स्तोत्रं ११२:१-१०
११२ याहची स्तुती करा!*+
א [आलेफ ]
यहोवाची भीती बाळगणारा,ב [बेथ ]त्याच्या आज्ञा आनंदाने पाळणारा सुखी असतो.+
ג [गिमेल ]
२ त्याचे वंशज पृथ्वीवर शक्तिशाली होतील,ד [दालेथ ]
सरळ मन असलेल्या लोकांच्या पिढीला आशीर्वाद मिळेल.+
ה [हे ]
३ त्याच्या घरात धनसंपत्ती आहे,ו [वाव ]त्याचं नीतिमत्त्व सर्वकाळ टिकेल.
ז [झाइन ]
४ सरळ मनाच्या लोकांसाठी, त्याचा प्रकाश अंधारात उजेडासारखा चमकतो.+
ח [हेथ ]
तो करुणामय,* दयाळू+ आणि नीतिमान आहे.
ט [तेथ ]
५ उदार मनाने* उसनं देणाऱ्याचं भलं होतं.+
י [योद ]
तो आपली कार्यं न्यायाने करतो.
כ [खाफ ]
६ तो कधीही डळमळणार नाही.+
ל [लामेद ]
नीतिमानाची आठवण सर्वकाळ केली जाईल.+
מ [मेम ]
७ तो वाईट बातमीला घाबरणार नाही.+
נ [नून ]
यहोवावर भरवसा ठेवल्यामुळे, त्याचं मन स्थिर असतं.+
ס [सामेख ]
८ त्याचं मन डगमगत नाही* आणि तो भीत नाही;+ע [आयन ]शेवटी, तो आपल्या शत्रूंचा पराभव झालेला पाहील.+
פ [पे ]
९ त्याने उदारतेने वाटलं आणि गरिबांना दिलं.+
צ [सादे ]
त्याचं नीतिमत्त्व सर्वकाळ टिकेल.+
ק [खुफ ]
त्याची ताकद* गौरवाने वाढवली जाईल.
ר [रेश ]
१० दुष्ट हे पाहून दुःखी होईल.
ש [शिन ]
तो आपले दातओठ खाईल आणि नाहीसा होईल.
ת [ताव ]
दुष्टांच्या इच्छा नष्ट होतील.+
तळटीपा
^ किंवा “हालेलूयाह!” “याह” हे यहोवा या नावाचं संक्षिप्त रूप आहे.
^ किंवा “कृपाळू.”
^ किंवा “कृपाळूपणे.”
^ किंवा “ठाम असतं; स्थिर असतं.”
^ शब्दशः “शिंग.”