स्तोत्रं ११६:१-१९

  • आभार मानण्यासाठी गीत

    • यहोवाच्या उपकारांच्या बदल्यात मी काय देऊ (१२)

    • “मी तारणाचा प्याला हाती घेईन” (१३)

    • मी यहोवाला केलेले नवस फेडीन (१४, १८)

    • एकनिष्ठ सेवकांचा मृत्यू मौल्यवान (१५)

११६  माझं यहोवावर प्रेम आहेकारण तो माझी हाक, माझ्या मदतीच्या याचना ऐकतो.*+  २  तो माझ्याकडे लक्ष देतो*+आणि मी जिवंत असेपर्यंत* त्याला हाक मारत राहीन.  ३  मृत्यूच्या दोरांनी मला वेढलं;कबरेने मला आपल्या विळख्यात घेतलं.+ संकटांनी आणि दुःखांनी मला घेरलं.+  ४  पण मी यहोवाच्या नावाने हाक मारून म्हणालो:+ “हे यहोवा, मला* वाचव!”  ५  यहोवा करुणामय* आणि नीतिमान आहे;+आपला देव दयाळू आहे.+  ६  यहोवा अनुभव नसलेल्यांचं रक्षण करतो.+ मी अगदी खचून गेलो होतो, पण त्याने मला वाचवलं.  ७  माझा जीव* पुन्हा निश्‍चिंत होईल,कारण यहोवाने माझ्यावर दया केली आहे.  ८  तू मृत्यूपासून माझं रक्षण केलंस,माझ्या डोळ्यांतले अश्रू पुसलेसआणि माझ्या पायांना अडखळण्यापासून वाचवलंस.+  ९  मी जिवंतांच्या देशात यहोवापुढे चालत राहीन. १०  मला विश्‍वास होता, म्हणून मी बोललो;+पण खरंतर मी खूप दुःखी होतो. ११  मी तर घाबरून गेलो आणि म्हणालो: “प्रत्येक माणूस खोटा आहे.”+ १२  यहोवाने माझ्यावर जे उपकार केले आहेत,त्या सर्वांच्या बदल्यात मी त्याला काय देऊ? १३  मी तारणाचा* प्याला हाती घेईन,मी यहोवाचं नाव घेऊन त्याला प्रार्थना करीन. १४  मी यहोवाला केलेले नवस,त्याच्या सर्व लोकांच्या देखत फेडीन.+ १५  आपल्या एकनिष्ठ सेवकांचा मृत्यूयहोवा खूप मौल्यवान लेखतो.*+ १६  हे यहोवा, मी तुझ्याकडे भीक मागतो,कारण मी तुझा सेवक आहे. मी तुझा सेवक, तुझ्या दासीचा मुलगा आहे. तू मला माझ्या बंधनांतून मोकळं केलं आहेस.+ १७  मी तुला उपकारस्तुतीचं बलिदान देईन.+ मी यहोवाचं नाव घेऊन त्याला प्रार्थना करीन. १८  मी यहोवाला केलेले नवस,+त्याच्या सर्व लोकांच्या देखत फेडीन.+ १९  यहोवाच्या घराच्या अंगणांत,+यरुशलेममध्ये मी ते फेडीन. याहची स्तुती करा!*+

तळटीपा

किंवा कदाचित, “यहोवा ऐकतो म्हणून मी प्रेम करतो.”
किंवा “ऐकायला खाली वाकतो.”
शब्दशः “माझ्या दिवसांत.”
किंवा “माझा जीव.”
किंवा “कृपाळू.”
किंवा “महान तारणाचा.”
किंवा “यहोवा गंभीर गोष्ट समजतो.”
किंवा “हालेलूयाह!” “याह” हे यहोवा या नावाचं संक्षिप्त रूप आहे.