स्तोत्रं १११:१-१०

  • यहोवाच्या महान कार्यांसाठी त्याची स्तुती करा

    • देवाचं नाव पवित्र आणि विस्मयकारक आहे ()

    • यहोवाची भीती बाळगणं बुद्धीची सुरुवात (१०)

१११  याहची स्तुती करा!*+ א [आलेफ ] मी पूर्ण मनाने यहोवाची स्तुती करीन.+ ב [बेथ ]मंडळीत आणि सरळ मनाच्या लोकांच्या बैठकीत मी त्याचं गुणगान करीन. ג [गिमेल ]  २  यहोवाची कार्यं महान आहेत;+ד [दालेथ ]ज्यांना ती आवडतात, ते सर्व त्यांचं परीक्षण करतात.+ ה [हे ]  ३  त्याची कार्यं गौरवशाली आणि वैभवशाली आहेत;ו [वाव ]त्याचं नीतिमत्त्व सर्वकाळासाठी आहे.+ ז [झाइन ]  ४  तो त्याची अद्‌भुत कार्यं लक्षात ठेवायला लावतो.+ ח [हेथ ] यहोवा करुणामय* आणि दयाळू देव आहे.+ ט [तेथ ]  ५  त्याचं भय मानणाऱ्‍यांना तो अन्‍न देतो.+ י [योद ] तो आपला करार सर्वकाळ लक्षात ठेवतो.+ כ [खाफ ]  ६  राष्ट्रांचा वारसा आपल्या लोकांना देऊन,+ל [लामेद ]त्याने आपली शक्‍तिशाली कार्यं त्यांच्यापुढे प्रकट केली आहेत. מ [मेम ]  ७  त्याच्या हातांची कार्यं खरी आणि न्यायाची आहेत;+נ [नून ]त्याच्या सर्व आज्ञा भरवशालायक आहेत.+ ס [सामेख ]  ८  त्या आज आणि सर्वकाळासाठी भरवशालायक* आहेत;ע [आयन ]सत्य आणि नीतिमत्त्व यांच्या पायावर त्या उभ्या आहेत.+ פ [पे ]  ९  त्याने आपल्या लोकांना सोडवलंय.+ צ [सादे ] आपला करार सर्वकाळ टिकावा, अशी त्याने आज्ञा दिली आहे. ק [खुफ ] त्याचं नाव पवित्र आणि विस्मयकारक आहे.+ ר [रेश ] १०  यहोवाची भीती बाळगणं ही बुद्धीची सुरुवात आहे.+ ש [शिन ] त्याच्या आज्ञा* पाळणारे सर्व सखोल समज दाखवतात.+ ת [ताव ] त्याची स्तुती सर्वकाळ होत राहते.

तळटीपा

किंवा “हालेलूयाह!” “याह” हे यहोवा या नावाचं संक्षिप्त रूप आहे.
किंवा “कृपाळू.”
किंवा “भक्कम.”
शब्दशः “त्या.”