स्तोत्रं १२९:१-८
-
हल्ला केला पण हरवू शकले नाहीत
-
सीयोनचा द्वेष करणारे लज्जित होतील (५)
-
चढणीचं गीत.
१२९ “माझ्या लहानपणापासून ते सतत माझ्यावर हल्ला करत राहिले”+
—आता इस्राएलने म्हणावं—
२ “माझ्या लहानपणापासून ते सतत माझ्यावर हल्ला करत राहिले;+पण तरी ते मला हरवू शकले नाहीत.+
३ नांगरणाऱ्यांनी माझ्या पाठीवर नांगर चालवला;+त्यांनी लांबलांब रेघा ओढल्या.”
४ पण यहोवा नीतिमान आहे;+त्याने दुष्टांचे दोर कापून टाकले आहेत.+
५ सीयोनचा द्वेष करणारे सर्व जण लज्जित होतीलआणि अपमानित होऊन माघार घेतील.+
६ छतावर उगवणारं गवत जसं उपटून टाकण्याआधीच सुकून जातं;तसे ते होतील.
७ त्याने कापणी करणाऱ्यांची मूठआणि पेंढ्या गोळा करणाऱ्यांचे हात भरत नाहीत.
८ येणारे-जाणारे असं म्हणणार नाहीत:
“यहोवाचा आशीर्वाद तुमच्यावर असो;आम्ही तुम्हाला यहोवाच्या नावाने आशीर्वाद देतो.”