यर्थ आहे.+ १३  देवच आम्हाला ताकद देईल.+ तोच आमच्या शत्रूंना पायांखाली तुडवेल.+

तळटीपा

शब्दशः “माझा गौरवसुद्धा.”
किंवा “संगीत रचीन.”
किंवा कदाचित, “त्याच्या पवित्र ठिकाणात.”
किंवा “खालचं मैदान.”
शब्दशः “किल्ला.”